Resource Center For Indian Language Technology Solution

सौंदर्यशास्त्राचे स्वरूप । 1
1।1
कोणत्याही विषयाच्या व्यवस्थित व तर्कशुद्ध अभ्यासाला आपण शास्त्र म्हणतो। तर्कशास्त्र, खगोलशास्त्र, भाषाशास्त्र, नीतिशास्त्र, रसायनशास्त्र इत्यादि नावे हीच गोष्ट मनावर ठसवितात। परंतु थोडे खोलात गेल्यास असे लक्षात येईल की, या सर्व शास्त्रांची उद्िष्टे व पद्धती एक नाहीत। त्यांतली काही शास्त्रे अनुभवजन्य ज्ञानाच्या शोधात असतात व ते प्राप्त करून घेण्यासाठी विशिष्ट पद्धतींचा वापर करतात। या शास्त्रांचा एक स्वतंत्र गट होतो। या गटातील शास्त्रांना विज्ञान हे नाव देता येईल। या गटाबाहेर असणारी शास्त्रे उद्िष्ट व पद्धती या दोन्ही बाबतींत विज्ञानांपेक्षा वेगळी आहेत, असे लक्षात येते। आता आपल्यापुढे प्रया> आहे तो असा की सौंदर्यशास्त्र हे एक विज्ञान आहे का? एका विशिष्ट विषयाचा व्यवस्थित व तर्कशुद्ध अभ्यास त्यात होत असल्याने त्याला शास्त्र ही पदवी जरी प्राप्त झालेली असली तरी त्याला विज्ञान म्हणता येईल का? सौंदर्यशास्त्र हे एक विज्ञान आहे अशी समजूत मराठीत मूळ धरू लागली आहे। आपल्याकडे सौंदर्यशास्त्राविषयी जो दबदबा आहे तो हेच दाखवितो। सौंदर्यशास्त्रज्ञाची मते कितीही चमत्कारिक वाटली तरी शेवटी ती खरी म्हणून स्वीकारावी लागणारच असा पुष्कळ टीकाकारांचा विश्वास असतो। आपल्याला जमीन सपाट दिसते, परंतु पृथ्वी गोल आहे हे भूगोलविज्ञानातील विधान आपण खरे म्हणून स्वीकारतोच। तोच प्रकार सौंदर्यशास्त्रातील विधानांतील बाबतीत घडू लागला आहे। सौंदर्यशास्त्र हे विज्ञान आहे असा दावा करणे म्हणजे पर्यायाने असे म्हणणे की (अ) इतर विज्ञानांना जसा आपला अभ्यासाचा खास प्रांत असतो तसा सौंदर्यशास्त्रालाही स्वतःचा असा एक खास प्रांत आहे; उदाहरणार्थ, कलाकृती व निसर्गातील सौंदर्य। (आ) इतर विज्ञानांत सत्यसंशोधनाची जी पद्धती वापरण्यात येते तीच सौंदर्यशास्त्रातही वापरण्यात येते। (इ) या पद्धतीचा वापर करून सौंदर्यशास्त्र आपल्या अभ्यासक्षेत्रातील वस्तुस्थितीचा नियम शोधून काढते व अशा रीतीने वस्तुस्थितीचा अर्थ लावते। हे नियम अर्थातच इतर सृष्टिनियमांसारखेच असतात। सौंदर्यशास्त्र हे स्वतंत्र विज्ञान आहे असे मानणारे भाबडे लोक फार वमवचित आढळतात। पण सौंदर्यशास्त्र हे मनोविज्ञानाचे एक उपांग आहे असे मानणारे लोक पुष्कळ आहेत। मनोविज्ञानाची मदत घेऊन सौंदर्यशास्त्रावर मराठीत लेखन होऊ लागले आहे। या मदतीशिवाय सौंदर्यशास्त्रावर व्यवस्थित विचार होऊच शकणार नाही अशा विश्वासाने हे लेखन प्रेरित झाले आहे यात काहीच शंका नाही। हा विश्वास निर्माण होण्याची कारणे सहज सापडतील अशी आहेत। सौंदर्याविषयी बोलताना आपण ज्या संकल्पना वापरतो त्या बहुतेक मानसव्यवहाराबद्दलच्या आहेत। उदाहरणार्थ, आल्हाद, आनंद, भावना, प्रेरणा, कल्पनाशक्ती, एकचित्तता, आस्था इत्यादी। मानसव्यवहार हा मनोविज्ञानाचा खास प्रांत असल्यामुळे आपल्याला साहजिकच असे वाटते की, मनोविज्ञान आपल्याला अवगत झाले की, सौंदर्यविषयीचे प्रया> चटदिशी सुटतील। कलेची निर्मिती व आस्वाद या दोन प्रक्रियांवर मनोवेज्ञानिकांनी जे लिहिले आहे त्यावरून वरील समजास पुष्टी मिळाल्यासारखी वाटते। उदाहरणार्थ, िस्पअरमनने आपल्या द क्रिएटिव्ह माइंड या पुस्तकात मनःकिल्पतांच्या नवनिर्मितीचे नियम दिले असून कलाक्षेत्रातील निर्मितीसुद्धा याच नियमांनुसार होते असा दावा केलेला आहे। काही प्रमाणात अशाच प्रकारचा दावा फ्राॅइडवाद्यांनीही केलेला आहे। कलानिर्मिती व कलास्वाद या प्रक्रिया मनोवेज्ञानिक सिद्धान्तांच्या चौकटीत बसविल्यामुळे आपली अशी साहजिकच धारणा होते की, ही चौकट एकदा कळली म्हणजे आपल्याला सौंदर्याचे, त्याच्या निर्मितीचे व आस्वादाचे मर्म कळलेच पाहिजे। याबाबत माझी भूमिका अशी आहे की, सौंदर्यशास्त्र हे स्वतंत्र विज्ञानही नव्हे विंढवा मनोविज्ञानाचे उपांगही नव्हे। याचे कारण असे की, सौंदर्यशास्त्र कोणत्याच प्रकारचे विज्ञान होऊ शकत नाही। सौंदर्यशास्त्राचे प्रया>, पद्धती व सिद्धान्त आणि विज्ञानाचे प्रया>, पद्धती व सिद्धान्त यांच्यात मूलगामी भेद आहेत। आणि त्यांची गलल्त करणे विषयाच्या अभ्यासाच्या दृष्टीने आfनष्ट आहे। विज्ञानाचे स्वरूप व पद्धती यांची माहिती करून घेतल्यास मी असे का म्हणतो याचा उलगडा होईल।
1।2
विज्ञानाची कार्ये अनेक आहेत। वस्तुस्थितीच्या घटकांचे वर्गीकरण व वियलेषण करणे, त्यांतील परस्परसंबंधांचे सार्वत्रिक नियम शोधणे, अशा नियमांच्या साहाय्याने अमुक घटना निश्चित अमुक वेळी होणारच असे वर्तविणे (ज्rा्ग्म्ूग्दह), या ज्ञानापासून मानवी जीवनाच्या साफल्यासाठी उपयोगी ठरेल अशी तंत्रविद्या (ूाम्प्हदत्दुब्) निर्माण करणे इत्यादी विज्ञानाची कार्ये समजण्यात येतात। पण तात्तविक दृष्टया यांपेकी सर्वांत प्रमुख कार्य म्हणजे सृष्टीतील संगती जाणणे, तिचे रहस्य उलगडणे हे होय। वस्तुस्थितीतील सुटयासुटया घटकांची माहिती होणे याला फारसे महत्त्व नाही; महत्त्व आहे ते या घटकांतील परस्परसंबंधांविषयीचे नियम सापडण्याला। असे नियम सापडणे म्हणजे सृष्टीतील घटकांचा व घटनांचा अर्थ लावणे होय। कोणतीही घटना समजणे म्हणजे ती कोणत्या सृष्टिनियमानुसार होते हे कळणे। काय केले असता काय होईल हे कळले म्हणजे विज्ञानाचे कार्य संपले असे नाही। विज्ञानाचा रोख जे घडते ते कोणत्या सृष्टिनियमानुसार घडते व कसे घडते हे शोधून काढण्यावर असतो। सृष्टीचे रहस्य जाणणे हे विज्ञानाचे ध्येय असते। विज्ञानाला स्वतःची अशी परंपरा असते। कोणताही वेज्ञानिक अशा परंपरेतच कार्य करतो। आधीच्या वेज्ञानिकांनी शोधून जतन केलेले सृष्टीचे ज्ञान त्याला पूर्वसंचित म्हणून मिळते व त्यात तो आपल्या शोधाची भर टाकत असतो। अशी एखादी घटना त्याच्या अवलोकनात येते की, जिचा अर्थ उपलब्ध ज्ञानाच्या जोरावर लावता येत नाही। असे झाले की, वेज्ञानिक समस्या निर्माण होते आणि तिच्या दडपणामुळे विज्ञानाची प्रगती होते। समस्या सोडविण्यासाठी नवे सृष्टिनियम शोधावे लागतात, जुन्या नियमांत बदल करावे लागतात, आणि काही काही वेळा जुना संकल्पनाव्यूह आfजबात बाजूला सारावा लागतो। विज्ञानात वापरण्यात येणाऱ्या पद्धतीला अभ्युपगमनिगामी (प्ब्ज्दूपूग्म्द ्ा्ल्म्ूग्न) पद्धती असे म्हणतात। या पद्धतीचे पुढील पायऱ्यांमध्ये वियलेषण करता येईल ः (1) समस्येचे पुथवमकरण करून तिचे घटक वेगळे करणे; (2) संबंधित अशा सर्व घटकांना एकत्रित करून कोणत्या तरी सामान्य गुणधर्माच्या साहाय्याने त्यांचे वर्गीकरण करणे; (3) या घटकांत सुसूत्रता आणण्यासाठी, घटनांचा अर्थ लावण्यासाठी, अभ्युपगम (प्ब्ज्दूपेग्े) सुचविणे; (4) हा अभ्युपगम बरोबर असेल तर काय काय घडायला पाहिजे ते तार्किक नियमांच्या साहाय्याने ठरविणे, विंढवा त्यांचे निगमन करणे; (5) हे जे जे घडायला हवे होते ते ते तसे घडते का याचा शोध घेणे आणि अशा रीतीने अभ्युपगम वस्तुस्थितीच्या कसोटीला लावून पाहणे। एकदोन उदाहरणांनी