Resource Center For Indian Language Technology Solution


9 । कला व नीती

9।1
तिसऱ्या प्रकरणाच्या शेवटी आपण असे पाहिले की कलेची संकल्पना द्विध्रुवात्मक आहे। यांपेकी एक ध्रुव म्हणजे कला स्वायत्त आहे हा सिद्धान्त होय। कलामूल्य स्वायत्त विंढवा स्वयंभू आहे याचा अर्थ ते जीवनातले सर्वाच्च मूल्य आहे असा नाही त्याचा अर्थ इतकाच कलाव्यवहार हा इतर लौकिक व्यवहारांपेक्षा मूलतः भिन्न आहे। कलामूल्य पराश्रयी नसून स्वयंभू आहे असे स्वायत्ततावादी मानतात। याच्या बरोबर विरूद्ध भूमिका घेणारे विचारवंत असे म्हणतात की कलेला स्वतंत्र, स्वयंभू असे मूल्य नाही। जीवनातील इतर व्यवहारांमध्ये गोष्टींना जे मूल्य असते तेच मूल्य कमी-आfधक प्रमाणात कलेला असते। कलानुभव व इतर अनुभव यांच्यातील फरक फार आfधक प्रमाणात कलेला असते। कलानुभव व इतर अनुभव यांच्यातील फरक फार झाले तर संख्यात्मक आहे, गुणात्मक नाही। काही वेळा याहीपुढे जाऊन असा दावा करण्यात येतो की कलेला केवळ साधनमूल्यच असते। या मताच्या पुष्टयर्थ पुरावा मिळणे सुलभ आहे। वेगवेगळया युगांत कलेने वेगवेगळया भूमिका बजावल्या आहेत। प्राचीन काळात गुहांमधील भिंतींवर चित्रे काढणारा मानव कलेसाठी कला निर्माण करीत नव्हता। त्याच्या दृष्टीने जादूचा एक भाग म्हणूनच कलेला महत्त्व होते। अमुक प्रकारचे नृत्य केले विंढवा अमुक पद्धतीने आवाज केले म्हणजे शिकारीत यश मिळते, युद्धात जय मिळतो, भूतपिशाच्चांपासून संरक्षण होते, इत्यादी समज त्या काळात प्रचलित होते। कलेविषयीचा हा दृष्टिकोण केवळ प्राचीन रानटी समाजातच प्रचलित होता असे नाही। अॅरिस्टाॅटलकृत पोएटिवमसच्या बायवाॅटरने केलेल्या भाषांतराच्या प्रस्तावनेत गिल्बर्ट मरेने ग्रीक शोकाित्मका व त्या कालातील डायोनिसचा धार्मिक विधी यांच्यामधील निकटच्या संबंधची चर्चा केली आहे; त्यावरून ग्रीक काळात कला जीवनपोषक व म्हणून मूल्ययुक्त मानली जात होती असे दिसते। इसवी सनापूर्वी 361मध्ये साथीच्या रोगापासून बचाव व्हावा म्हणून ग्रीक शोकाित्मकांचे प्रयोग रोममध्ये करण्यात येऊ लागले असे मरे सांगतो।1 यावरूनही वरील मुद्दयाला पुष्टी मिळते। मध्ययुगीन युरोपातील नाटयपरंपरेचा जन्म धार्मिक सण, प्रार्थना व विधी यांतून झाला आणि सुरूवातीला धर्मप्रसाराचे एक साधन म्हणूनच नाटयाकडे पाहिले जात होते, असे सिद्ध झालेले आहे।