मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
चक्र
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - नेहमी गोल फिरणारी वा तशी फिरावी म्हणून बनविलेली गोल वस्तू
  • वाक्यात प्रयोग - कुंभाराचे चाक हे एक प्रकारचे चक्र आहे.
  • लिंग - नपुंसक लिंग
  • एक तरह का - मानवनिर्मित वस्तू
  • प्रकार - चाक
चक्र
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - चाकासारखे एक आयुध
  • वाक्यात प्रयोग - विष्णूच्या चक्राचे नाव सुदर्शन असे आहे
  • लिंग - नपुंसक लिंग
  • एक तरह का - पौराणिक वस्तू , अस्त्र
  • प्रकार - सुदर्शन चक्र
चक्र
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - योगमार्गात कल्पिलेले चक्र
  • वाक्यात प्रयोग - मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपुर, अनाहत, विशुद्ध, सहस्रार ही सहा चक्रे आहेत.
  • लिंग - नपुंसक लिंग
  • एक तरह का - अमूर्त वस्तू
  • प्रकार - विशुद्ध चक्र
चक्र
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - धातुपासून बनवलेले एक प्रकारचे पदक जे सैनिकांची बहादुरी व धडाडी बघून त्यांना दिले जाते
  • वाक्यात प्रयोग - त्याला राष्ट्रपतीकडून परमवीर चक्र मिळाले आहे.
  • लिंग - नपुंसक लिंग
  • एक तरह का - पदक
  • प्रकार - अशोकचक्र , कीर्ती चक्र , परमवीर चक्र , महावीर चक्र , शौर्य चक्र
  • का हिस्सा - धातू
चक्र
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - शांतपणे एका ठिकाणी बसून गुप्त किंवा अदृश्य रुपाने केली जाणारी कारवाई
  • वाक्यात प्रयोग - हे सगळे चक्र तुम्हीच चालवलेले आहे.
  • लिंग - नपुंसक लिंग
  • एक तरह का - काम
चक्र
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - असा कालावधी ज्यावेळेत काही विशिष्ट घटना क्रमाने होतात व पुनः तेवढ्याच कालावधीत त्याची पुनरावृत्ती होते
  • वाक्यात प्रयोग - हे चित्र फुलपाखरूच्या जीवनाचे चक्र दर्शवते.
  • लिंग - नपुंसक लिंग
  • एक तरह का - अंमलबजावणी
  • प्रकार - भवचक्र , जलचक्र , घटनाचक्र
चक्र
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - चाकासारखी गोल वस्तू
  • वाक्यात प्रयोग - ह्या यंत्रात कित्येक चक्रे आहेत.
  • लिंग - नपुंसक लिंग
  • एक तरह का - गोष्ट
चक्र
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - बसण्यासाठी जागा असलेले, गोल-गोल फिरणारे, गोलाकार मनोरंजनाचे खेळणे
  • वाक्यात प्रयोग - जत्रेत आम्ही चक्रात बसलो होतो.
  • लिंग - नपुंसक लिंग
  • एक तरह का - साधन
चक्र
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - लाकूड, लोखंड इत्यादीचा गोलाकार साचा जो सळ्या इत्यादींनी चक्राच्या केंद्राला जोडलेला असतो आणि एखाद्या अक्षास केंद्र मानून त्याच्या चारी बाजूंनी फिरतो तसेच वाहन, रथ इत्यादीं पुढे ओढत जातो
  • वाक्यात प्रयोग - मुले चक्रात बसली आहेत..
  • लिंग - नपुंसक लिंग
  • एक तरह का - स्वरूप
चक्र
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - मडके इत्यादिकास आकार देण्याचे कुंभाराचे साधन
  • वाक्यात प्रयोग - कुंभार चाकावर पणत्या बनवत आहे
  • समानार्थी शब्द - चाक
  • लिंग - नपुंसक लिंग
  • एक तरह का - चक्र
चक्र
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - ज्यात एखादा अडकेल अशी अवस्था किंवा पाण्यात उठणार्‍या भोवर्‍याचा लाक्षणिक प्रयोग
  • वाक्यात प्रयोग - तो कायम वादाच्या भोवर्‍यात राहिला.
  • समानार्थी शब्द - भोवरा
  • लिंग - अज्ञात
  • एक तरह का - अवस्था
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design