या पद्धतीचे स्वरूप स्पष्ट करता येईल। समजा, आपण घरी आल्यावर ध्यानात येते की, आपल्या घराला कुलूप नाही। आपल्या घरी इतर कोणी नसल्याने या गोष्टीचे आपल्याला आश्चर्य वाटते। आपण कुलूप लावायला विसरलो नाही याची खात्री असल्यास आपले आश्चर्य दुणावते। आपण साहजिकच अशी कल्पना करतो की, चोराने कुलूप तोडले असणार। आपण याचा पडताळा पाहण्यासाठी घरातील मौल्यवान वस्तू जागच्याजागी आहेत की नाहीत हे बघू लागतो। जर त्या गेलेल्या असतील तर चोर आला होता हे सिद्ध झाले असे आपण मानतो। घराला कुलूप नसणे या वस्तुस्थितीमुळे समस्या निर्माण झाली; ती सोडविण्यासाठी आपण चोर आला असावा हा अभ्युपगम मनात बाळगला आणि वस्तुस्थितीची कसोटी लावून तो बरोबर आहे की नाही हे तपासले। हे उदाहरण1 एका घटनेचे झाले। दुसरे उदाहरण एखाद्या नियमाचे घेऊ। उंच डोंगरमाथ्यावर असलेल्या गावी बटाटे उकडताना त्रास पडतो हा सर्वांचा अनुभव आहे। तेच बटाटे मुंबईसारख्या शहरात चटदिशी उकडतात। मग डोंगरमाथ्यावर असे का व्हावे? संशोधनाला उद्युक्त करणारी समस्या अशा रीतीने निर्माण होते। असे का होते याबद्दल आपल्याला दोनतीन कल्पना सुचू शकतील। उदाहरणार्थ, दोन्ही ठिकाणचे पाणी सारखे नसावे, दोन्ही ठिकाणांच्या उंची सारख्या नसल्याने असे होत असावे इत्यादी। समजा, आपण या दुसऱ्या कल्पनेचा पाठपुरावा करायचे ठरविले व त्याप्रमाणे इतर घटक प्रयोगासाठी समान केले। उपलब्ध ज्ञानाच्या जोरावर आपल्याला ही समस्या अशी सोडविता येते ः उंचीचा व वातावरणाच्या दाबाचा अन्योन्यसंबंध आहे। जितकी उंची जास्त तितका दाब कमी। तसेच, वातावरणाच्या दाबाचा व उत्कलनबिंदूचा (ंदग्त्ग्हु ज्दग्हू) अन्योन्यसंबंध आहे। जितका दाब कमी तितका उत्कलनबिंदू कमी। म्हणजे जितकी उंची जास्त तितका उत्कलनबिंदू कमी। म्हणजे उंच जागी कमी उष्णता असतानाच पाणी उकळू लागते, पण पाणी उकळले तरी बटाटे उकडत नाहीत, कारण तेवढी उष्णता बटाटे उकडायला पुरेशी पडत नाही। उंच ठिकाणी बटाटे उकडत नाहीत या घटनेचा अर्थ नित्य सृष्टिनियमांच्या साहाय्याने लागला। हे सृष्टिनियम प्रथम अभ्युपगमच होते। पण अवलोकनाने व प्रयोगांनी ते सृष्टिनियम आहेत हे सिद्ध झाले। आपल्या उदाहरणातील उत्तराचा खरेपणा पडताळून पाहायचा आणखी एक मार्ग आहे। तो म्हणजे उंच ठिकाणी प्रेशर कुकरमध्ये बटाटे शिजवायचे। या रीतीने बटाटे चटदिशी उकडतील, कारण कृत्रिमरीत्या कुकरमध्ये दाब वाढविलेला असतो। तिसरे उदाहरण मानसव्यवहाराबद्दलचे आहे। माणूस आजारी पडला म्हणजे त्याला शारीरिक कारणे असतात असे आपण धरून चालतो। पण काही वेळा शरीर सुस्थितीत असतानादेखील माणसांना आजार होतो। या आजाराचे कारण मानसिक असले पाहिजे असा फ्राॅइडने कयास केला। पण या कारणांची रोग्याला जाणीव नसल्याने ही कारणे जाणिवेच्या पलीकडे असलेल्या मनोव्यापारांत शोधली पाहिजेत असाही त्याने कयास केला। या मनोव्यापारांचा संपूर्ण आराखडा फ्राॅइडने तयार केला, आणि अनेक रोग्यांवर उपचार करताना त्याला आपल्या कल्पनेच्या खरेपणाचा पडताळा आला। तसेच आपण बोलताना, लिहिताना ज्या चमत्कारिक व एरव्ही अनाकलनीय ठरतील अशा चुका करतो त्यांच्यावर, आणि आपली स्वप्ने, दिवास्वप्ने, मनोविकृती, आपल्या सांस्कृतिक जीवनाची काही वेशिष्टये, चमत्कृतिजन्य विनोद इत्यादिकांवरही या सिद्धान्तामुळे नवा प्रकाश पडला। वस्तुस्थितीच्या अवलोकनामुळे फ्राॅइडच्या अभ्युपगमाला भवमकम पाया मिळाल्याने तो मनोविज्ञानात व वेद्यकशास्त्रात महत्त्वाचा सिद्धान्त म्हणून प्रस्थापित झाला। येथवर आपण विज्ञानाचे कार्य व पद्धती यांचा थोडवमयात विचार केला। आता प्रया> असा की यांत व सौंदर्यशास्त्राचे कार्य व पद्धती यांत एकवावमयता आहे का? विज्ञानात जशा अवलोकन, वर्गीकरण, अभ्युपगम व त्याला वस्तुस्थितीची कसोटी लावणे या पायऱ्या असतात तशा सौंदर्यशास्त्रात असतात का? सौंदर्यशास्त्रीय सिद्धान्त वेज्ञानिक सिद्धान्तासारखा प्रस्थापित होतो का? थोडा विचार केल्यास सौंदर्यशास्त्र व विज्ञान यांच्यातील साम्यभेद लक्षात येऊ लागतात। त्यांतील काहींचा आपल्याला विचार करायचा आहे। वर दिलेल्या उदाहरणांवरून एक गोष्ट स्पष्ट होते ती ही की वस्तुस्थितीची ओळख पटण्यासाठी आपल्याला सिद्धान्त लागत नाही; सिद्धान्ताची जरूरी ओळखलेल्या वस्तुस्थितीचा अर्थ लावण्यासाठी लागते। उदाहरणार्थ, उंच जागी बटाटे उकडत नाहीत हे आपल्याला कोणत्याही सिद्धान्ताशिवायच कळते। ते का उकडत नाहीत हे कळायला मात्र सिद्धान्त लागतो। म्हणजे उपपत्तिनिरपेक्ष (ूपदrब्-हाल्ूraत्) अशी वस्तुस्थिती असते आणि कोणत्याही अभ्युपगमाशिवाय आपण ती ओळखू शकतो, असे आपण विज्ञानात मानतो। आपण असे मानतो म्हणूनच विज्ञान शवमय झाले आहे। उपपत्तिनिरपेक्षतेच्या या मुद्दयाचे थोडे आfधक स्पष्टीकरण करायला हवे। या मुद्दयावरून असा निष्कर्ष निघत नाही की, वेज्ञानिक अवलोकनात सेद्धािन्तक असा भाग आfजबात नसतो। असा भाग काही प्रमाणात असणे अपरिहार्यच आहे। उदाहरणार्थ, सूर्य पूर्वेकडे उगवताना व पश्चिमेकडे मावळताना दिसला तरी पृथ्वी सूर्याभोवती पिढरते हीच आजच्या मानवाच्या दृष्टीने वस्तुस्थिती आहे। आणि या वस्तुस्थितीच्या अवलोकनात सेद्धािन्तक भाग आहे ही गोष्ट निर्विवाद आहे। वेज्ञानिक अवलोकनात उपपत्तिनिरपेक्षता असते याचा अर्थ इतकाच की, जे सिद्ध करायचे आहे ते अवलोकनातच गृहीत धरलेले नसते; त्या विशिष्ट सिद्धान्ताच्या मदतीशिवाय अवलोकन व वर्गीकरण शवमय असते। उपपत्तिनिरपेक्ष वस्तुस्थितीचा दाब सिद्धान्तावर सारखा असतो म्हणून विज्ञान शवमय होते व त्यात प्रगती होते। या विवेचनावर असा आक्षेप घेता येईल की, ज्ञानाची क्रिया ही केवळ उपपत्तिनिरपेक्ष वस्तुस्थितीचे स्वरूप नोंदण्याची क्रिया नसते। कोणतेही ज्ञान शवमय व्हावयाचे असेल तर मानवनिर्मित, अनुभवपूर्व संकल्पनांचा व्यूह त्यासाठी अवश्यमेव पाया म्हणून लागतोच। अवकाश, काल व मनespान्य कोटी (म्aूाुदrगे) यांच्या व्यूहाला कांटने जे महत्त्व दिले ते यामुळेच। कांटच्या सिद्धान्ताचे सार असे की, या संकल्पनाव्यूहामध्यें आलेल्या गोष्टीच मानवी अनुभवाचा विषय होऊ शकतात। म्हणजे पर्यायाने असे म्हणावे लागते की अंतिम अर्थाने उपपत्तिनिरपेक्ष अशा गोष्टी अनुभवाचा विषय होऊ शकत नाहीत। पण थोडा विचार केल्यास उपपत्तिनिरपेक्ष वस्तुस्थिती नाकारणे हा कांटचा उद्देश नव्हता हे ध्यानात येईल। कारण मनespान्य अशा कोटींबरोबर मनाने केवळ ग्रहण केलेल्या संवेदनांची सामग्रीही ज्ञानप्रक्रियेत लागते असे कांट मान्य करतो। मनespान्य कोटींच्या जोरावर प्रत्येक घटनेला कारण असलेच पाहिजे असे आपण ठामपणे म्हणू शकतो। परंतु क्ष या घटनेचे य हे कारण आहे हे काही आपण केवळ मनespान्य कोटींच्या जोरावर म्हणू शकत नाही। त्यासाठी आपल्याला मनाबाहेरून आलेल्या व मनाने केवळ ग्रहण केलेल्या घटकांवर अवलंबून राहावे लागते। याचा अर्थ असा की, ज्ञानात मनespान्य कोटींचा व्यूह जसा लागतो तसा उपपत्तिनिरपेक्ष घटकही लागतो। केवळ पहिल्याच्या जोरावर विशिष्ट सृष्टिनियम आपल्याला कळणार नाहीत। विशिष्ट सृष्टिनियमांची समष्टी निर्माण करायची असेल तर उपपत्तिनिरपेक्ष घटकाकडे वळण्याखेरीज गत्यंतर नाही। पण यावर असा आक्षेप येईल की, मनespान्य घटकांची जरूरी विशिष्ट सृष्टिनियम शोधण्याकरतादेखील लागते। टूल्मिनचे याबद्दलचे विवेचन महत्त्वाचे आहे। त्याच्या म्हणण्याप्रमाणे विज्ञानाला सुरूवातीपासून कोणते तरी निसर्गव्यवस्थेचे आदशर् (ग््ाaत्े दf हaूल्raत् दr्ी) लागतातच। हा सेद्धािन्तक घटक असून तो बहुतांशी अनुभवपूर्व म्हणावा लागेल। अशा सेद्धािन्तक घटकांशिवाय सृष्टिनियम शोधणे अशवमय असते।