2 मध्ययुगात धर्मप्रसारासाठी नाटयच नव्हे तर सर्वच कला राबविण्यात आल्या। पुढे जेव्हा ऐहिक (ेाम्ल्त्ar) मूल्यांना महत्त्व आले तेव्हा नीती, राजकारण, राष्ट्रभवमती इत्यादी गोष्टींसाठी कलांचा उपयोग करण्यात येऊ लागला। होरेसने शिक्षण व मनोरंजन यांना कलेचे द्विविध ध्येय मानल्यापासून आजतागायत अनेक सौंदर्यशास्त्रज्ञांनी, टीकाकारांनी व कलावंतांनी या कल्पनेचा कमीआfधक प्रमाणात पाठपुरवठा केल्याचे दिसते। शिक्षण या संकल्पनेत दोन गोष्टींचा अंतर्भाव होतो ः (1) जगाबद्दलचे, लोकव्यवहाराचे व मानवी मनाचे ज्ञान। तत्त्वज्ञान व विज्ञान यांच्यात जे ज्ञान आfभप्रेत आहे, विंढवा आपल्या उपजत बुद्धीने जे ज्ञान आपण मिळवितो, तशाच तऱ्हेचे ज्ञान कला देते असा दावा पुरातन काळापासून करण्यात आलेला आहे। (2) कसे वागणे इष्ट ठरेल याचे ज्ञान, म्हणजेच नीतिशिक्षण। कलेला केवळ साधनमूल्य आहे असे मानणारे लोक बहुधा असे म्हणतात की कला हे या द्विविध शिक्षणाचे साधन आहे। यातून जे दोन सिद्धान्त निघाले आहेत त्यांचा आपल्याला या व पुढच्या प्रकरणात विचार करायचा आहे। त्यांपेकी नीतसिद्धान्ताचा विचार आपण या प्रकरणात करणार आहोत। आस्वादाविषयीच्या सिद्धान्तानंतर लगेच कला व नीती या प्रया>ाची चर्चा करणे याला विशेष औचित्यही आहे। गेल्या प्रकरणात आपण कलेतील आनंदाची व भावनात्मकतेची चर्चा केली। त्या वेळी आपण असे पाहिले की कलास्वाद वेगवेगळया अर्थांनी आनंददायक मानला जातो। त्यांतील दोन अर्थ असे ः (अ) कलेतील इंद्रियसंवेद्य घटकामुळे संवेदनासुख प्राप्त होते। (आ) त्याचप्रमाणे प्रेरणासमाधाचा आनंदही कलेमुळे मिळतो। कलेपासून मिळणाऱ्या आनंदाचे हे दोन्ही प्रकार नीतीच्या संरक्षकांना फार महत्त्वाचे वाटतात। कारण या दोहोंचा संबंध आपल्या इच्छाशवमतीशी व व्यविमतत्वाशी येऊन पोचतो असे ते मानतात। प्रेरणासमाधानाचा इच्छाशवमतीशी काय संबंध आहे हे सांगण्याची गरज नाही। संवेदनासुख हे अनेक वेळा इच्छांच्या समाधानाशी निगडित झालेले असते; म्हणून त्याविषयीही नीतिशास्त्रज्ञ साशंक असावेत असे वाटते। पण या दोहोंत नित्य व आवश्यक संबंध असतोच असे नाही हे आपण पाहिले आहे। संवेदनासुखाच्या काही प्रकारांना प्लेटोने निर्भेळ सौंदर्यसुख असे म्हटल्याचेही वाचकांना आठवत असेल। पण तरीही या सुखात माणूस रमला की तो आपली कर्तव्ये विसरण्याची शवमयता आहे अशी जणू नीतिशास्त्राज्ञांना भीती वाटत असावी। आठव्या प्रकरणात आपण कलेच्या भावनात्मकतेचीही चर्चा केली। भावनांचा व प्रेरणांचा संबंध फार जवळचा आहे हे आपण तेथे पाहिले। जर वाङ्मयाचा आस्वाद म्हणजे भावनाजागृतीचा अनुभव असे आपले मत असेल तर वाङ्मयाचा आपल्या व्यवहारात्मक जीवनावर परिणाम घडत असतो हे आपल्याला पटायला हवे। नाटकातल्या पात्रांना वास्तव जगातील व्यवमती म्हणून सत्ताशास्त्रीय स्थान नसते आणि म्हणून कदाचित ती पात्रे आपल्या भावना व प्रेरणा यांचे विषय होऊ शकत नसतील। पण साधारणीकरणामुळे या पात्रांसारखी माणसे वास्तव जगात