मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
कापणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - एखाद्या धारदार वस्तूने तुकडे करणे
  • वाक्यात प्रयोग - तो भाजी छान चिरतो.
  • समानार्थी शब्द - चिरणे
कापणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - एखाद्या धारधार वस्तूच्या दाबाने दुसर्‍या वस्तूचे तुकडे होणे
  • वाक्यात प्रयोग - भाजी कापत आहे.
कापणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - शरीर कंपायमान होणे
  • वाक्यात प्रयोग - अतिशय ताप आल्यामुळे तो थंडीने कापत होता.
  • समानार्थी शब्द - कापरे भरणे , थरथरणे
कापणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - पगार, रोजमुरा इत्यादींचा काही भाग वगळणे
  • वाक्यात प्रयोग - ह्या वर्षी माझ्या पगारातून २० टक्के आयकर कापला.
कापणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - एका विशिष्ट पद्धतीने गळा इत्यादी सावकाश कापणे
  • वाक्यात प्रयोग - कसायाने बकरा कापला.
कापणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - पत्त्याच्या खेळत हुकुमाचे पान टाकून इतर पानांची कार्यक्षमता नाहीशी करणे
  • वाक्यात प्रयोग - त्याने हुकुमचे पान टाकून माझा राजा कापला.
कापणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - पत्त्याच्या खेलात पानांच्या गड्डीतून काही पाने वेगळी काढून ठेवणे
  • वाक्यात प्रयोग - जादूगाराने सांगितल्याप्रमाणे मी पत्ते कापले.
  • समानार्थी शब्द - काटणे
कापणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - खूप पैसे खर्च करवणे
  • वाक्यात प्रयोग - आज त्याला चांगला कापला.
कापणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - चालून अथवा वाहनाने रस्त्याचे अंतर पार पाडणे वा पूर्ण करणे
  • वाक्यात प्रयोग - आम्ही दोघांनी १५ किलोमीटर अंतर कापले.
कापणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - एखादी गोष्ट किंवा एखादा पृष्ठभाग तात्पुरता जागेवरून हलविणे
  • वाक्यात प्रयोग - पुढे जाण्यासाठी बोट पाण्याची धार कापते.
  • समानार्थी शब्द - चिरणे
कापणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - दाब, घर्षण किंवा अशाप्रकारच्या एखाद्या क्रियेने असे काही करणे जेणेकरून त्या गोष्टीचा काही अंश त्याच्या मुळापासून वेगळा होईल
  • वाक्यात प्रयोग - कुणीतरी माझ्या पतंगाची दोरी कापली.
कापणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - कात्रीने वा तशाच प्रकारच्या हत्याराने कापणे
  • वाक्यात प्रयोग - झाडे कातरण्यासाठी माळी काकांनी नवीन कात्री आणली
  • समानार्थी शब्द - कातरणे
कापणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - कापले किंवा छाटले जाणे
  • वाक्यात प्रयोग - पावसाआधी झाडाच्या फांद्या छाटल्या गेल्या.
  • समानार्थी शब्द - छाटणे , तोडणे
कापणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - भीतीने शरीर कापणे
  • वाक्यात प्रयोग - दहशतवाद्याल समोर पाहून सोहन थरथरू लागला.
  • समानार्थी शब्द - थरथरणे , कंप सुटणे
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design