2 हे निसर्गव्यवस्थेचे आदशर् वेगवेगळे असू शकतात। हे आदशर् जर पूर्णपणे वेगळे असतील तर त्यांच्या भिन्न चौकटींमध्ये काम करणाऱ्या दोन वेज्ञानिकांना एकमेकांची भाषासुद्धा कळणार नाही।3 जर वेगवेगळे आदशर् शवमय असतील तर त्यांपेकी कशाची निवड करायची हे कसे ठरते? त्यांपेकी ज्यांच्यात सेद्धािन्तक निर्मितीक्षमता जास्त असेल ते आदशर् आपण स्वीकारतो।4 परंतु एखाद्या संकल्पना व्यूहाची निर्मितीक्षमता म्हणजे काय? त्या व्यूहाचा अंगीकार केल्याने वस्तुस्थितीचा जास्तीत जास्त चांगल्या रीतीने व अगदी तपशिलवार अर्थ कळायला हवा। त्या व्यूहामुळे निर्माण झालेले नियम व पोटनियम असे असायला हवेत की ज्यामुळे वास्तवाच्या जास्तीत जास्त भागावर प्रकाश पडेल। टूल्मिनला आfभप्रेत असलेला हा संकल्पनाव्यूह कांटच्या संकल्पनाव्यूहासारखा केवळ मनespान्य नव्हे हे निश्चित। अनुभवजन्य ज्ञानाच्या ताणामुळे त्यात फरक पडतात म्हणून त्यात अनुभवजन्यतेचा वाटा आला। त्यात ग्रथित झालेले ज्ञान सर्व कुत्रे भुंकतात। या ज्ञानासारखे पूर्णांशाने अनुभवजन्य नव्हे। परंतु प्रत्येक घटनेला कारण असतेच। यासारखे ते पूर्णपणे अनुभवपूर्वही नव्हे। या संकल्पनांचे स्वरूप सृष्टीला विचारलेल्या प्रया>ांसारखे असते असे म्हणता येईल। प्रया> विचारले नाहीत तर सृष्टी कसलेच उत्तर देणार नाही व कसलेच ज्ञान प्राप्त होणार नाही। म्हणून प्रया> विचारणे ही ज्ञानार्जनाची पहिली पायरी होय। असे प्रया> घेऊन सृष्टीकडे गेल्यावर मात्र सृष्टी जे सांगेल ते ग्राह्य धरायचे असते। कधी कधी सृष्टी आपल्याला आपले प्रया> बदलायलाही सांगेल। याचा अर्थ असा की, आपले प्रया> जरी काही अंशाने अनुभवपूर्व असले तरी त्या प्रया>ांच्या पलीकडे उपपत्तिनिरपेक्ष वास्तव आहे हे मानावेच लागते।5 वरील विवेचनाचा निष्कर्ष असा की विज्ञानात उपपत्तिनिरपेक्ष वस्तुस्थितीची केवळ नोंद घेण्याची प्रक्रिया चाललेली नसते। विज्ञानातही मनespान्य अशा संकल्पनाव्यूहाची फार गरज असते। नवे संकल्पनाव्यूह सुचणे हे वेज्ञानिकाच्या प्रतिभेमुळेच शवमय होते यात काहीच शंका नाही। कलावंताला जशी प्रतिभेची देणगी असायला हवी तशी ती वेज्ञानिकालाही हवी। अर्थात वेज्ञानिकाच्या प्रतिभेतून असंख्य संकल्पनाव्यूह निघू शकतात, पण त्यांतल्या काहींनाच विज्ञानात स्थान मिळते। कारण अखेरीस वस्तुस्थितीची कसोटी प्रत्येक व्यूहाला लावावीच लागते, आणि त्या कसाला काही व्यूहच उतरतात। म्हणजे मनespान्य अशा घटकांचे विज्ञानातील महत्त्व कितीही मोठे असले तरी अखेरीस उपपत्तिनिरपेक्ष वस्तुस्थितीचा अंकुश त्याला टाळता येत नाही। कारण, आहे त्या वस्तुस्थितीचा उलगडा करणे हेच विज्ञानाचे कार्य असते। कोणताही अभ्युपगम विंढवा निसर्गव्यवस्थेचा आदशर् प्रस्थापित करण्यासाठी तत्त्वतः उपपत्तिनिरपेक्ष अशा वस्तुस्थितीचा आधार आवश्यक असतो। सौंदर्यशास्त्रातील सिद्धान्त अशाच रीतीने प्रस्थापित होतात का? ते अभ्युपगम विंढवा निसर्गव्यवस्थेचा आदशर् यांसारखे असतात का? त्यांना आपण वस्तुस्थितीची कसोटी लावतो का? प्रथमदशर्नी पाहता या प्रया>ांना होकारार्थी उत्तरे द्यायला हवीत असे आपल्याला वाटेल। परंतु जास्त विचार केल्यास अशी उत्तरे देता येणार नाहीत असे दिसेल। विज्ञानाची सुरूवात वस्तुस्थितीतले घटक ओळखून त्यांच्या वर्गीकरणाने होते। या घटकांतील परस्परसंबंध शोधून काढणे ही पुढची पायरी होय। या पायरीवर अभ्युपगम व संकल्पनाव्यूह यांची गरज भासते। परंतु प्राथमिक पायरीवरची कामे या संकल्पनाव्यूहावर अवलंबून नसतात। सौंदर्यशास्त्रात मात्र असे घडताना दिसत नाही। येथे अगदी प्राथमिक वर्गीकरणासाठीच एखाद्या सिद्धान्ताची विंढवा संकल्पनाव्यूहाची गरज लागते। समजा, सौंदर्यशास्त्राला सौंदर्यात्मक वस्तुस्थिती (aोूपूग्म् faम्ू) एका बाजूला काढायची आहे। जगातील सर्व वस्तु या वर्गात मोडत नाहीत, कारण त्यांच्यापेकी काही निश्चित अ-सुंदर (हदह-ंाaल्ूग्fल्त्) असतात।6 मग अ-सुंदरापासून सुंदर वस्तू वेगळया कशा काढता येतील? त्यासाठी कोणता तरी निकष वापरावा लागेल। पण हा निकष कोणता व तो कसा मिळाला? सुंदर वस्तू सुंदर म्हणून वेगळया काढल्या असे म्हणता येणार नाही; कारण असे म्हटल्यास त्याचा अर्थ असा होईल की विशिष्ट गोष्टींना एका वर्गात टाकून त्यांच्यातील समान गुण शोधायचा हा आपला हेतू वर्गीकरणाच्या आधीच सिद्ध झालेला होता। जर सौंदर्याचे तत्त्व आपण वर्गीकरणासाठी वापरले तर वर्गीकरण करण्याच्या आधीपासून ते आपल्याला ठाऊक होते असे म्हणावे लागेल। ज्यावर वर्गीकरण आधारले ते तत्त्व वर्गीकरणाने व अवलोकनाने सिद्ध झाले असे म्हणता येणार नाही। या अगदी प्राथमिक वर्गीकरणातच एखादा सिद्धान्त अनुस्यूत असतो। हे पटायला थोडा वेळ लागतो, कारण बहुतेक वेळा हा सिद्धान्त आपल्या मनात अस्फुट विंढवा अर्धस्फुट स्वरूपात असतो।
1।3
या ठिकाणी विधानांचे संयलेषणात्मक व वियलेषणात्मक असे वर्गीकरण केल्यास आपल्यापुढे असलेल्या प्रया>ावर आfधक प्रकाश पडेल। कांटने हे वर्गीकरण पुढे दिल्याप्रमाणे केले आहे। विधानात उद्देश्य व विधेय यांच्यात संबंध प्रस्थापित केलेला असतो। ज्या विधानांतील विधेय उद्देश्याचाच भाग असते अशी विधाने वियलेषणात्मक असतात। कारण उद्देश्यपदाची फोड करणे इतकेच कार्य या विधानांकडून होते। उलटपक्षी, काही विधानांत विधेय हे उद्देश्यात अंतभूर्त नसते, ते उद्देश्याला विधानाच्या द्वारा जोडले जाते। अशा विधानांना संयलेषणात्मक विधाने म्हणतात।7 कांटने वस्तूला विस्तार असतो। हे विधान वियलेषणात्मक विधानाचे उदाहरण म्हणून दिले आहे। कारण वस्तूच्या संकल्पनेतच तिला विस्तार असण्याची संकल्पना अंतभूर्त आहे। उलट वस्तूला वजन असते। हे विधान संयलेषणात्मक आहे। कारण वजन असण्याची संकल्पना वस्तूच्या संकल्पनेत अंतभूर्त नाही।8 वियलेषणात्मक विधाने अनुभवावर आधारलेली नसतात; ती केवळ तार्किक नियमानुसार करता येतात। उलट, संयलेषणात्मक विधाने अनुभवावर आधारलेली असतात। त्याचप्रमाणे असेही म्हणता येते की अनुभवावर आधारलेली विधाने संयलेषणात्मकच असतात।