नमस्कार, मराठी शाब्दबंधाच्या बैठकीची टिपणे सहभागी: श्रद्धा, सुशांत, सलिल. तारीख:१९ /१२/२००६ वेळ: २.३० ते ३.३० भरणे: शाब्दबंधात केलेले अर्थ १.भरणे - रिकाम्या जागेत काही घालणे "त्याने पिंपात पाणी भरले" २.भरणे, भरणा करणे - देय असलेले पैसे इत्यादी देऊन टाकणे "कालच मी दूरध्वनीचे देयक भरले" ३.भरणे - परिमाणाच्या बरोबर असणे "एका किलोत चार आंबे चढतील." महाराष्ट्र शब्दकोषात नोंदलेले अर्थ १.भरणे:व्यतीत करणे:"तो कसेबसे कामाचे दिवस भरतो." २.भरणे: शेवटच्या वा पूर्णत्वाच्या स्थितीला पोहोचणे :"त्याचे दिवस भरणे." ३.माखणे:"लिप्त करणे " त्याने माझा चेहरा रंगाने माखला." अक्रि १.माखणे,भरणे:लिप्त होणे:"सदरा चिखलाने भरला." पुढच्या बैठकीत चर्चा व्हायची आहे भरणे: रिकामा अवकाश व्यापला जाणे:"बादली भरली"" १.भरणे: भरदार, दळदार होणे:"चार महिन्यांतच तो अंगाने भरला." २.भरणे:भरून जाणे:"कणीस दाण्यांनी भरले" ३.भरून येणे: पाय, गुडघा इत्यादी ४ भरणे:जखम इत्यादी बरी होणे:"जखम भरली" ५.भरणे:भरतकाम करणे:"मी आज एक रूमाल भरला." ६.बाजार भरणे जागा व्यापणे /लिप्त करणे रागे मनात भरणे "बांगड्या भरल्या." भरणे:१.आणखी काही मावू शकणार नाही अशा स्थितीत एखादा अवकाश पोहोचणे २.रिकाम्या अवकाशात घालणे ३.अवकाश मोठ्या प्रमाणावर व्यापणे इति