असतात हे आपल्याला जाणवते। ही माणसे आपल्या भावना व प्रेरणा यांचे विषय होऊ शकतात। म्हणून वाङ्मय वाचीत असताना त्यातील पात्रांच्या संबंधात कोणतीही कृती करणे हे आपल्याकडून अपेक्षित नसले तरी प्रत्यक्ष वास्तवातील तशा व्यवमतींच्या संबंधात आपण विशिष्ट कृती करण्याची शवमयता निश्चित असते। अंकल टाॅम्स केबिन या कादंबरीमधील गुलामांना आपण मुक्त करू शकत नाही हे खरे; पण ही कादंबरी वाचून वास्तव जगातील गुलामांना मुक्त करण्याची इच्छा आपल्याला होणे संभवनीय आहे। वाङ्मयाचे दूरगामी परिणाम लक्षात घेतले की वाङ्मयाचा नीतीशी संबंध कसा येतो हे कळते। म्हणूनच कलेच्या भावनात्मकतेचा विचार करतानाच नीतिविचाराचा सौंदर्यशास्त्रात प्रवेश होतो। एवढयासाठी आfभनवगुप्ताने रसचर्चेच्या शेवटी रसाच्या पुरूषार्थनिष्ठतेचा सिद्धान्त मांडला आहे।3 म्हणून कलेतील भावनात्मकतेविषयी चर्चा केल्यानंतर कला व नीती या प्रया>ाकडे आपण वळावे हे स्वाभाविकच आहे।

9।2
कला व नीति यांच्या संबंधाबाबत विचार करताना एका गोष्टीचे अवधान ठेवायला हवे। नीती व नेतिक या शब्दांना पुष्कळदा फार संकुचित अर्थ दिला जातो। उदाहरणार्थ, स्त्रीपुरूषांमधील संबंध, लाचलुचपत, व्यसने, वित्ताचा अपहार यांच्याबद्दलच्या प्रया>ांनाच नेतिक प्रया> म्हणण्यात येते। पण या गोष्टींइतकेच महत्त्व असणाऱ्या जीवनातील इतर गोष्टींना नेतिकतेच्या कक्षेत स्थान दिले जात नाही। उदाहरणार्थ, एखाद्या शिक्षकाने मन लावून शिकविले नाही, तर ते कृत्य अनेतिक समजले जात नाही; पण त्याने एखाद्या विद्यार्थिनीशी जास्त सलगी केली तर ते कृत्य मात्र अनेतिक मानले जाते। एखादा माणूस सर्व मोहांवर मात करून ज्ञानप्राप्तीसाठी धडपडत असेल तर त्याचे नेतिक मूल्यमापन होत नाही; पण मोहांवर विजय मिळवून एखाद्या माणसाने एकपत्नीव्रताचे पालन केले तर मात्र त्याचे नेतिक कौतुक होते। थोडा विचार केला तर असे लक्षात येईल की नेतिकतेला इतका संकुचित अर्थ देणे बरोबर नाही। नीतिनियमांचे जाणीवपूर्वक पालन करायचे असेल तर माणसाने स्वतःला असे विचारले पाहिजे की मी हे अमुक का करायला हवे? ते करणे माझे कर्तव्य आहे हे कशावरून? असे प्रया> न विचारता केलेले कर्तव्यपालन खऱ्या अर्थाने कर्तव्यपालन ठरत नाही; ते केवळ सवयीमुळे विंढवा भीतीमुळे केलेले वर्तन ठरते। आपण करीत असलेली गोष्ट आपले कर्तव्य आहे हे जेव्हा आपल्या विवेकबुद्धीला पटेल तेव्हाच ती गोष्ट करणे विंढवा न करणे याला नेतिक अर्थ प्राप्त होतो। आपण ज्यांना नीतिनियम मानतो त्यांच्याविषयी जेव्हा आपण विचार करू लागतो। तेव्हा असे ध्यानात येते की चांगले, श्रेयस्कर व आदशर् मानवी जीवन कसे असावे याचे चित्र या