9 विज्ञानातील विधाने अनुभवजन्य असतात। वस्तुस्थितीच्या अवलोकनावर ती आधारलेली असल्याने ती केवळ तार्किक नियमांवर आधारलेली नसतात हे उघड आहे। विज्ञानातील विधाने संयलेषणात्मक असतात हे यावरून स्पष्ट होईल। आता प्रया> असा की सौंदर्यशास्त्रातील विधाने संयलेषणात्मक असतात का? सौंदर्यविधानांचे दोन वर्ग करणे जरूर आहे ः (1) सौंदर्यतत्त्व ग्रथित करणारी विधाने विंढवा सौंदर्यसिद्धान्त सांगणारी विधाने; आणि (2) विशिष्ट सुंदर वस्तूंबद्दलची विधाने। यांपेकी दुसऱ्या वर्गातील विधाने संयलेषणात्मक असतात याबद्दल वाद नाही। प्रया> आहे तो पहिल्या वर्गातील विधानांविषयी। काव्य म्हणजे रसात्मक वावमय हे विधान पाहा। हे विधान काव्याची व्याख्या देते म्हणून ते वियलेषणात्मक म्हणायला हवे। कारण व्याख्येमध्ये उद्देश्यपदाच्या अर्थाची नुसती फोड केली जात असल्याने व्याख्या देणारे विधान वियलेषणात्मकच असते। तेव्हा काव्य म्हणजे रसात्मक वावमय हे विधान विज्ञानातील विधानांसारखे संयलेषणात्मक विधान नाही हे उघड आहे। येथे दोन प्रया> निर्माण होतात ः (1) सौंदर्यसिद्धान्त ग्रथित करणारी विधाने संयलेषणात्मक असूच शकत नाहीत का? (2) विज्ञानात वियलेषणात्मक विधाने नसतातच का? या दोन्ही प्रया>ांना होकारार्थी उत्तरे मिळाली तर सौंदर्यशास्त्र व विज्ञान यांच्यातील भेद कमी करता येईल, म्हणून हे प्रया> महत्त्वाचे आहेत। (1) समजा, आपण असे म्हटले की, रसात्मक वावमय काव्य असते। येथे म्हणजे या शब्दाचा उपयोग टाळला आहे। कारण आता आपण काव्य या संज्ञेचा अर्थ रसात्मक वावमय असा देत नाही। काव्यत्व व रसात्मक वावमयत्व हे दोन गुणविशेष नेहमी साहचर्याने असतात इतकेच आपल्याला सांगायचे आहे। हे दोन गुणविशेष एकच नसल्याने आणि त्यांतील एकाचा अंतर्भाव दुसऱ्यात झालेला नसल्याने वरील विधान संयलेषणात्मक ठरते। याचा अर्थ असा की सौंदर्यसिद्धान्त ग्रथित करणारी विधाने संयलेषणात्मक असू शकतात। हे जरी खरे असले तरी सौंदर्यशास्त्रीय विधाने वेज्ञानिक विधानांसारखी ठरत नाहीत। कारण विधाने संयलेषणात्मक असली तरी ती केवळ निकष सांगणारी विधाने असतात। काव्य कसे ओळखावे हे आपल्याला वरील विधानांमुळे कळते। पण हा निकष कसा मिळाला? अनेक काव्ये वाचून तो मिळाला असे म्हणता येणार नाही। कारण काव्ये काव्ये म्हणून वाचली याचा अर्थच असा की ती काव्ये आहेत हे आपल्याला ओळखता आले। आणि ती ओळखण्यासाठीच आपण निकष वापरला। म्हणजे काव्ये वाचून काव्याचा निकष मिळाला असे म्हणणे बरोबर नाही। येथे एक पेच पडतो। काव्ये वाचून काव्याचा निकष मिळाला नाही हे खरे, त्याप्रमाणे एकही काव्य न वाचता तो निकष मिळाला असे म्हणता येत नाही हेही खरे। काव्याचा अनुभव तर हवा; परंतु काव्याच्या निकषाबद्दलचे विधान सामान्य अर्थाने अनुभवजन्य म्हणता येत नाही। असा पेच इतरत्रही पडतो। काही संयलेषणात्मक विधाने अशी असतात की, ती अनुभवपूर्वही नसतात आणि सामान्य अर्थाने अनुभवजन्यही नसतात। सामान्यपणे अनुभवजन्य विधानांना अनुभवाचे व अवलोकनाचे भरपूर पाठबळ लागते। पण वर उलल्ेखिलेल्या विधानांचे असे नसते। समजा, आपण एक गुलाबी रंगाचा पट्टा व एक तांबडया रंगाचा पट्टा पाहिला आणि तांबडा पट्टा गुलाबी पट्टयापेक्षा जास्त गडद आहे हे आपल्याला कळले। या एकाच उदाहरणाच्या जोरावर कोणताही तांबडा पट्टा कोणत्याही गुलाबी पट्टयापेक्षा गडद असतो असे आपण म्हणू शकतो। हा सार्वत्रिक निष्कर्ष ज्या पद्धतीने काढला तिला प्रातिभ विगमन (ग्हूल्ग्ूग्न indल्म्ूग्दह) असे नाव आहे।10 अनुभवावर आधारलेले सामान्यविषयीचे हे ज्ञान असल्याने त्याला विगमन म्हणायचे। पण पहिल्या उदाहरणातच आपल्याला सामान्याच्या स्वरूपाचा झटितिप्रत्यय आला म्हणून त्याला प्रातिभ म्हणायचे। जर काव्याचा निकष अशा झटितिप्रत्ययाने आपल्याला मिळाला असेल तर तो सृष्टिविज्ञानांच्या नियमांप्रमाणे अनुभवजन्य म्हणता येणार नाही। कारण, पहिल्याच उदाहरणात आपल्याला जे मिळाले त्याला अभ्युपगमाचे स्वरूप नव्हते; आपल्याला तत्त्वाचेच प्रातिभ ज्ञान झाले। (2) आपला दुसरा प्रया> असा की विज्ञानात वियलेषणात्मक विधाने नसतातच का? ज्याअर्थी विज्ञानात व्याख्या देणारी विधाने असतात त्याअर्थी विज्ञानात वियलेषणात्मक विधानेही असतात; कारण व्याख्या सांगणारे विधान वियलेषणात्मक असते हे आपण वर पाहिलेच आहे। पण विज्ञानातील सिद्धान्त व्याख्येच्या स्वरूपाचे नसतात। इतकेच नव्हे, तर पाॅपरसारख्या काही तत्त्वज्ञांच्या मते विज्ञानात व्याख्येला फारसे महत्त्वही नसते। विज्ञानातील व्याख्या डावीकडून उजवीकडे वाचण्याऐवजी उजवीकडून डावीकडे वाचाव्यात असे त्यांचे मत आहे। डावीकडून उजवीकडे अशी व्याख्या वाचली की डावीकडच्या संज्ञेला अवास्तव महत्त्व प्राप्त होते। त्या संज्ञेने कसल्या तरी तत्त्वाचा निर्देश होतो व व्याख्येत त्या तत्त्वाचे स्वरूप विशद केले जाते अशी आपली समजूत होते। पण उजवीकडून डावीकडे अशी व्याख्या वाचली की जिची व्याख्या आपण वाचत आहोत ती संज्ञा केवळ कालापव्यय टाळण्यासाठी वापरलेले चिन्ह आहे हे आपल्याला कळते। उदाहरणार्थ, ग्रह म्हणजे क्ष, य, ज्ञ, हे गुणधर्म असलेला पदार्थ ही व्याख्या घ्या। दर वेळी क्ष, य, ज्ञ हे गुणधर्म असलेला पदार्थ इतके सर्व म्हणणे म्हणजे कालापव्यय करणे होय; त्यासाठी आपण एखादे छोटेसे चिन्ह वापरतो; ते म्हणजे ग्रह ही संज्ञा।11 याउलट, सौंदर्यशास्त्रात त्यातील मध्यवर्ती संज्ञांच्या व्याख्यांना फार महत्त्व आलेले दिसते। व्याख्येविषयी पाॅपरने घेतलेली भूमिका कोणत्याही सौंदर्यशास्त्रज्ञाने घेतलेली नाही। असे म्हणण्यात येते की, विज्ञानाची सुरूवात व्याख्येपासून होते; उलटपक्षी, सौंदर्यशास्त्राची परिणती व्याख्येत होते। सौंदर्यशास्त्रावरील एखाद्या ग्रंथातील विवेचनाचे वियलेषण केल्यास असे ध्यानात येईल की, हे सर्व विवेचन मुख्य सिद्धान्ताला जास्त ठाशीवपणा व स्पष्टता आणून देण्यासाठीच चाललेले आहे। उदाहरणार्थ, कांटने केलेले सौंदर्याचे विवेचन पाहा। कांटला सौंदर्यानुभव स्वतंत्र व स्वायत्त आहे असे दाखवायचे होते। अर्थात ज्ञानानुभव व नीतिव्यवहार यांच्यापेक्षा सौंदर्यानुभव निराळा आहे असे सिद्ध करणे क्रमप्राप्त ठरले; कारण त्याने मानवी व्यवहारांचे जे एकूण वर्गीकरण केले होते त्याप्रमाणे सौंदर्यानुभव स्वायत्त व स्वतंत्र आहे असे सिद्ध करणे म्हणजेच तो ज्ञानानुभव व नीतिव्यवहार यांच्यापेक्षा वेगळा आहे हे सिद्ध करणे होय। तसेच केवळ शारीरिक सुखसंवेदनेपेक्षा सौंदर्याचा आस्वाद वेगळा आहे हे दाखविणेदेखील अगत्याचे होते। सौंदर्यानुभवाची स्वायत्तता सिद्ध करणे म्हणजे एका बाजूस तो देहिक सुखापासून वेगळा काढणे व दुसऱ्या बाजूस ज्ञानानुभव व नेतिक व्यवहार यांच्यापासून वेगळा काढणे होय। आणि कांटने आपल्या क्रिटिक आॅफ जजमेंट या ग्रंथामध्ये बरोबर हेच केले आहे। त्याच्या विवेचनातील चार अंगे (श्दसहूे) एकाच मध्यवर्ती सिद्धान्ताच्या चार बाजू आहेत। त्यात मध्यवर्ती सिद्धान्ताच्या पुष्टयर्थ चार तऱ्हेचा पुरावा दिलेला आहे असे म्हणता येत नाही, कारण या अंगांचे कार्य पुरावा देणे हे नाहीच। त्यांचे खरे कार्य मुख्य सिद्धान्ताला चार बाजूंनी स्पष्टपणा व नेकमेपणा मिळवून देणे इतकेच आहे। विज्ञानातील सिद्धान्तांवरील पुस्तकात मात्र याच्यापेक्षा वेगळया गोष्टी आढळतात। एक तर त्यांतील सिद्धान्त एकमेकांची नुसती फोड करताना दिसायचे नाहीत। आणि दुसरे म्हणजे त्यांत अनुभवजन्य पुरावा सिद्धान्ताच्या पुष्टयर्थ मांडलेला दिसेल।
