मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
चढणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - वाहन इत्यादींवर चढणे
  • वाक्यात प्रयोग - तो घोड्यावर आरूढ झाला.
  • समानार्थी शब्द - आरूढणे , वर चढणे , स्वार होणे
चढणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - गर्वाने ताठणे
  • वाक्यात प्रयोग - नोकरी लागल्यापासून तो फार चढला.
चढणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - मादक पदार्थ घेतले असता उन्माद चढून गिरकी येणे
  • वाक्यात प्रयोग - मला गोटा कधी चढत नाही.
  • समानार्थी शब्द - नशा होणे , निशा येणे
चढणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - किंमत वाढणे
  • वाक्यात प्रयोग - सोन्याचा भाव चढला आहे.
  • समानार्थी शब्द - महागणे
चढणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - पातळी वाढणे
  • वाक्यात प्रयोग - त्या विहिरीस पाणी चढले.
चढणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - देव, देवता इत्यादीस भेट म्हणून मिळणे
  • वाक्यात प्रयोग - कालीमातेच्या मंदिरात खूप वस्तू चढल्या.
चढणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - एखादी गोष्ट दुसरीच्या पृष्ठभागावर व्यवस्थित बसणे
  • वाक्यात प्रयोग - दागिन्यांवर सोन्याचे पाणी चांगले चढले.
चढणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - ढोल, वीणा इत्यादींची दोरी, तार, चामडे इत्यादी ताणले जाणे
  • वाक्यात प्रयोग - शेकोटीची ऊब दिली की डफ चांगला चढतो.
  • समानार्थी शब्द - लागणे
चढणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - पृष्ठभागावर पसरणे
  • वाक्यात प्रयोग - पुस्तकांवर धूळ चढली.
  • समानार्थी शब्द - लागणे
चढणे
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - वर जाण्याची क्रिया
  • वाक्यात प्रयोग - ह्या पर्वतावर चढणे फार कठीण आहे.
  • समानार्थी शब्द - चढण , चढाई
  • लिंग - नपुंसक लिंग
चढणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - आवाज तीव्र होणे
  • वाक्यात प्रयोग - त्या गायिकेचा आवाज सहज चढतो.
चढणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - वर असलेल्या ठिकाणावर जाणे
  • वाक्यात प्रयोग - ती चौथर्‍यावर चढली.
चढणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - वर येणे वा जाणे
  • वाक्यात प्रयोग - सूर्य हळूहळू वर येत आहे.
  • समानार्थी शब्द - वर येणे , वर जाणे
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design