नियमांच्या मागे उभे आहे। हे आदशर् जीवन आपल्याला प्राप्त व्हावे म्हणूनच नेतिक नियमांचे नियमांचे पालन करायचे असते। याचा अर्थ असा नव्हे की हे सर्व नियम साधनरूप आहेत। त्यांतले काही साध्यरूपही आहेत। उदाहरणार्थ, शेजाऱ्यावर प्रेम करावे असे जे खि्रस्ताने सांगितले आहे ते आदशर् मानवी जीवनाचा एक भाग आहे, आदशर् जीवन प्राप्त करून घेण्याचे ते नुसते साधन नव्हे। नेतिकतेविषयी विचार करायचा म्हणजे केवळ परस्त्रीविषयी व परवित्ताविषयी आfभलाषा बाळगू नये। अशा नेतिक नियमांचा विचार करायचा इतकेच नाही; तर चांगल्या, श्रेयस्कर व आदशर् जीवनाचा विचार करणे हेसुद्धा त्यात बसते हे लक्षात ठेवले पाहिजे। कला आणि नीती यांच्यातील संबंध म्हणजे कला व पुरूषार्थ विंढवा जीवनमूल्ये यांच्यातील संबंध होय। कला जीवनासाठी आहे। असे मानणाऱ्यांपेकी बहुतेकांच्या मते कलेला केवळ साधनमूल्यच असते। पण सर्वच जीवनवादी असे मानतात अशातला भाग नाही। कारण कला स्वायत्त आहे असे मानणारे लोकही जीवनवादी असू शकतात। कलेला स्वायत्तता दिली तरी कलेमुळे एकुण जीवन जास्त संपन्न होते, म्हणून स्वायत्त कलासुद्धा अखेरीस आदशर् जीवनाचा भागच ठरते। मूरने अंतिम श्रेयाची (ूप ग््ाaत्) संकल्पना विशद करताना सौंदर्यग्रहणाला महत्त्वाचे स्थान दिलेले आहे।4 सौंदर्यास्वाद अंतिम श्रेयाचा एक भाग आहे; परंतु इतर मूल्यांचे तो एक साधन आहे असे मानायची गरज नाही। तो स्वायत्त राहूनही अंतिम श्रेयाचा भाग होऊ शकतो। कांहींच्या मते सौंदर्य स्वायत्त राहिल्यासच ते अंतिम श्रेयाचा एक भाग होऊ शकते। अशा रीतीने कलामूल्याची स्वायत्तता अबाधित राखून कला जीवनासाठी आहे असे म्हणता येते। परंतु अशा संयत नीतिवादी सिद्धान्तांना आपल्या चर्चेत फार महत्त्वाचे स्थान देता येणार नाही। उलट, ज्यांत कलेला केवळ साधन मानलेले आहे, विंढवा कलामूल्याला इतर कोणत्या तरी मूल्याचा-उदाहरणार्थ, नेतिक मूल्याचा-प्रकार मानले आहे, अशा सिद्धान्तांची चर्चा आपण प्रामुख्याने करणार आहोत। कारण सौंदर्यशास्त्रज्ञांनी व समीक्षकांनी याच सिद्धान्तांना महत्त्व दिले आहे। जीवनवादी सौंदर्यशास्त्रज्ञ आपल्या सिद्धान्ताची मांडणी वेगवेगळया तऱ्हांनी करतात आणि कला व जीवन यांच्यातील संबंधाबद्दलच्या त्यांच्या कल्पनाही वेगवेगळया आहेत। त्यांपेकी काही महत्त्वाच्या सिद्धान्तांचा आपल्याला स्वतंत्रपणे विचार करायचा आहे। त्याआधी जीवनवादी दृष्टिकोणाचे एक वेशिष्टय सांगितले पाहिजे; या दृष्टिकोणानुसार कलाकृतीतल्या आशयाला सर्वांत महत्त्वाचे स्थान असते। जर रचना व आशय यांत डावेउजवे करण्याचा प्रसंग आला तर जीवनवादी सौंदर्यशास्त्रज्ञ रचनेपेक्षा आशयाला वरचे स्थान देतील। यांपेकी पुष्कळजण असेही मानतात की कलाकृतीतले रचनातत्त्व आशयावर अवलंबून असते।

