Toggle navigation
मराठी शब्दमित्र
इयत्तेनुसार
मराठी ज्ञान स्तरानुसार
प्राथमिक (Beginner)
माध्यमिक (Intermediate)
कुशल (Proficient)
प्रगत (Advanced)
विशेषज्ञ (Expert)
आमच्या विषयी
संपर्क करा
मदत
Space
Backspace
Reset
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
य
र
ल
व
श
ष
स
ह
क्ष
त्र
ज्ञ
श्र
ऋ
ृ
ऑ
ॉ
ँ
़
Levels
प्राथमिक (BEGINNER)
माध्यमिक (INTERMEDIATE)
कुशल (PROFICIENT)
प्रगत (ADVANCED)
विशेषज्ञ (EXPERT)
सोडणे
क्रियापद (कार्य घडवणारे शब्द)
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
पाण्याच्या प्रवाहात सोडणे
वाक्यात प्रयोग -
"त्याने आपल्या आजोबांच्या अस्थी नदीत सोडल्या.
समानार्थी शब्द -
विसर्जित करणे
सोडणे
क्रियापद (कार्य घडवणारे शब्द)
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
बंधनातून मोकळे करणे
वाक्यात प्रयोग -
त्याचे पिजरा उघडून चिमणीला सोडले."
समानार्थी शब्द -
मुक्त करणे
,
सुटका करणे
सोडणे
क्रियापद (कार्य घडवणारे शब्द)
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
अतिथी किंवा घरातील एखाद्या व्यक्तीस कुठेतरी जाण्यास बस, ट्रेन किंवा विमानतळावर पोहचवणे
वाक्यात प्रयोग -
"मी बांद्रा रेल्वे स्टेशनला सोडले".
सोडणे
क्रियापद (कार्य घडवणारे शब्द)
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
हातात पकडलेली एखादी गोष्ट निसटून देणे
वाक्यात प्रयोग -
मनोहरने आपल्या पतंगाचा दोर सोडून दिला.
सोडणे
क्रियापद (कार्य घडवणारे शब्द)
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
संबंध न ठेवणे
वाक्यात प्रयोग -
तिने आपल्या नवर्याला सोडले.
समानार्थी शब्द -
टाकणे
सोडणे
क्रियापद (कार्य घडवणारे शब्द)
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
एखाद्या वस्तूने आपल्यामधून काही बाहेर टाकणे
वाक्यात प्रयोग -
ही गाडी खूप धूर सोडते.
समानार्थी शब्द -
टाकणे
,
फेकणे
सोडणे
क्रियापद (कार्य घडवणारे शब्द)
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
एखाद्या मोजणीतून वगळणे
वाक्यात प्रयोग -
पावसाचे चार महिने सोडले तर वर्षभर इथे पर्यटकांची गर्दी असते.
समानार्थी शब्द -
वगळणे
सोडणे
क्रियापद (कार्य घडवणारे शब्द)
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
एखाद्यास आपल्याबरोबर न ठेवणे
वाक्यात प्रयोग -
त्याने मला जत्रेत सोडून दिले.
सोडणे
क्रियापद (कार्य घडवणारे शब्द)
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
असलेल्या स्थानावरून निघणे
वाक्यात प्रयोग -
गाडीने दहा वाजता फलाट सोडले.
सोडणे
क्रियापद (कार्य घडवणारे शब्द)
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
करायचे, वापरायचे वा सेवन करायचे बंद करणे
वाक्यात प्रयोग -
तिने माझ्याशी बोलणे सोडले.
समानार्थी शब्द -
टाकणे
सोडणे
क्रियापद (कार्य घडवणारे शब्द)
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
प्रवाहाच्या उताराच्या दिशेने घेऊन जाणे
वाक्यात प्रयोग -
धरणाचे पाणी कालव्यात सोडले जाते.
सोडणे
क्रियापद (कार्य घडवणारे शब्द)
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
कार्यवाही न करणे
वाक्यात प्रयोग -
मी तिसरा प्रश्न सोडला.
सोडणे
क्रियापद (कार्य घडवणारे शब्द)
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
उपास संपल्यावर खायची वस्तू तोंडात घालणे
वाक्यात प्रयोग -
हरताळकेचा उपास बेलपान चाटून सोडतात.
सोडणे
क्रियापद (कार्य घडवणारे शब्द)
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
गाठ, बंध इत्यादी मोकळे करणे
वाक्यात प्रयोग -
स्वेटरच्या गुंड्या सोडल्या.
सोडणे
क्रियापद (कार्य घडवणारे शब्द)
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
पकडण्याच्या उद्देशाने एखाद्याला एखाद्याच्या पाठीमागे लावणे
वाक्यात प्रयोग -
पोलीसांनी चोराला पकडण्यासाठी दोन कुत्रे सोडले.
समानार्थी शब्द -
पाठीमागे लावणे
,
मागे लावणे
सोडणे
क्रियापद (कार्य घडवणारे शब्द)
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
अस्त्र इत्यादी चालवणे
वाक्यात प्रयोग -
रामाने रावणावर अस्त्र सोडला.
सोडणे
नाम (नाव दर्शवणारे शब्द)
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
एखाद्या गोष्टीचा त्याग करणे
वाक्यात प्रयोग -
खोटे आरोप सहन न झाल्याने त्याने आपले पद सोडले.
समानार्थी शब्द -
त्यागणे
,
त्यजणे
सोडणे
क्रियापद (कार्य घडवणारे शब्द)
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
एखाद्याचा दोष सिद्ध न झाल्यामुळे त्याला मुक्त करणे
वाक्यात प्रयोग -
न्यायाधीशाने मोहनला दोषमुक्त केले.
समानार्थी शब्द -
दोषमुक्त करणे
सोडणे
क्रियापद (कार्य घडवणारे शब्द)
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
एखाद्यास एखाद्या ठिकाणी प्रत्यक्ष सोडण्यास जाणे
वाक्यात प्रयोग -
मी त्याला दादरला पाहोचविण्यास जात आहे.
समानार्थी शब्द -
पोहोचवणे
,
पोचवणे
सोडणे
नाम (नाव दर्शवणारे शब्द)
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
एखादी वस्तू वा प्राण्याशी संबंध तोडण्याची क्रिया वा भाव
वाक्यात प्रयोग -
त्याने आपली पत्नी व मुलांचा परित्याग केला.
समानार्थी शब्द -
परित्याग
,
त्याग
सोडणे
क्रियापद (कार्य घडवणारे शब्द)
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
ऐक्य किंवा पक्षापासून वेगळा होणे
वाक्यात प्रयोग -
तो काँग्रेसमधून बाहेर पडला.
समानार्थी शब्द -
बाहेर_पडणे
,
वेगळे_होणे
,
बाजूला_होणे