मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
घेणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - दुसर्‍याने देऊ केलेली गोष्ट आपल्या ताब्यात करणे
  • वाक्यात प्रयोग - भाऊबीजेनिमित्त दिलेली भेट बहिणीने आनंदाने घेतली.
  • समानार्थी शब्द - स्वीकारणे
  • एक तरह का - काम करणे
  • प्रकार - हिसकावणे , स्वीकारणे , विकत घेणे , ठगणे , चोरणे , भाड्याने घेणे , शोषणे
घेणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - काही काळापुरती एखादी गोष्ट खालून वर उचलून धरणे
  • वाक्यात प्रयोग - त्याने बर्‍याच वेळ ओझे आपल्या डोक्यावर उचलले.
  • समानार्थी शब्द - उचलणे
  • एक तरह का - काम करणे
घेणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - क्रिया पूर्ण करून मोकळे होणे
  • वाक्यात प्रयोग - मी येईतोपर्यंत तुम्ही अंघोळ उरकून घ्या.
  • समानार्थी शब्द - टाकणे
घेणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - उदाहरणार्थ घेणे
  • वाक्यात प्रयोग - रामालाच घ्या, तो किती भाबडेपणाने राहतो.
  • एक तरह का - काम करणे
घेणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - समावेश करणे
  • वाक्यात प्रयोग - हा मुद्दा विचारात घे
घेणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - अनुभव करणे किंवा प्राप्त करणे
  • वाक्यात प्रयोग - तुम्ही संधीचा फायदा करून घेतला पाहिजे.
  • समानार्थी शब्द - उपभोगणे
  • एक तरह का - मिळणे
घेणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - शपथ खाण्यासाठी एखादी वस्तूला स्पर्श करणे किंवा ती हातात घेणे
  • वाक्यात प्रयोग - त्याने गंगाजल हातात घेतले आणि शपथ खाल्ली.
  • एक तरह का - घेणे
घेणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - एखाद्या वस्तूच्या संपर्कात येऊन त्यावर त्या वस्तूचा परिणाम होणे
  • वाक्यात प्रयोग - लाकडाच्या कोळसा दगडी कोळशापेक्षा लवकर पेट घेतो.
  • एक तरह का - प्रभावित होणे
घेणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - सुरक्षा, आराम इत्यादीसाठी एका स्थितीत जाणे
  • वाक्यात प्रयोग - वादळापासून वाचम्यासाठी आम्ही एका घराचा आश्रय घेतला.
  • एक तरह का - काम करणे
घेणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - एखाद्याच्या समोर एखादी घटना वा प्रसंग इत्यादींशी संबंधित लोकांचे नाव सांगणे
  • वाक्यात प्रयोग - त्याने पोलीसांसमोर चौघांची नावे घेतली.
  • समानार्थी शब्द - सांगणे
  • एक तरह का - सांगणे
घेणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - काम इत्यादी करण्याची जबाबदारी घेणे
  • वाक्यात प्रयोग - लग्नाची सगळी जबाबदारी मी घेतली.
  • समानार्थी शब्द - स्वीकारणे , ग्रहण_करणे
  • एक तरह का - घेणे
  • प्रकार - विडा उचलणे
घेणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - मादक पदर्थांचे सेवन करणे
  • वाक्यात प्रयोग - आज त्याने जरा जास्तच घेतली.
  • समानार्थी शब्द - चढवणे
  • एक तरह का - घेणे
घेणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - सेवन करणे
  • वाक्यात प्रयोग - औषध वेळच्या वेळी घ्या.
  • एक तरह का - वापरणे
  • प्रकार - जेवणे , नशा करणे , धुम्रपान करणे , घेणे , पिणे
घेणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - एखादे कार्य इत्यादी करण्यासाठी आपल्या बरोबर घेणे किंवा एखादे काम, दल इत्यादित प्रवेश देणे
  • वाक्यात प्रयोग - ह्या दलात रामने मलादेखील घेतले आहे.
  • समानार्थी शब्द - सामील करणे , दाखल करणे
  • एक तरह का - काम करणे
  • प्रकार - ओढणे
घेणे
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - एखाद्याने दिलेली वस्तु स्वीकृत करण्याची किंवा घेण्याची क्रिया
  • वाक्यात प्रयोग - आजारपणामुळे त्याला पुरस्कार घेणे जमले नाही.
  • समानार्थी शब्द - ग्रहण , स्वीकार , अंगीकार
  • लिंग - अज्ञात
  • एक तरह का - काम
  • प्रकार - रक्तादान , अधिग्रहण
घेणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - प्रकाशचित्रक वा छायाचित्रक ह्यांतून चित्र वा दृश्य टिपणे
  • वाक्यात प्रयोग - मी खूप चांगली छायाचित्रे काढतो.
  • समानार्थी शब्द - काढणे
  • एक तरह का - घेणे
घेणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - मोल देऊन एखादी वस्तू घेणे
  • वाक्यात प्रयोग - आम्ही दुकानातून कपडे विकत घेतले
  • समानार्थी शब्द - विकत घेणे , खरेदी करणे , खरीदणे , क्रय करणे
  • एक तरह का - घेणे
घेणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - शक्ति किंवा बलपूर्वक आपल्या अधिकारात घेणे
  • वाक्यात प्रयोग - सेनेने किल्ला ताब्यात घेतला.
  • समानार्थी शब्द - ताब्यात घेणे , ताबा मिळवणे , मिळविणे , अधिकाराखाली घेणे
  • एक तरह का - घेणे
  • प्रकार - घेरणे , बंदी बनविणे
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design