9।3
आपण टाॅल्स्टाॅयच्या सिद्धान्तापासून या विषयाच्या चर्चेला सुरूवात करू। टाॅल्स्टाॅयने आपला सिद्धान्त व्हाॅट ईज आर्ट? या पुस्तकात मांडलेला आहे। त्याचा सिद्धान्त हा काहीसा आfतरेकी सिद्धान्त आहे। त्याला आfतरेकी म्हणण्याचे कारण असे की त्यात कलेचा विचार एक प्रत्यक्ष जीवनसंवर्धक साधन म्हणूनच केवळ करण्यात आलेला आहे। आणि कलेने कोणते श्रेयस गाठायचे याबद्दलही टाॅल्स्टाॅयची ठाम मते आहेत। टाॅल्स्टाॅयच्या मते कला हा मानवी अनुभवाच्या देवाणघेवाणीचा एक मार्ग आहे। शब्दांच्या द्वारा विचार एकाकडून दुसऱ्याकडे संक्रमित होतात; त्याचप्रमाणे कलेच्या द्वारा भावना संक्रमित होतात।5 एका माणसाने व्यक्त केलेल्या भावनांचा संसर्ग (ग्हfाम्aूग्दह) इतरांना होऊन त्यांनाही त्या भावना अनुभवायला मिळतात। भावनेच्या प्रत्येक आविष्काराला कला हे नाव प्राप्त होत नाही। उदाहरणार्थ, ज्या भावना अजाणता व्यक्त होतात त्यांतून कला निर्माण होत नाही। आपला भावनानुभव इतरांना मिळावा यासाठी ज्या वेळी जाणीवपूर्वक प्रयत्न केला जातो त्या वेळीच कला निर्माण होते।6 भावनेची ऊर्मी आल्याबरोबर तिच्यातून जो सहजोद्गार निघेल तो म्हणजे कला नव्हे। जीवनाच्या प्रवाहात असताना जे भावनानुभव येतात त्यांचा आपण जाणीवपूर्वक आविष्कार करतोच असे नाही। पुष्कळदा आपण भावनेचे वर्णन करतो। उदाहरणार्थ, आपण असे म्हणतो की मला त्या वेळी भयंकर भीती वाटली। असे वर्णन करणे म्हणजेही कलानिर्मिती करणे नव्हे। एकदा अनुभवलेली भावना मनात पुन्हा जागृत करून जाणीवपूर्वक ती अशा तऱ्हेने व्यक्त करायची की तिचा इतरांनाही अनुभव येईल याला कलानिर्मिती म्हणतात।7 येथे दोन मुद्दे नमूद करायला हवेत ः (1) टाॅल्स्टाॅयच्या कलेविषयीच्या सिद्धान्तात आणि वर्ड्सवर्थच्या काव्याविषयीच्या सिद्धान्तात खूपच साम्य आहे। दोघांच्याही मते कलेत जी भावना व्यक्त होते ती मुळात उद्भवली त्या अवस्थेतली नसून ती पुनरूज्जीवित भावना असते। भावनेच्या या दोन अनुभवांमध्ये जो कालावधी जातो त्यात तिच्यावर चिंतन होऊन तिला व्यवस्थित आकार प्राप्त होतो। ही कल्पना दोघांच्याही मनांत असावी असे वाटते। (2) टाॅल्स्टाॅयला आfभप्रेत असलेला कलावंत केवळ इतरांमध्ये भावनिर्मिती घडवून आणतो असे नाही। तो स्वतःही प्रस्तुत भावना अनुभवतो। प्रचारकी वाङ्मय लिहिणाऱ्या माणसाची गोष्ट वेगळी असते। तो एखाद्या जाहिरातदारासारखा वागू शकतो। कोल्गेट टूथ पेस्टची जाहिरात करणारा माणूस स्वतः ती पेस्ट वापरीत असेल असे नाही। तसेच दारूबंदीच्या प्रचारासाठी वाङ्मय लिहिणारा लेखक स्वतः