1।4
याखेरीज विज्ञानातील व सौंदर्यशास्त्रातील सिद्धान्तांमध्ये असलेला एक महत्त्वाचा फरक असा की, विज्ञानात दोन परस्परविरोधी सिद्धान्त फार काळ सारखेच ग्राह्य मानले जात नाहीत। त्यांतील एकाचा विजय होतो व दुसरा अग्राह्य ठरतो। कोणता सिद्धान्त खरा हे ठरविण्याचा एक निश्चित मार्ग म्हणजे दोन्ही सिद्धान्त परिस्थितीच्या कसोटीस लावणे हा होय। उपपत्तिनिरपेक्ष परिस्थिती असते म्हणूनच सिद्धान्त कसास लावता येतात। यामुळेच विज्ञान प्रगतिपथावर आहे असेही म्हणता येते। सौंदर्यशास्त्राचा इतिहास जर थोडा तटस्थपणे पाहिला तर प्रगतीची संकल्पना तेथे लागू पडत नाही असे लक्षात येईल। या क्षेत्रातील विविध सिद्धान्तांत संघर्ष चाललेला दिसतो। परंतु एखादा सिद्धान्त पूर्णपणे पराभूत होऊन काळाच्या उदरात कायमचा गडप झाल्याचे दिसत नाही। एखादा सिद्धान्त काही काळ लुप्त झाल्यासारखा वाटला तरी तो पुन्हा प्रकट होतो व मान्यताही पावतो। कलेची सामग्री सतत बदलत असते, पण कलेत प्रगती होते असे नाही, असे एलियटने म्हटले आहे।12 त्याच अनुरोधाने आपण असेही म्हणू शकतो की, सौंदर्यविचारात बदल होतात, पण प्रगती होते असे नाही। सौंदर्यविचारात प्रगती होते असे काही सौंदर्यशास्त्रज्ञांनी म्हटले आहे हे खरे। उदाहरणार्थ, बोझंकिटच्या हिस्टरी आॅफ इस्थेटिक या ग्रंथाची सर्व इमारत या विश्वासाच्या पायावर उभी राहिलेली आहे। विश्वचेतन्यवादी (aंेदत्ल्ूा ग््ाaत्ग्ेू) सौंदर्यसिद्धान्त हा सौंदर्यविचाराचा कळस असून प्लेटोपासून कांटपर्यंतचे सर्व सिद्धान्त त्याचा पाया, भिंती इत्यादींसारखे आहेत; जे इतरांना अर्धस्फुट होते ते विश्वचेतन्यवाद्यांनी सुस्पष्टपणे पाहिले, असा बोझंकिटचा आfभप्राय आहे। जर वस्तुस्थिती खरीच अशी असती तर विश्वचेतन्यवाद्यांच्या सिद्धान्तानंतर कोणताच वेगळा सिद्धान्त पुढे आला नसता। पण तसे घडले नाही। इतर सिद्धान्त पुढे आले इतकेच नाही तर त्यांतले काही मान्यताही पावले। कलाविचारात प्रगती होते हा विचार प्रा। ग। त्र्यं। देशपांडे यांच्या मनात असावा असे त्यांचे भारतीय साहित्यशास्त्र वाचताना वाटते। संस्कृत काव्यशास्त्राच्या परंपरेचा परमोच्च बिंदू म्हणजे रस-ध्वनिसिद्धान्त, इतर सिद्धान्त त्यांच्या खालच्या पायऱ्या आहेत, असा प्रा। देशपांडे यांच्या विवेचनाचा रोख दिसतो। परंतु हा विचारदेखील पटण्यासारखा नाही। रस-ध्वनिसिद्धान्त संस्कृत साहित्यशास्त्रातील अखेरचे सर्वमान्य सिद्धान्त नाहीत। त्यांच्यामुळे वक्रोक्तिपरंपरा कायमची नेस्तनाबूत झाली असे म्हणता येत नाही; आणि प्राचीन भारतात काव्यशास्त्राची परंपरा नंतर नाहीशी झाली नसती तर आणखीही सिद्धान्त पुढे येऊन मान्यताही पावले असते।
1।5
आपण वर पाहिले की दोन वेज्ञानिक सिद्धान्तांमधील वाद उपपत्तिनिरपेक्ष अशा वस्तुस्थितीचे अवलोकन करून सोडविता येतात। अशी उपपत्तिनिरपेक्ष वस्तुस्थिती सौंदर्यशास्त्रात नसते हे आपण वर पाहिले आहे। असे असले तरी सौंदर्यशास्त्रात उपपत्तिनिरपेक्ष असे काहीतरी असले पाहिजे हा विचार आपल्या मनात कोठे तरी घर करून राहिलेला असतो। आणि या विचारात काही प्रमाणात व एका अर्थाने तथ्य असावे असे वाटते। कारण सौंदर्यशास्त्रातही वाद होतात, बौद्धिक युक्तिवाद व प्रमाणे देण्यात येतात, एका पक्षाचे म्हणणे आपल्याला पटते व दुसऱ्याचे पटत नाही असे आपण म्हणतो, दर वेळी पुरावा म्हणून कालाकृतींचे हवाले देतो। या सर्व गोष्टींवरून असे साहजिकच वाटू लागते की, सौंदर्यशास्त्रात व विज्ञानात निदान काही बाबतींत सारखेपणा असला पाहिजे। ज्या अर्थी सिद्धान्तांच्या पुष्टयर्थ कलाकृती इत्यादिकांची उदाहरणे देण्यात येतात, त्याअर्थी ती उदाहरणे तरी उपपत्तिनिरपेक्ष असली पाहिजेत अशी आपली समजूत होणे साहजिक आहे। परंतु ही समजूत चूक आहे असे ध्यानात येईल। कारण वाद घालणाऱ्या दोन वेज्ञानिकांमध्ये कोणती वस्तुस्थिती हा वाद संपवू शकेल याबाबत एकवावमयता असते; म्हणून निर्णायक प्रयोगावर (म्rल्म्ग्aत् ाxजrग्सहू) ते इतके विसंबून असतात। पण सौंदर्यसिद्धन्तावरील वादात कोणती वस्तुस्थिती प्रस्तुत आहे यावरच पुष्कळदा एकवावमयता नसते। समजा, एकाने असा सिद्धान्त मांडला की तीव्र भावनांचे व्यंजन ज्यांतून होते ते शब्द म्हणजे काव्य। यावर विरोधक अॅलेवमझँडर पोपच्या रेप आॅफ द लाॅकचा दाखला देऊन विचारील की यात कोठे तीव्र भावनांचे व्यंजन होते? आणि तरीही हे काव्यच आहे ना? जर हा वाद वेज्ञानिक असता तर या उदाहरणाने तो सुटला असता। उदाहरणार्थ, सर्व हंस शुभ्र असतात असे म्हणणाऱ्याला आॅस्ट्रेलियातील काळे हंस दाखविले की तो आपले मत बदलतो। पण काव्याच्या स्वरूपाविषयीचा वाद असा संपत नाही। कारण भावव्यंजनाचा सिद्धान्त मांडणारा असे म्हणू शकेल की रेप आॅफ द लाॅक हे काव्यच नाही आणि म्हणून प्रस्तुत पुरावा हा पुरावाच नाही। येथे आणखी एक गोष्ट नमूद केली पाहिजे। पुढे आलेला पुरावा प्रस्तुत आहे की नाही हे ठरविण्याचे स्वातंत्र्य जसे सौंदर्यसिद्धान्त मांडणाऱ्यांना असते तसेच पुराव्यासाठी वापरलेल्या कलाकृतीची नेमकी कोणती बाजू पाहायची व प्रस्तुत धरायची हे ठरविण्याचे स्वातंत्र्यही त्यांना असते। संस्कृत काव्यशास्त्रातील वेगवेगळे सिद्धान्त मांडणारे रसिक विद्वान कालिदासादि त्याच त्याच कवींचा पुरावा म्हणून उपयोग करतात। इंग्रजी काव्यशास्त्राच्या इतिहासात शेक्िस्पअरबद्दल नेमके हेच घडलेले आढळते। अगदी वेगवेगळे सिद्धान्त मांडणारे लोक शेक्िस्पअरचा पुरावा म्हणून उपयोग करतात। पण दोन टीकाकारांनी पुरावा म्हणून शेक्िस्पअरचे एकच नाटक वापरले असले तरी त्या नाटकाची एकच बाजू दोघांना आfभप्रेत असते असे नाही। पुढे आलेला पुरावा प्रस्तुत आहे की नाही हे ठरविण्याचे व त्यातील कोणती बाजू महत्त्वाची आहे हे ठरविण्याचे स्वातंत्र्य टीकाकारांना व सौंदर्यसिद्धान्त मांडणाऱ्यांना असते। पण असे स्वातंत्र्य वेज्ञानिकांना नसते। याचा अर्थ असा की वेज्ञानिकाच्या संकल्पना व सिद्धान्त यांचे स्वरूप वस्तुस्थितीवर अवलंबून असते। प्रत्येक वेज्ञानिक सिद्धान्ताला उपपत्तिनिरपेक्ष वस्तुनिरपेक्ष वस्तुस्थितीच्या अंकुशाखाली यावेच लागते। उलटपक्षी, सौंदर्यशास्त्रातील सिद्धान्तांवर उपपत्तिनिरपेक्ष वस्तुस्थितीचा अंकुश चालत नाही।
1।6
