मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
तोंड
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - अन्नग्रहण, बोलणे इत्यादी कामे करण्यास उपयोगी पडणारा प्राण्यांच्या शरीरातील एक अवयव
  • वाक्यात प्रयोग - त्याने लाडू उचलून तोंडात घातला.
  • समानार्थी शब्द - मुख
  • लिंग - नपुंसक लिंग
  • एक तरह का - शारीरिक भाग
  • प्रकार - लांब तोंड , भोकाड , बोळके
  • का हिस्सा - हिरडी , तालू , दात , जीभ , ओठ
तोंड
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - हनुवटीपासून डोक्यापर्यंतचा दर्शनी भाग
  • वाक्यात प्रयोग - आजारपणात त्याचा चेहरा साफ उतरला.
  • समानार्थी शब्द - चेहरा , चर्या , मुख , मुखमंडळ
  • लिंग - नपुंसक लिंग
  • एक तरह का - शारीरिक भाग
  • प्रकार - थोबाड
  • का हिस्सा - कपाळ , गाल , डोळा , ओठ , नाक
तोंड
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - पदार्थ जेथून आत घालतात तो लोटी, बाटली इत्यादिकांचा वरचा भाग
  • वाक्यात प्रयोग - ह्या बाटलीचे तोंड फार निमुळते आहे.
  • लिंग - नपुंसक लिंग
  • प्रकार - ज्वालामुखी
तोंड
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - ज्यातून पू निघतो असा फोडाचा छिद्र पडण्याजोगा भाग
  • वाक्यात प्रयोग - ह्या फोडाला तोंड फुटले आहे.
  • लिंग - नपुंसक लिंग
  • एक तरह का - छिद्र
तोंड
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - घर इत्यादिकांचे मुख्यप्रवेश दार
  • वाक्यात प्रयोग - ह्या किल्ल्याचे तोंड उत्तरेकडे आहे.
  • लिंग - नपुंसक लिंग
  • एक तरह का - प्रवेशद्वार
तोंड
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - एखाद्या वस्तूचा समोरील दर्शनी भाग
  • वाक्यात प्रयोग - संगणकाचे तोंड माझाकडे फिरव.
  • लिंग - नपुंसक लिंग
तोंड
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - चेहर्‍याच्या बाहेरील तोंडाचा भाग ज्यात वरच्या व खालच्या ओठांचादेखील समावेश आहे
  • वाक्यात प्रयोग - त्याने बडबड करणार्‍या माणसाच्या तोंडात मारले.
  • लिंग - नपुंसक लिंग
  • एक तरह का - शारीरिक बाह्य अवयव
तोंड
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - जेवणामध्ये गणली गेलेली व्यक्ती
  • वाक्यात प्रयोग - घरात सात तोंडे खाणारी आहेत.
  • समानार्थी शब्द - पोट
  • लिंग - नपुंसक लिंग
  • एक तरह का - व्यक्ती
तोंड
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - जाते इत्यादीचे भोक ज्यामधून दळण्यासाठी धान्य टाकले जाते
  • वाक्यात प्रयोग - ह्या जात्याचा डोळा खूप रूंद आहे.
  • समानार्थी शब्द - डोळा
  • लिंग - नपुंसक लिंग
  • एक तरह का - छिद्र
तोंड
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - एखाद्या व्यक्तीच्या चेहर्‍यावर प्रकट होणारे भाव
  • वाक्यात प्रयोग - तुझा चेहराच सांगत आहे की तुम्ही रागात आहात.
  • समानार्थी शब्द - चेहरा , चेहर्‍यावरील भाव
  • लिंग - नपुंसक लिंग
  • एक तरह का - अभिव्यक्ती
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design