मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
धरणे
क्रियापद (कार्य घडवणारे शब्द)
<< मागे पूढे >>
image
  • व्याख्या - एखादी वस्तू इत्यादी सुटणार नाही अशा प्रकारे पकडणे
  • वाक्यात प्रयोग - रस्ता ओलांडण्यासाठी आजोबांनी मुलाचा हात धरला.
  • समानार्थी शब्द - पकडणे
धरणे
नाम (नाव दर्शवणारे शब्द)
<< मागे पूढे >>
  • व्याख्या - एखादी गोष्ट साध्य करून घेण्यासाठी, मागणी मान्य होण्यासाठी किंवा अनुचित काम थांबविण्यासाठी एखाद्याच्या दारात अडून बसण्याची क्रिया
  • वाक्यात प्रयोग - पोलीस चौकीत झालेल्या मृत्यूच्या चौकशीसाठी लोकांनी पोलीस चौकीवर धरणे दिले.
धरणे
क्रियापद (कार्य घडवणारे शब्द)
<< मागे पूढे >>
  • व्याख्या - एखादे वाहन वा वाट ह्यांचा वापर करणे
  • वाक्यात प्रयोग - तुम्ही मुंबईकडे जाणारी बस धरा.
  • समानार्थी शब्द - पकडणे
धरणे
क्रियापद (कार्य घडवणारे शब्द)
<< मागे पूढे >>
  • व्याख्या - *एखादे काम अंगिकारणे वा उद्योगादि नियमाने करू लागणे
  • वाक्यात प्रयोग - त्याने नोकरी धरली.
धरणे
नाम (नाव दर्शवणारे शब्द)
<< मागे पूढे >>
  • व्याख्या - जमिनीत बियाणे रुजण्याची क्रिया
  • वाक्यात प्रयोग - यंदा बियाणांचे रुजणे चांगले झाले आहे.
  • समानार्थी शब्द - रुजणे
धरणे
क्रियापद (कार्य घडवणारे शब्द)
<< मागे पूढे >>
  • व्याख्या - राग इत्यादी सतत मनात धरून ठेवणे
  • वाक्यात प्रयोग - मनात राग नको बागळूस.
  • समानार्थी शब्द - बाळगणे , ठेवणे
धरणे
नाम (नाव दर्शवणारे शब्द)
<< मागे पूढे >>
  • व्याख्या - शरीरातील एखादी नस, स्नायू इत्यादींमध्ये ताठरता येण्याची क्रिया
  • वाक्यात प्रयोग - मानेचे आखडणे त्रासदायक असते."
  • समानार्थी शब्द - आखडणे , उसण_भरणे
धरणे
नाम (नाव दर्शवणारे शब्द)
<< मागे पूढे >>
  • व्याख्या - एखादी गोष्ट हातात येईल वा धरली वा पकडली जाईल असे करण्याची क्रिया
  • वाक्यात प्रयोग - त्याचे चेंडू पकडणे थक्क करणारे होते.
  • समानार्थी शब्द - पकडणे , झेलणे
धरणे
क्रियापद (कार्य घडवणारे शब्द)
<< मागे पूढे >>
image
  • व्याख्या - पशु पक्षी इत्यादींना जाळ्यात अडकवून आपल्या अधिकारात घेणे
  • वाक्यात प्रयोग - तो रोज मासे पकडतो.
  • समानार्थी शब्द - पकडणे
धरणे
क्रियापद (कार्य घडवणारे शब्द)
<< मागे पूढे >>
image
  • व्याख्या - पडत असताना वाचविणे
  • वाक्यात प्रयोग - तिसर्‍या माळ्यावरून पडणार्‍या मुलाला एका तरूणाने पुढे येऊन सावरले.
  • समानार्थी शब्द - सावरणे , पकडणे
धरणे
क्रियापद (कार्य घडवणारे शब्द)
<< मागे पूढे >>
image
  • व्याख्या - फुले, पाने इत्यादी उत्पन्न होणे
  • वाक्यात प्रयोग - ह्या झाडाला हजार नारळ येतात.
  • समानार्थी शब्द - येणे , लागणे
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design