दारू पीत नसेल असे नाही। कदाचित दारू पिऊनच तो दारूबंदीविषयी उत्तम लिहू शकत असेल। लेखक म्हणजे इतरांमध्ये भावनिर्मिती करणारा माणूस, इतकेच म्हटले तर स्वतः त्याच्यात भावोत्पत्ती झाली नाही की नाही हा प्रया> अप्रस्तुत ठरतो। पण टाॅल्स्टाॅयला असा कलावंत आfभप्रेत नाही। त्याच्या मते कलानिर्मितीच्या वेळी कलावंतातही भावजागृती होते। कलावंत व आस्वादक दोघेही एकाच भावनेने हेलावले जातात। कला हे भावनासंक्रमणाचे एक प्रभावी माध्यम असल्यामुळे विविध माणसांना एकत्र आणण्याचे प्रशंसनीय कार्य तिच्या हातून घडते। मानवजातीच्या कल्याणासाठी कलेची फार मदत होते ती या गुणामुळेच।8 खऱ्या जातिवंत कलेमध्ये भावनासंक्रमणाची शवमती असते; तिच्यामुळेच खरी कला व नकली कला यांच्यात भेद करता येतो।9 आणि हाच गुण कलेच्या गुणवत्तेचा एकमेव निकषही ठरतो।10 कलेतील आशय कसा हवा याविषयी विवेचन करताना टाॅल्स्टाॅय म्हणतो की मानवाला पूर्णत्वाला नेण्याचे कला हे एक साधन आहे।11 चुकीच्या विचारांची जागा वास्तवदशाa विचारांनी घेतली की माणूस वेचारिक दृष्टया पूर्णत्वाच्या दिशेने जात आहे असे मानण्यात येते। भावनेच्या दृष्टीने माणसाची प्रगती होणे म्हणजे त्याच्यातील दुष्ट भावना लुप्त होऊन त्यांची जागा सुष्ट भावनांनी घेणे होय।12 कला किती प्रभावीपणे भावनासंक्रमण करू शकते यावर तिची गुणवत्ता अवलंबून आहे हे आपण बघितलेच आहे। कलेतील आशयाची गुणवत्ता तो आशय मानवी प्रगतीला कितपत हातभार लावतो यावर अवलंबून आहे।13 पुढे टाॅल्स्टाॅय म्हणतो की भावनांची सुष्टता व दुष्टता ठरविण्याचा एकमेव मार्ग म्हणजे धार्मिक दृष्टिकोणातून त्यांचे मूल्यमापन करणे हा होय। जीवनाचा अर्थ काय याविषयी प्रत्येक समाजाची एक विशिष्ट कल्पना असते। ही कल्पना म्हणजे त्या समाजाचा सर्वाच्च पुरूषार्थ होय। जीवनातील गोष्टींचे मूल्यमापन अखेरीस या सर्वाच्च मूल्याच्या दृष्टीनेच होत असते। या दृष्टीलाच टाॅल्स्टाॅय धार्मिक दृष्टिकोण म्हणतो।14 आपल्या युगातील धार्मिक दृष्टिकोणातून बघितले तर असे लक्षात येईल की बंधुभावाची भावना सर्वांत महत्त्वाची आहे। तिचे संवर्धन होणे अत्यावश्यक आहे। त्यातच आपल्या सर्वांचे, सर्व प्रकारचे कल्याण आहे। या सर्वाच्च मूल्याच्या दृष्टीनेच जीवनातील विविध गोष्टींचे मूल्यमापन व्हावयास हवे। कलेच्या मूल्यमापनासाठीही हाच मानदंड वापरायला हवा। ज्या कलेमुळे बंधुभाव निर्माण होईल ती कला चांगली आणि बंधुभावाच्या विरोधी असलेली कला वाईट असते असे म्हणायला हवे। या दोन वर्गांमध्ये न मोडणाऱ्या कलेला आपण महत्त्व देता कामा नये।