मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
पान
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - झाडाच्या डहाळीवरील हिरव्या रंगाचे लहानमोठे, पातळ अवयव
  • वाक्यात प्रयोग - वसंत ऋतूत झाडावर नवीन पाने येतात
  • समानार्थी शब्द - पर्ण , दल , पत्री , पात
  • लिंग - नपुंसक लिंग
  • एक तरह का - वनस्पती अवयव
  • प्रकार - पान , तमालपत्र , पर्णिका , तुळशीपत्र , कढीपत्ता , बेल , पालवी
  • का हिस्सा - हरितद्रव्य
  • अंगीवाची - पर्णकुटी , द्रोण , झाड , पत्रावळ
पान
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - पुस्तक किंवा वहीतील पाठपोट असलेल्या कागदापैकी प्रत्येक
  • वाक्यात प्रयोग - मुलाने ह्या पुस्तकाचे पान फाडले.
  • लिंग - नपुंसक लिंग
  • एक तरह का - कागद
  • का हिस्सा - पृष्ठ
  • अंगीवाची - वही
पान
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - पुस्तक किंवा वहीच्या पानाच्या पाठपोट बाजूंपैकी प्रत्येक
  • वाक्यात प्रयोग - सम क्रमांकाच्या पृष्ठावर विषयाचे शीर्षकही दिले आहे
  • समानार्थी शब्द - पृष्ठ
  • लिंग - नपुंसक लिंग
  • एक तरह का - कागद , भाग
  • प्रकार - आवरण
  • अंगीवाची - पुस्तक , पान
पान
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - नांगराच्या फाळावरील लाकडी तुकडा
  • वाक्यात प्रयोग - नवीन पान बसवून घ्यावे लागेल
  • लिंग - नपुंसक लिंग
पान
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - नागवेलीचे पान
  • वाक्यात प्रयोग - पूजेसाठी दहा पाने लागतील
  • लिंग - नपुंसक लिंग
  • एक तरह का - पान
  • प्रकार - बंगला , कपुरीकाय
  • अंगीवाची - विडा , नागवेल
पान
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - छपराच्या वाशांचे शेवट ज्यात बसवतात ते लाकूड
  • वाक्यात प्रयोग - ह्या छपराचे पान बदलावे लागेल
  • लिंग - नपुंसक लिंग
पान
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - समारंभ इत्यादीतील जेवणारी किंवा जेवलेली माणसे
  • वाक्यात प्रयोग - गोट्याच्या मुंजीत पाचशे पाने उठली
  • लिंग - नपुंसक लिंग
पान
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - चर्मवाद्याच्या तोंडावर बसवलेले कातडे
  • वाक्यात प्रयोग - या ढोलकीचे दुम्याचे पान फुटले आहे
  • लिंग - नपुंसक लिंग
पान
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - धोतरजोडीपैकी एक नग
  • वाक्यात प्रयोग - आजोबांसाठी नवे धोतराचे पान आणले
  • लिंग - नपुंसक लिंग
पान
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - पत्त्याच्या खेळातील जाड कागदाचा प्रत्येक तुकडा
  • वाक्यात प्रयोग - त्याने बदामाच्या पानाची उतारी केली.
  • लिंग - नपुंसक लिंग
  • एक तरह का - मानवनिर्मित वस्तू
  • प्रकार - दुरी , दश्शी , एक्का , पंजा , छक्का , नवी , राणी
  • अंगीवाची - हुकूम , पत्ते
पान
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - लहान मुलांच्या, स्त्रियांच्या, पुरुषांच्या गळ्यात घालायचा पानाच्या आकाराचा एक दागिना
  • वाक्यात प्रयोग - बाळाच्या गळ्यात जिवतीचे पान बांधले.
  • लिंग - नपुंसक लिंग
  • एक तरह का - कंठभूषण
पान
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - गंजीफा खेळातील जाड कागदाचा प्रत्येक तुकडा
  • वाक्यात प्रयोग - गंजीफ्यातील पान चांगले कलात्मक आणि गोल असते.
  • लिंग - नपुंसक लिंग
  • एक तरह का - मानवनिर्मित वस्तू
पान
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - वल्ह्याच्या पुढल्या टोकाला असलेला चपटा भाग
  • वाक्यात प्रयोग - वल्ह्याच्या पात्याने भराभर पाणी कापले जात होते.
  • समानार्थी शब्द - पात
  • लिंग - नपुंसक लिंग
पान
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - समोरील दोन टोकदार आणि पोकळ दातांच्या वर विषग्रंथी असलेला आणि ज्याचा दंश झाल्यास विषबाधा होते असा साप
  • वाक्यात प्रयोग - नाग हा एक विषारी साप आहे.
  • समानार्थी शब्द - विषारी साप , विषारी सर्प , जहरी साप
  • लिंग - नपुंसक लिंग
  • एक तरह का - साप
  • प्रकार - करैत , धामण
पान
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - नागवेलीच्या पानावर सुपारी, काथ, चुना, लवंग, वेलदोडा इत्यादी पदार्थ घालून वळलेली घडी
  • वाक्यात प्रयोग - समारंभात जेवणानंतर सर्वांना विडे दिले.
  • समानार्थी शब्द - विडा , पानपट्टी
  • लिंग - नपुंसक लिंग
  • एक तरह का - खाद्य
  • का हिस्सा - पान , कात , चुना
पान
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - नागवेलीची पाने, सुपारी, काथ, चुना, लवंग, वेलदोडे घालून वळलेली घडी
  • वाक्यात प्रयोग - समारंभात जेवणानंतर सर्वांना विडे दिले
  • समानार्थी शब्द - विडा , पानपट्टी
  • लिंग - नपुंसक लिंग
  • एक तरह का - खाद्य
पान
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - सोने किंवा इतर धातूचा पातळ पत्रा
  • वाक्यात प्रयोग - मिठाई चांदीच्या वर्खात गुंडाळली होती
  • लिंग - नपुंसक लिंग
  • एक तरह का - मानवनिर्मित वस्तू
  • का हिस्सा - धातू
पान
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - जेवणाच्या उपयोगाचे उथळ व पसरट धातूचे पात्र
  • वाक्यात प्रयोग - जेवल्यानंतर आपले ताट स्वतः उचलून ठेवावे.
  • समानार्थी शब्द - ताट , थाळी
  • लिंग - नपुंसक लिंग
  • एक तरह का - भांडे
पान
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - बाण वा भाला आदींच्या पुढचा तीक्ष्ण व धारदार भाग
  • वाक्यात प्रयोग - बाणाची पात वाघाच्या शरीरात रुतून बसली.
  • समानार्थी शब्द - पात , फाळ , पाते
  • लिंग - नपुंसक लिंग
  • एक तरह का - टोक
  • प्रकार - फाळ , फळ
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design