विज्ञानात आfभप्रेत असलेली वस्तुस्थिती एका अर्थाने मानवनिरपेक्ष असते; तर सौंदर्यशास्त्रातली वस्तुस्थिती सर्वार्थाने मानवसापेक्षच असते। सौंदर्यशास्त्रातील संकल्पना व या संकल्पनाव्यूहात दिसणारी वस्तुस्थिती या मानवनिर्मित असतात आणि मानवाच्या बदलत्या जीवनाबरोबर त्या बदलत असतात, नव्याने घडत असतात; आपण त्यांना घडवीत असतो। सौंदर्यशास्त्र, नीतिशास्त्र इत्यादिकांमध्ये व्याख्यांना इतके महत्त्व का, त्यांच्याबद्दल इतके वाद का, या प्रया>ांचे उत्तर आता देता येईल। जेव्हा आपण सौंदर्यविषयक आणि नीतिविषयक संकल्पनांच्या व्याख्या देतो तेव्हा उपपत्तिनिरपेक्ष अशा वस्तुस्थितीचे स्वरूप तटस्थपणे विशद करीत नसतो; आपण त्या संकल्पनांच्या व्याख्या घडवीत असतो, त्या संकल्पनांच्या मर्यादा आखीत असतो, त्यांना नवे जीवन; नवी दिशा देत असतो। आणि हे होत असताना आपले जीवनही नव्याने घडत असते। अर्थात आपण म्हणजे व्यक्तिशः आपण नव्हे। ज्या सांस्कृतिक गटात आपण वाढतो तो गट या संकल्पना घडवितो। सौंदर्याचा आस्वाद हे समाजजीवनाचे एक अंग आहे। येथे असे सुचवावेसे वाटते की सौंदर्य, कला, आस्वाद या संकल्पना व त्यांनी निर्देशिलेल्या गोष्टी एकदमच आfस्तत्वात येतात। त्या तार्किक दृष्टया परस्परावलंबी असतात। वस्तुस्थिती आधी व संकल्पना विंढवा सिद्धान्त नंतर असे नसते। उपपत्तिनिरपेक्ष सौंदर्यात्मक वस्तुस्थिती आfस्तत्वात असते व मग तिचे आपल्याला ज्ञान होते, तिच्याविषयी सिद्धान्त स्फुरतात असेही नसते। सौंदर्यात्मक परिस्थिती उपपत्तिसापेक्षच असते। अर्थात एकदा सौंदर्यादी संकल्पना निर्माण झाल्या की मग त्या कशालाही लागू शकतात। मानवजातीचा जन्म होण्याच्या आधी (म्हणजे सौंदर्यादी संकल्पनांचा जन्म व्हायच्या आधी) आfस्तत्वात आलेल्या गोष्टींनाही त्या लावता येतात। पण या संकल्पना निर्माण व्हायच्या आधी त्या गोष्टी सुंदरही नव्हत्या की कुरूपही नव्हत्या।
1।7
वरील विवेचनावरून असे ध्यानात येईल की, सौंदर्यशास्त्र हे विज्ञान नव्हे। त्यांचे प्रया> एक नव्हेत आणि त्यांच्या पद्धतीही एक नव्हेत। असे असूनदेखील काही लोकांची अशी श्रद्धा असते की मनोविज्ञानाच्या मदतीने सौदर्यशास्त्रातील प्रया> सुटतील। मदतीने या शब्दाच्या अर्थाची जरा फोड केली म्हणजे या लोकांचा दावा नवमकी काय आहे ते आपल्याला कळेल। फ्राॅइडच्या सिद्धान्ताच्या मदतीने आजचे वेद्यकशास्त्र पुष्कळ प्रया> सोडविते असे आपण म्हणतो तेव्हा फ्राॅइडची मनespान्य रोगांची चिकित्सा करण्याची पद्धती व मानसोपचाराची पद्धती या आजच्या वेद्यकशास्त्राने अंगीकारल्या आहेत असे आपल्याला म्हणायचे असते। एका शास्त्रातील सिद्धान्त दुसऱ्या शास्त्रात फलदायी ठरतात याचे हे एक चांगले उदाहरण आहे। काही वेळा दोन गोष्टींमध्ये विशिष्ट बाबतीत साधम्र्य असते। म्हणून एकीमुळे दुसरीवर प्रकाश पडतो। उदाहरणार्थ, कलाकृतीचे स्वरूप व सजीव देहाचे स्वरूप यांच्यामध्ये काही प्रमाणांत साधम्र्य असल्याने सजीव देहाच्या अंतर्गत रचनेवरून आपल्याला कलाकृतीच्या अंतर्गत रचनेविषयी नव्या संकल्पना सुचू शकतात। येथे जीवशास्त्राच्या मदतीने सौंदर्यशास्त्राचे प्रया> सोडविले असे आपण म्हणू शकतो। परंतु बहुतेक वेळा सौंदर्याच्या क्षेत्रातील प्रया>ांना समांतर असे पण वेगळे प्रया> आपण विज्ञानाच्या मदतीने सोडवितो व या दोन प्रकारच्या प्रया>ांची गलल्त झाल्यास आपण विज्ञानाच्या मदतीने सौंदर्याच्या क्षेत्रातले प्रया> सोडवीत आहोत असा आपला समज होतो। उदाहरणार्थ, खालील प्रया>ोत्तरे पाहाः क्ष ही स्त्री सुंदर आहे। 1। का? ( तिला सुंदर का म्हणायचे? ती कोणत्या निकषानुसार सुंदर ठरते?) तिची कांती मुलायम आहे म्हणून। (कोणत्या गुणधर्मामुळे तिला सुंदर म्हणायचे हे येथे सांगितले। सुंदर स्त्रीची अंगकांती मुलायम असायला हवी, कारण अशी कांती असणे हा स्त्रीसौंदर्याचा निकष आहे।) 2। का? (तिची अंगकांतील मुलायम का झाली?) ती लवमस टायॅलेट साबण वापरते म्हणून। (या उत्तरात एक कार्यकारणभाव सुचविलेला आहे।) पहिल्या व दुसऱ्या प्रया>ोत्तरांत गलल्त करणे योग्य नाही, कारण ती वेगवेगळया जातींची प्रया>ोत्तरे आहेत। पहिले उत्तर निकषाच्या भाषेत दिलेले आहे, तर दुसरे कार्यकारणभावाच्या भाषेत दिलेले आहे। या दोन भाषा वेगळया आहेत। एका भाषेत विचारलेल्या प्रया>ाला दुसऱ्या भाषेतील उत्तर चालायचे नाही। परंतु पुष्कळ वेळा आपण अशी गलल्त करतो। म्हणून व कारण हे द्वयर्थी शब्द या गलल्तीला मुख्यतः जबाबदार आहेत। जेव्हा एखादा मनोवेज्ञानिक विंढवा शरीरशास्त्रीय सिद्धान्त सौंदर्यशास्त्रीय सिद्धान्ताचा आधार म्हणून मानला जातो, तेव्हा अशी गलल्त तर होत नाही ना, असा प्रया> विचारायला हवा। अशी गलल्त होते हे दाखविण्यासाठी श्री। प्रभाकर पाध्ये यांच्या सौंदर्यभावना म्हणजे काय? या गाजलेल्या लेखाचे मी उदाहरण घेणार आहे। त्या लेखाद्वारे श्री। पाध्यांना पुढील गोष्टी साधायच्या आहेत असे मला वाटते ः (1) रस विंढवा सौंदर्यभावना हे अनुभव इतर अनुभवांपेक्षा वेगळे वाटले व काही बाबतींत ते तसे असले तरी इतर अनुभवांशी त्यांचे काहीच लागेबांधे नाहीत असे नाही। (2) जीवनातील सर्व अनुभवांच्या व क्रियांच्या मुळाशी जी आस्था (ग्हूीोू) असते तीच आस्था कलानुभवाच्याही मुळाशी असते। (3) अनुभवाची साधानात्मक व स्वरसात्मक अशी दोन अंगे असतात। जेव्हा अनुभवातील स्वरसात्मकतेवर जोर दिला जातो तेव्हा रसानुभव येतो। रसानुभवात साधनात्मकता आfजबात नसते असे नाही, पण ती तात्पुरती तरी क्षीण झालेली असते। (4) रस ही आस्थेची परिणत अवस्था आहे। या साऱ्याच्या मुळाची जी आस्था असते तिची या विशिष्ट हेतूंपासून, इच्छा-आकांक्षांपासून जर आपण, तात्पुरती का होईना, मुक्तता करू शकलो तर त्या आस्थेचे रूपांतर रसात होते।
13
(5) ही अवस्था भावसदृश असली तरी भावावस्था नव्हे। आस्थेमुळे चेतन्यशक्तीची पातळी बदलते; आस्थेमुळे आपले वर्तन चालू राहते; आणि आस्थेमुळे आपल्या अनुभवाला सुखकारक जाणिवेचे अस्तर जडते;- पण चेतन्यशक्तीची जागृती फाजील वाढली तर आपले वर्तन बिघडते, आणि सुखकारक जाणिवेचे अस्तरही चुरगळते। या दृष्टीने आस्था भावनासदृशच म्हणता येईल। पण आस्था सर्वच (भावनाविरहित गणल्या गेलेल्यासुद्धा) अनुभवाच्या मुळाशी असते। कलेच्या अनुभवात आस्थेचे रूपांतर रसात झाल्यावर तर तिचे भावनेशी असलेले नाते आfधकच दुरावते। रसाच्या प्रक्रियेत आस्था स्वतःच्याच जाणिवेत निमग्न झाली की, चेतन्याचे स्फुरण अर्थातच वाढेल, पण भावनाभराच्या स्फुरणापेक्षा ते निराळया तऱ्हेने जाणवेल।
14
(6) या विवेचनांतर श्री0 पाध्यांनी करूण नाटयाने आनंद कसा होतो हा प्रया> उपस्थित केला आहे। शोककरणाने दुःख हलके होते; नाटककाराने आपल्या चिंतनाला चालना दिल्यामुळे आपण नाटकातील (आणि एकूण जीवनातील) समस्यांचा विचार करू लागतो; शोककरणाप्रमाणे या चिंतनातून दुःख हलके होते व आनंदाची शवमयता निर्माण होते, असा त्यांच्या विवेचनाचा रोख आहे। या सर्व विवेचनाला वेज्ञानिक पाया देण्यासाठी त्यांनी रेटिवमयुलर फाॅमेर्शन (Rाूग्म्ल्त्ar इदrस्aूग्दह) व त्याचे कार्य यांची चर्चा केली आहे। ते म्हणतात, मेंदूच्या कांडयाच्या या भागात असंख्य पेशींचे आणि मुख्यतः त्यांच्या धाग्यांचे जाळे पसरलेले असल्याने त्याला रेटिवमयुलर फाॅर्मेशन (जाळीदार रचना) असे नाव दिले गेले। रेटिवमयुलर फाॅर्मेशन आणि वरचा मेंदू (म्दrूाx) यांचा गाढ परस्परसंबंध असतो।
15