15 जसा बंधुभाव महत्त्वाचा आहे तशी आपण सर्व ईश्वराची लेकरे आहोत ही भावनाही महत्त्वाची आहे। खरे म्हणजे या दोन भावना एकमेकींशी जोडलेल्याच आहेत। आपण सर्व ईश्वराची लेकरे आहोत म्हणूनच आपल्यात ईश्वराविषयी प्रेम व सर्व मानवांविषयी बंधुभाव असायला हवा। या दोन्ही भावनांची जोपासना कलेने-विशेषतः खि्रस्ती समाजातील कलेने-केली पाहिजे।16 याशिवाय सहजीवनाला उचित अशा ज्या अगदी साध्या भावना आपल्या मनात निर्माण होतात त्यांनाही टाॅल्स्टाॅयने महत्त्व दिलेले आहे (उदाहरणार्थ, अनुकंपा, समधातवृत्ती, आनंदी वृत्ती), कारण त्यांच्यामुळेही बंधुभाव वाढतो।17 टाॅल्स्टाॅयच्या मते चांगल्या कलेने विश्वबंधुत्वाची भावना पोसली जाते, आणि अशीच कला निर्माण केली पाहिजे। जिच्यामुळे ही भावना कमजोर होईल अशी कला वाईटच म्हणायला हवी। तिचे समूळ उच्चाटन केले पाहिजे। देशभवमतीसारख्या संकुचित भावना व्यक्त करणाऱ्या कादंबऱ्या व कविता यांना आणि केवळ श्रीमंत खुशालचेंडूंच्या नेराश्यादी भावना व लेंगिक प्रेमाभोवती गोळा होणाऱ्या विकृत भावना यांच्याबद्दलच्या वाङ्मयकृतींना टाॅल्स्टाॅय वाईट कलाकृती मानतो। समाजातील बहुसंख्य लोकांना या भावना आकलनच होत नाहीत असे त्याचे म्हणणे आहे।18 ज्या भावना कळतच नाहीत त्यांची सहानुकंपने लोकांच्या मनात कशी निर्माण होणार? आणि सहानुकंपने निर्माण करणे हे जर कलेचे कार्य असेल तर वरील भावनांचा आविष्कार करणाऱ्या वाङ्मयकृती कला म्हणून कमी दर्जाच्या ठरत नाहीत का? टाॅल्स्टाॅयच्या मते प्रत्येक कलाकृतीविषयी पुढील प्रया> विचारायला हवेत ः (1) ती अस्सल कलाकृती आहे की नकली? तिच्यामुळे भावनांचे संक्रमण होते की नाही? जर भावनासंक्रमण होत नसेल तर ती कलाकृती नकली ठरेल। (2) एखाद्या कलाकृतीमुळे भावनासंक्रमण होते असे ठरले तर या संक्रमणाची व्याप्ती किती, हे विचारले पाहिजे। वाईट कला एखाद्या लहान गटाच्या भावनांचा आविष्कार करीत असल्यामुळे तिच्यामुळे होणाऱ्या भावनासंक्रमणाची व्याप्ती फार लहान असणार, हे उघड आहे। चांगल्या कलेची व्याप्ती खूपच विशाल असते। (3) यानंतर असे विचारले पाहिजे की चांगली कला कोणत्या प्रकारच्या भावनांचे संक्रमण करते-सहजीवनाला पोषक अशा अनुकंपा, आनंदी वृत्ती या भावनांचे की ईश्वराविषयीचे प्रेम व सार्वत्रिक बंधुभाव या भावनांचे19? टाॅल्स्टाॅयने केलेल्या वर्गीकरणाप्रमाणे सार्वत्रिक बंधुभावाला पोषक असलेली कला सर्वाच्च ठरते। पण टाॅल्स्टाॅयचे निकष वापरल्यामुळे ज्यांना आपण महान कलाकृती मानतो त्यांपेकी बहुतेकांचे अवमूल्यन होते। उदाहरणार्थ, टाॅल्स्टाॅयच्या मते बिथोव्हनची नाइन्थ सिम्फनी ही वाईट कलाकृती ठरते।