साहाय्य
How to use the Marathi Wordnet interface
आवश्यक क्षमता Compatibility and system requirement
- युनिकोडाचे ‘देवनागरी टंक’ बसवल्याशिवाय मराठी शाब्दबंधातील मजकूर वाचता येणार नाही. त्यासाठी आपल्या संगणकावर युनिकोड-प्रणाली बसवून घ्यावी.
- विंडोज् २००० (Windows 2000), विंडोज् एक्सपी (Windows XP) ह्यांवर इंटरनेट एक्स्प्लोअरर ६ / फायरफॉक्स १.५ / ऑपेरा ८ ह्यांत ही यंत्रणा उत्तम चालते. लिनक्सच्या सर्व आवृत्यांमध्ये हे चालते का ते तपासून पाहणे कठीण आहे. पण युनिकोडाला अनुकूल असलेल्या कोणत्याही ब्राउजरावर (उदा. फायरफॉक्स १.५ आणि ऑपेरा ८.) शाब्दबंध व्यवस्थित दिसेल.
ह्या यंत्रणांच्या वर लिहिलेल्या अद्ययावत आवृत्त्याच वापराव्यात.
- जुन्या आवृत्त्यांत मजकूर नीट दिसेलच ह्याची शाश्वती नाही. अजॅक्स (Ajax) ला अनुकूल यंत्रणा आवश्यक आहे.
- The Wordnet contents are displayed using Unicode (Devnagari script). To view it on your machine, your machine/browser should be Unicode enabled.
- The system works best in Internet explorer 6/ Firefox 1.5/Opera 8 on windows 2000 and windows XP. In Linux, it is difficult to test it on all distributions, but mostly, it will work on all unicode complient browsers such as Firefox 1.5+ and opera 8+.
- Results may not be gauranteed on lower specifications than mentioned above, as it needs Ajax compatibility over the client side.
मराठी शाब्दबंध कसा वापरायचा Steps to use
- हवा असलेलला शब्द चौकटीत लिहून ' शोधा ' ही कळ दाबावी.
- शब्द लिहिण्यासाठी आपल्या संगणकाचा कळपाट वापरावा किंवा शाब्दबंधाच्या पानावर असलेला कळपाट वापरावा.
- शाब्दबंधाच्या पानावरील कळपाट हवा असेल तर चौकटीखालची 'कळपाट' ही कळ दाबावी.
- कळ दाबल्यावर कळपाट दिसू लागेल. उंदीर टिकटिकवून त्याचा वापर करता येईल.
- शब्द लिहून 'शोधा' ही कळ दाबल्यावर त्याच पानावर नोंदी (त्या शब्दाचा/चे अर्थ दाखवणारा/रे संच) उमटतील.
- शाब्दबंधात शब्दाची नोंद नसल्यास 'शब्द सापडत नाही' असा मजकूर दिसेल.
- शाब्दबंधात नाम, विशेषण, क्रियाविशेषण आणि क्रियापद ह्या चार गटांतील शब्दांच्या नोंदी आहेत. एखादा शब्द एकाहून अधिक गटात आढळत असल्यास त्याच्या नोंदी गटवार दाखवल्या जातील.
- संबंधांची यादी पाहण्यासाठी प्रत्येक संचाच्या सुरवातीला असलेल्या (सं.) ह्या खुणेवर टिकटिकवा. .
http://www.cfilt.iitb.ac.in/~wordnetbeta/marathiwn/help.php
- पुन्हा (सं.) ह्या खुणेवर टिकटिकवले असता संबंधांची यादी दिसेनाशी होईल.
- संचांतील विशिष्ट संबंध पाहण्यासाठी त्या त्या संबंधावर टिकटिकवा.
- पुन्हा त्या संबंधावर टिकटिकवले असता संबंधातील संच दिसेनासे होतील.
- संचातील समानार्थी शब्दांपैकी कोणत्याही शब्दावर टिकटिकवले असता त्या शब्दाची नोंद असलेले संच दिसू लागतील.
- मराठी शाब्दबंध चाळायला वरील रीत उपयुक्त ठरेल.
- To search a word, type it in the text-box given and press search button.
- You can type using your computer's keyboard or using the online keyboard.
- To use the online keyboard, click on the small 'keyboard' button below the search box.
- It will expand to show a keyboard which can be used with the help of the mouse.
- Once the word is searched, the results will be displayed on the top of the same page.
- If there is no result, there will be an appropriate message.
- The results will be grouped according to the part of speech of the word, viz Noun, Adjective, Adverb and Verb.
- In front of every synset there will be a link (R).
You can click on it and it will display the list of all possible relations associated with the searched word and the particular synset in which it appears, to other synsets and/or words.
- The list can be cleared away by clicking again on the link (R).
- To view the relations/relation hierarchies, click on any relation.
- Once again clicking on the relation will clear the results for that relation.
- You can click on any word in any synset displayed on the page to start a new search.
- The process can be used to travrse deep in the Marathi wordnet.
तांत्रिक तपशील About the system
पानावर मजकूर दाखवण्यासाठी पीएचपी (PHP) व जावा स्क्रिप्टचा (JavaScript) वापर केला आहे.शाब्दबंधातील नोंदीचा साठा (डेटाबेस) मायएसक्यूएलमध्ये (MySql) नोंदवला आहे. आणि फेडोरा कोअर (Fedora Core) वापरून ही लिनक्स प्रणाली काम करते.
The interface uses the PHP and Javascript to display dynamic content dynamically. The database uses MySql and the system is hosted on a Fedora Core Linux machine.
अडचण असल्यास ashishfa[at]cse. iitb. ac. in ह्या पत्त्यावर आशिष ह्यांच्याशी संपर्क साधावा.
[at] च्या जागी @ हे चिन्ह घाला.
For any queries contact ashishfa[at]cse. iitb. ac. in
.
.