।।।या दोहोंच्या दरम्यान विद्युदूर्मींची (ातम्ूrग्म्aत् ग्स्ज्ल्त्ेो) अव्याहत आवकजावक सुरू असते।।।एका पेशीतली विद्युदूर्मी संपर्कस्थानाप्रत पोचली म्हणजे तेथे रासायनिक क्रिया घडून एका पेशीतल्या ऊर्मीचे संक्रमण दुसऱ्या पेशीत होते। या संक्रमणाला काही क्षणांचा विलंब लागतो। साहजिकच, स्थलीच्या मार्गाला असा विलंब लावणारी संपर्कस्थाने दोनच असल्याने आणि रेफाॅच्या मार्गाला ती असंख्य असल्याने स्थलीमार्गाद्वारे जाणारा संदेश मेंदूला अगोदर पोचतो आणि त्या मानाने रेफाॅमार्गे जाणाऱ्या संदेशाला अवधी लागतो।।।या कालविक्षेपाला (ूग्स्ग्ेम्rाज्aहम्ब्) फार अर्थ आहे। आfभज्ञेच्या (म्दुहग्ूग्दह) कार्यात मेंदूला याचा फार उपयोग होतो।16 ।।।रेटिवमयुलर फाॅर्मेशनमुळे संवेदनासंदेशाचे जे उद्दीपन होते त्यामुळे आfभज्ञेच्या कार्याला चेतनाशक्तीचा पुरवठा होऊन ते सुरू राहते, इतकेच नव्हे तर त्याबद्दल एक गोडी, एक आस्था निर्माण होते। (एखाद्या कार्यात गोडी वाटणे विंढवा रस घेणे, या भाषाप्रयोगात जो अर्थ आfभप्रेत आहे त्या अर्थाने आस्था हा शब्द मी वापरीत आहे।)
17
।।।चेतकांनी निर्माण केलेल्या विद्युदूर्मी एका पेशीतून दुसऱ्या पेशीत संक्रमित होतात असे मी वर सांगितले।।।आता कित्येकदा असे होते की, एका पेशीतून दुसऱ्या पेशीत, दुसरीतून तिसरीत, तिसरीतून चौथीत संक्रमित झालेली ऊर्मी चौथीतून पाचवीत।।।न जाता पहिलीत येते, आणि ऊर्मींचा प्रवास वतुर्ळाकार बनतो। यामुळे एखाद्या विशिष्ट ऊर्मीचे संक्रमण क्रियाप्रवण पेशीत न होता ती ऊर्मी स्वतःतच घोटाळत राहते।।।अनुभवासाठी अनुभव विंढवा स्व-रसात्मक अनुभव असे जे मी म्हणतो त्याला हा शरीरशास्त्रीय आधार। 18 माझ्या समजुतीप्रमाणे श्री0 पाध्यांच्या लेखातील सर्वांत महत्त्वाचा आणि सौंदर्यशास्त्र व साहित्यचर्चा यांना प्रस्तुत असा भाग म्हणजे रसाचा भावनेशी नेहमी जोडण्यात येणारा सांधा तेथून काढून आस्थेशी जोडणे हा आहे। कारण असे करण्याने काव्यानुभव इतर स्वरसात्मक (पण सर्वच वेळा भावनात्मक नसलेल्या) अनुभवांसारखा असतो ही गोष्ट मनात ठसते। रस असणे, रस वाटणे, रस घेणे इत्यादी शब्दप्रयोग आपण अनेक अनुभवांच्या व त्रिढयांच्या संदर्भांत वापरतो; या संदर्भांत काही बाबतींत निश्चित साम्य आहे असे श्री0 पाथ्यांनी दाखविले आहे। आणि हा मुद्दा सौंदर्यशास्त्राच्या संदर्भात महत्त्वाचा आहे। आता प्रया> असा की त्यांनी मांडलेला हा मुद्दा व लेखात इतरत्र दिलेली शरीरशास्त्रीय माहिती यांचा नवमकी संबंध काय आहे? वर प्रया>ोत्तरांची जी जोडी दिली आहे त्यांपेकी दुसऱ्या प्रया>ोत्तराची व श्री0 पाध्यांच्या शरीरशास्त्रीय विवेचनाची जात एक आहे। स्वरसात्मकता हा रसानुभवाचा निकष मानल्यानंतर जो वेज्ञानिक प्रया> निर्माण होतो त्याला श्री0 पाध्यांचे विवेचन हे उत्तर आहे। तो प्रया> असा ः स्वरसात्मक अनुभव शरीरशास्त्रदृष्टया शवमय आहे का? व असल्यास तो कसा निर्माण होतो? पण ही शरीरशास्त्रीय माहिती रसिकाला विंढवा सौंदर्यशास्त्रज्ञाला आवश्यक आहे असे नाही। कारण अनुभवाची स्वरसात्मकता ही अनुभवातली गोष्ट आहे। पिवळे या शब्दाचा अर्थ कळायला ज्याप्रमाणे शरीरशास्त्र वा पदार्थविज्ञान माहित असायची गरज नाही त्याप्रमाणे स्वरसात्मक अनुभव म्हणजे काय हे कळायला रेफाॅची माहिती असायची गरज नाही; कारण विद्युदूर्मींची चक्राकार गती विंढवा त्यांचा रेफाॅमार्गे होणारा प्रवास हा काही आपण वाङ्मयीन अनुभवाचा निकष म्हणून वापरत नाही। जो अनुभवविशेष आपण निकष म्हणून वापरतो तो अगदी सामान्य माणसाच्यादेखील परिचयातला असतो। तेव्हा श्री0 पाध्यांनी रेफाॅ वगेरेविषयी जी माहिती दिली आहे तिचे महत्त्व सौंदर्यशास्त्रात नसून मनोविज्ञानात आहे। सौंदर्यशास्त्रातील प्रया> संकल्पनांबद्दलचे, निकषांबद्दलचे असतात याचे भान न राहिल्यास त्यांची वेज्ञानिक प्रया>ांशी गलल्त होते। याचे आणखी एक उदाहरण देतो। रिचर्ड्सच्या मते कविता अनुभवरूप असल्याने ती रसिकाच्या मनात असते। उलट, इतर काही लोकांच्या मते (उदाहरणार्थ, आॅझ्बर्न) कविता मनाबाहेर असून आस्वादाच्या वेळी ती विशिष्ट प्रकारच्या ज्ञानाचा विषय म्हणून आपल्याला जाणवते। रिचर्ड्स व आॅझ्बर्न यांच्यामधील हा वाद म्हणजे रस हा रसिकगत असतो की काव्यगत या वादाचाच आधुनिक अवतार आहे। आता समजा, एखाद्या मनोवेज्ञानिकाने शंभर वाचकांना एक कविता वाचायला दिली, त्यांना आपल्या प्रतिक्रियांची नोंद ठेवायला सांगितले, त्यांच्या शरीरात होणाऱ्या बदलांचे आधुनिक यंत्रे वापरून आलेख तयार केले, आणि या पुराव्याच्या जोरावर रिचर्ड्सचे मत बरोबर असल्याचे सांगितले। पण खरे पाहता या पुराव्याने वरील वाद सुटत नाही। कारण हा वाद वेज्ञानिक नाही। कविता वाचत असताना आपण काही भावना अनुभवतो की नाही हा प्रया> नाही। असा प्रया> असता तर रचिर्ड्सचे कार्य सोपे होते। कारण बहुसंख्य वाचकांना कविता वाचताना भावानुभव येतात हे सत्य आहे। प्रया> आहे तो असा की हा भावानुभव काव्याच्या संदर्भात प्रस्तुत आहे का? आपण कवितेविषयी बोलतो म्हणजे आपल्याला येणाऱ्या अनुभवांविषयी बोलतो का? कवितेच्या व्याख्येत आपल्या भावनानुभवाला स्थान असते का? म्हणजे प्रया> आहे तो संकल्पनांविषयीचा, त्यांच्या मर्यादांबद्दलचा, त्यांतील प्रस्तुत-अप्रस्तुताबद्दलचा आहे ! आणि हा प्रया> वेज्ञानिक पद्धतीने सुटायचा नाही। पण विज्ञानाच्या मदतीने तो सोडविण्याचा कोणी प्रयत्न केला तर वर उल्लेखिलेला गोंधळ मात्र निर्माण होईल। वरील सर्व विवेचनावरून असे ध्यानात येईल की सौंदर्यशास्त्रात हे विज्ञान नव्हे। त्याचे कार्य कार्य व त्याच्या पद्धती कोणत्या याविषयी अप्रत्यक्षपणे काही मुद्दे वर सुचविण्यात आले आहेत। ते आता स्पष्टपणे मांडणे जरूर आहे।
1।8
सौंदर्यशास्त्र ही तत्त्वज्ञानाची एक शाखा आहे। म्हणून त्याचे विवेचन करताना प्रस्तुत ग्रंथात तत्त्वज्ञानामध्ये वापरण्यात येणाऱ्या पद्धतींचा आपण उपयोग करणार आहोत। पण सर्व तत्त्वज्ञ एकाच पद्धतीचा अवलंब करून एकाच प्रकारचे कार्य करतात असे नाही। मूल्यांच्या क्षेत्रात-विशेषतः नीतिमूल्यांच्या क्षेत्रात-जे तत्त्वज्ञानात्मक लिखाण उपलब्ध आहे ते पाहिल्यास असे लक्षात येईल की, तत्त्वज्ञ दोन प्रकारच्या प्रया>ांची उत्तरे शोधीत आहेत। नीतिमूल्यांबद्दलचे हे दोन प्रया> असे ः (1) कोणत्या गोष्टी चांगल्या विंढवा शिव आहेत? आणि (2) शिव विंढवा चांगलेपणा ही संकल्पना कोणत्या प्रकारची आहे? तिची तार्किक वेशिष्टये कोणती? गेल्या तीस-चाळीस वषाआत दुसऱ्या प्रकारच्या प्रया>ांकडे तत्त्वज्ञांनी विशेष लक्ष पुरविले आहे असे दिसते।
19
