Toggle navigation
मराठी शब्दमित्र
इयत्तेनुसार
मराठी ज्ञान स्तरानुसार
प्राथमिक (Beginner)
माध्यमिक (Intermediate)
कुशल (Proficient)
प्रगत (Advanced)
विशेषज्ञ (Expert)
आमच्या विषयी
संपर्क करा
मदत
Space
Backspace
Reset
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
य
र
ल
व
श
ष
स
ह
क्ष
त्र
ज्ञ
श्र
ऋ
ृ
ऑ
ॉ
ँ
़
Levels
प्राथमिक (BEGINNER)
माध्यमिक (INTERMEDIATE)
कुशल (PROFICIENT)
प्रगत (ADVANCED)
विशेषज्ञ (EXPERT)
चिमणी
नाम (नाव दर्शवणारे शब्द)
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
डोळ्यावर तांबूस पांढरी रेघ असलेला, मातट तपकिरी पाठीवर काळ्या व तपकिरी रेघोट्या, पंखावर दोन आडवे पट्टे असणारा, लहान आकाराचा एक पक्षी
वाक्यात प्रयोग -
चिमणी अंगणात दाणे टिपत होती.
समानार्थी शब्द -
चिमणा
चिमणी
नाम (नाव दर्शवणारे शब्द)
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
टिनाच्या पत्र्याचा धुराडदिवा
वाक्यात प्रयोग -
शेतकर्याच्या झोपडीत चिमणी जळत आहे."
समानार्थी शब्द -
ढमणे
चिमणी
नाम (नाव दर्शवणारे शब्द)
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
एखादा कारखाना, भट्टी अशांसारख्या ठिकाणी असणारे, धुरास वर, उंच हवेत सोडण्यासाठी असलेले नळकांड्यासारखे उपकरण
वाक्यात प्रयोग -
चिमणीतील स्वच्छता आज सफाई कामगारांनी केली.
समानार्थी शब्द -
धुरांडे
चिमणी
नाम (नाव दर्शवणारे शब्द)
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
दिव्यावर ठेवली जाणारी नळीच्या वा फुगीर आकाराची काच
वाक्यात प्रयोग -
ज्योत मोठी केल्याने चिमणी तडकली.
चिमणी
नाम (नाव दर्शवणारे शब्द)
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
चिमण्याची मादा
वाक्यात प्रयोग -
चिमणी पिलांना खाऊ घालत आहे.
चिमणी
नाम (नाव दर्शवणारे शब्द)
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
मध्यम आकाराच्या चिमणीएवढा, डोके काळे, कंठ, गाल आणि छातीचा मध्यभाग पांढरा आणि वरील भाग राखट असलेला एक पक्षी
वाक्यात प्रयोग -
रामगंगा हा पक्षी पानगळीची विरळ जंगले आणि फळबागा येथे आढळतो.
समानार्थी शब्द -
रामगंगा
,
गगनचिडी