सौंदर्यशास्त्रातही असेच दोन प्रकारचे प्रया> उपस्थित होतात ः (1) कोणत्या गोष्टी सुंदर आहेत? कोणत्या गुणांमुळे त्या सुंदर ठरतात? सौंदर्याचे निकष कोणते? (2) सौंदर्य या संकल्पनेची तार्किक वेशिष्टये कोणती? सौंदर्य विधानाचे स्वरूप काय? दुसऱ्या प्रकारचे प्रया> जरी केवळ तार्किक स्वरूपाचे आहेत असे वाटले तरी ते महत्त्वाचे आहेत यात शंका नाही। सौंदर्य, कला, काव्य इत्यादींच्या गाभ्याशी जाण्याच्या प्रतिज्ञेने निघण्यापूर्वी, या संकल्पनांना एक गाभा असतो का, तो एकाच जागी असतो का हे प्रया> सोडविणे हिताचे आहे। यासाठी आपण आधुनिक (म्हणजे मूरनंतरच्या आणि विशेषतः तार्किक अनुभववाद्यांपासून पुढच्या) तत्त्वज्ञांची मदत घेणार आहोत, आणि त्यांच्या पद्धतींचा अवलंब करणार आहोत। या पद्धतींचा अवलंब सौंदर्यशास्त्राच्या अभ्यासासाठी केला तर सौंदर्यशास्त्राचे स्वरूप असे होईल ः सौंदर्यविधाने कलाकृती व इतर सुंदर वस्तू यांच्याबद्दल असतात। सौंदर्यशास्त्रातली विधाने सौंदर्यविधानांबद्दल असतात। भाषाव्यवहाराच्या या दोन पातळयांना त्aहुल्aुा व सूa-त्aहुल्aुा अशी नावे देण्यात आली आहेत। आणि हाच भेद मनात ठेवून ाूप्ग्म्े व सूa-ाूप्ग्म्े, ज्प्ग्त्देदज्प्ब् व सूa-ज्प्ग्त्देदज्प्ब् ही नावेही प्रचारात आली आहेत। या प्रघातानुसार सौंदर्यशास्त्राला सूa-म्rग्ूग्म्ग्ेस् असे नाव देता येईल। फुलराणी ही कविता सुंदर आहे हे विधान समीक्षेच्या पातळीवरचे विधान आहे। या विधानाची जात कोणती, वर्णनपर आहे का, ते खरे वा खोटे ठरू शकते का, सुंदर या शब्दाने एखाद्या गुणधर्माचा निर्देश होतो का, असल्यास हा गुण कोणत्या जातीतला आहे, तो व्याख्येय आहे का, त्याचे निकष देता येतात का, इत्यादि प्रया> सौंदर्यशास्त्रीय प्रया> आहेत। कारण ते सर्व समीक्षात्मक विधानांच्या व त्यात वापरल्या गेलेल्या संकल्पनांच्या तार्किक स्वरूपाविषयीचे प्रया> आहेत। समीक्षाव्यवहारात वापरल्या गेलेल्या संकल्पनांचे तार्किक वियलेषण करणे हे सौंदर्यशास्त्राचे एक प्रमुख कार्य आहे। ज्या भाषेत समीक्षाव्यापार चालतो त्या भाषेकडे या संकल्पनावियलेषणासाठी सौंदर्यशास्त्राला वळले पाहिजे हे उघड आहे। या भाषेच्या आधारे आपल्याला या क्षेत्रातील महत्त्वाच्या संकल्पनांचा व त्यांतील परस्परसंबंधाचा परिचय करून घेता येईल। आपले उद्िष्ट संकल्पनावियलेषण हे आहे। त्यासाठी भाषावियलेषणाचे आयुध आपल्याला वापरावे लागते। भाषेतील सूक्ष्म भेदांमागे पुष्कळदा संकल्पनांमधील सूक्ष्म भेद दडलेले असतात। म्हणून हे आयुध वापरणे आवश्यक आहे। परंतु आपली भूमिका भाषाशास्त्रज्ञाची नाही हे लक्षात ठेविले पाहिजे।
20
आधुनिक तत्त्ववेत्त्यांची आपल्या विवेचनात आपल्याला अनेक ठिकाणी मदत घ्यावी लागणार आणि तसे करणे इष्ट आहे हे वरील विवेचनावरून स्पष्ट होईल। बऱ्याच आधुनिक तत्त्वज्ञांना संकल्पनांच्या फक्त तार्किक वेशिष्टयांच्या वियलेषणातच रस आहे असे दिसते। परंतु आपल्याला या वियलेषणावरच लक्ष केंद्रित करून चालणार नाही। संकल्पनांच्या आशयाची, प्रत्यक्ष वापरल्या जाणाऱ्या सौंदर्याच्या निकषांची चिकित्साही आपल्याला करायची आहे। आणि या बाबतीत आपल्याला पारंपरिक तत्त्वज्ञांची मदत घ्यावी लागणार आहे। आपण आधुनिक तत्त्वज्ञांच्या मदतीने सौंदर्यादी संकल्पनांच्या रूपात्मक (fदrस्aत्) वेशिष्टयांचा शोध घेऊन पारंपरिक तत्त्वज्ञांच्या मदतीने आशयात्मक (ेल्ंेूaहूग्aत्) प्रया> सोडविण्याचा प्रयत्न करणार आहोत। अशा रीतीने नव्याजुन्यांची सांगड घातल्याशिवाय आधुनिक सौंदर्यशास्त्र उभे राहू शकणार नाही। या संकल्पनावियलेषणातून काय मिळणार? सौंदर्यशास्त्र हे विज्ञान नाही त्याचप्रमाणे ते तंत्रविद्याही नाही। म्हणून सौंदर्यशास्त्राच्या अभ्यासाने माणसाला कलाकृती निर्माण करण्याचे तंत्र कळेल असे नाही। त्याचप्रमाणे अरसिक माणसाला रसिक बनविण्याचे कार्यही सौंदर्यशास्त्राचे नाही। सौंदर्यशास्त्र हे समीक्षाव्यापारात वापरल्या जाणाऱ्या संकल्पनांचे, संज्ञांचे, मूल्यविधानांचे, सौंदर्यादी संकल्पनांच्या निकषांचे शास्त्र आहे। सौदर्यशास्त्र या संकल्पना विंढवा हे निकष करीत नाही; त्यांना तार्किक स्पष्टता मात्र ते प्राप्त करून देते। समीक्षक म्हणून आपण कलास्वरूपाविषयी काही जाणिवा कळत नकळत व्यक्त करीत असतो। समोरचे चित्र सुंदर आहे, नुत्तेढच वाचलेले नाटक प्रभावी आहे, काल पाहिलेले शिल्प अयलील आहे, दि आउटसाइडर वाचल्याने मानवी जीवनावर नवा प्रकाश पडतो, क्राइम अँड पनिशमेंट वाचल्याने मानवी हत्या करणाऱ्याचे सूक्ष्म मनोव्यापार कळतात, आणि म्हणून या कादंबऱ्या श्रेष्ठ आहेत, इत्यादी विधाने आपण करीत असतो। या प्रत्येक विधानामागे एक संकल्पनांचा, निकषांचा सेद्धािन्तक व्यूह उभा असतो। पण त्याची जाणीव आपल्याला नसते; निदान त्याचे स्वरूप आपण स्पष्टपणे बघितलेले नसते। ज्या संकल्पनाव्यूहामुळे आपले समीक्षाव्यापार सिद्ध होतात त्याचा संपूर्ण नकाशा आपल्यापुढे उभा करणे हे सौंदर्यशास्त्राचे कार्य आहे। सौंदर्यविषयक जाणिवा निर्माण करणे हे सौंदर्यशास्त्रज्ञाचे काम नव्हे। प्लेटो, अॅरिस्टाॅटल, कांट, हेगेल यांनी नव्या जाणिवा निर्माण केल्या नाहीत। समाजजीवनात ज्या जाणिवा अस्फुट होत्या त्यांना स्पष्टता आणून देण्याचे कार्य त्यांनी केले। सौंदर्यशास्त्रज्ञाचे काम मातेचे नसून सुइणीचे असते। मानवी मूल्यसंकल्पनांना आपण सारे घडवत असतो। सौंदर्यशास्त्रज्ञ आणि नीतिशास्त्रज्ञ या संकल्पनांना स्पष्टता देऊन आपल्याला आत्मरूपाचेच दशर्न घडवितात। याचा अर्थ असा नव्हे की कलाकृती आणि सुंदर वस्तू यांच्याबद्दल संपूर्ण औदासीन्य दाखवूनदेखील संकल्पनावियलेषणाचे काम नीटपणे करता येईल। सौंदर्यशास्त्र व नीतिशास्त्र यांच्यातील संकल्पनाच अशा आहेत की त्या प्रत्यक्ष वापरल्याशिवाय-म्हणजे समीक्षाव्यवहार व नीतिव्यवहार यांत प्रत्यक्षपणे पडल्याशिवाय-त्यांचे तार्किक वियलेषण करणे शवमय होत नाही। केवळ रसिकतेमुळे सौंदर्यशास्त्रात गती येत नाही। त्याचप्रमाणे रसिकतेच्या अभावीदेखील गती येणे शवमय नाही। खरे म्हणजे सौंदर्यशास्त्रज्ञाला नेहमी दोन पातळयांवर वावरावे लागते ः समीक्षेच्या व तत्त्वज्ञानाच्या। येथे आणखी एका मुद्दयाचा निर्देश करायला हवा। आपल्या विवेचनात आपण समीक्षेतील संकल्पनांना विशेष महत्त्व देणार आहोत। सध्या आfस्तत्वात असलेल्या समीक्षेची व्याप्ती पाहिली की एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात येते। समीक्षा ही प्रायः कलाकृतींची असते। कलासमीक्षा जितवमया विपुल प्रमाणात उपलब्ध आहेत तितवमया प्रमाणात निसर्गसौंदर्याबद्दलची समीक्षा उपलब्ध नाहीं। म्हणून आपल्या विवेचनात कलासमीक्षेला विशेष महत्त्व मिळणार हे उघड आहे। कलेच्या बाहेर असलेल्या सौंदर्याबद्दल आपण विधाने करतो हे खरे आहे। उदाहरणार्थ, क्ष ही स्त्री सुंदर आहे।, य हे मूल गोंडस आहे।, हे दृश्य सुरेख आहे। इत्यादी। या विधानांतील संकल्पनांचा आपल्या विवेचनात आपण जरूर विचार करणार आहोत, पण वर दिलेल्या कारणासाठी आपण कलासमीक्षेतील संकल्पनांना जास्त महत्त्व देणार आहोत। याला आणखीही एक कारण आहे। निसर्गातील सौंदर्य पाहायला सौंदर्यदृष्टीची आवश्यकता असते, आणि ही सौंदर्यदृष्टी-निदान आजच्या मानवाची सौंदर्यदृष्टी-बहुधा कलासौंदर्याच्या संदर्भातच प्राप्त झालेली असते। कलाविश्वात तयार झालेली जाणीव घेऊनच बहुधा आपण निसर्गसौंदर्याकडे वळतो। आणि म्हणून सौंदर्यशास्त्रात कलेला इतके महत्त्व प्राप्त होते।21