20 दांतेची डिव्हाइन काॅमेडी, शेवमसपिअरच्या व गटेच्या वाङ्मयापेकी बहुतेक वाङ्मय, बाॅदेलेर इब्सेन, मेटरलिंक इत्यादींचे लेखन टाॅल्स्टाॅयच्या टीकास्त्रापासून वाचेल असे दिसत नाही। वाईट कलेचा उदो उदो झाल्यामुळे सामान्य माणसांच्या मनात कसा गोंधळ उडतो हे टाल्स्टाॅयने दाखविले आहे। तो म्हणतो की शारीरिक शक्ती विंढवा नेतिक मोठेपणा यांच्यापुढे नतमस्तक व्हायला पाहिजे हे सामान्य माणसाला कळते। पण नुसते पाचकळ प्रेमकाव्य लिहिल्यामुळे पुिष्कनचा गौरव होत असलेला जेव्हा तो बघतो तेव्हा त्याचा विलक्षण गोंधळ उडतो।21 सौंदर्याच्या नावाखाली अनाचार, अनीती यांना कलावंतांकडून आणि विचारवंतांकडून प्रोत्साहन मिळते ही त्याच्या मते फार अस्वस्थ करून टाकणारी गोष्ट आहे।22 हे बंद झाले पाहिजे असा टाॅल्स्टाॅयचा आग्रह आहे, आणि त्यासाठी असंख्य कलाकृतींचा बळी द्यायला तो तयार आहे। आपण टाॅलस्टाॅयच्या नीतिवादी कलामीमांसेची छाननी थोडी नंतर करणार आहोत। त्याच्या भूमिकेत व प्लेटोच्या भूमिकेत काही बाबतींत फार साम्य असल्यामुळे त्या दोघांच्या दृष्टिकोणांचा विचार एकाच जागी करणे योग्य ठरेल। पण येथे एक दोन मुद्दयांचा निर्देश करणे जरूर आहे। पहिला मुद्दा असा की टाॅल्स्टाॅयला कलेविषयी नितांत आदर आहे। आणि असा आदर असल्यामुळेच कलेत विकृती निर्माण करणाऱ्या कलावंतांविषयी व सौंदर्यसिद्धान्तांविषयी त्याच्या मनात इतका तिरस्कार आहे। कलेविषयी आदर असल्यामुळे आणि तिच्या सामथ्र्याची जाणीव असल्यामुळे तो कलेच्या संकल्पनेला एका विशिष्ट पद्धतीने घडविण्याचा प्रयत्न करीत आहे। दुसरे असे की त्याने नीतिवादी दृष्टिकोणाचा जसा प्रभावीपणे पुरस्कार केलेला आहे, तसा इतरही काही गोष्टींचा पुरस्कार केलेला आहे। आणि ज्यांना टाॅलस्टाॅयचा नीतिवाद मान्य नाही अशांनासुद्धा त्याने पुरस्कारिलेल्या इतर गोष्टी विचारार्ह वाटतील। उदाहरणार्थ, टाॅल्स्टाॅयच्या मते कलाव्यवहार हा एकूण मानवी जीवनाचा आfवभाज्य घटक असायला हवा। केवळ कलानिर्मिती करणाऱ्या कलावंतांचा एक वेगळा वर्ग असावा, त्याला समाजाने पोसावे ही कल्पना टाॅल्स्टाॅयला आfजबात मान्य नाही।23 राजाच्या दरबारात गवई असतो, त्याप्रमाणे राजकवीही असतो। लोकशाही राज्यात इतर कलावंतांप्रमाणे लेखकांनाही मानधन मिळते। याला टाॅयल्स्टाॅयचा विरोध का असावा? राजाश्रय मिळाल्यामुळे कलावंताची कलासाधन निर्वेधपणे चालणार नाही का? काही कलांच्या बाबतीत असे म्हणता येईल की राजाश्रय कलेला पोषक असतो। उदाहरणार्थ, राजाश्रयामुळे गायकाचा फायदाच होईल। पण वाङ्मयकृतीच्या निर्मितीला राजाश्रय पोषक न ठरण्याची शवमयता आहे। पोटापाण्याची चांगली व्यवस्था झाली, आवश्यक त्या सुखसोयी उपलब्ध झाल्या की लेखकाला प्रत्यक्ष जीवनाच्या धकाधकीत पडण्याची गरज भासणार नाही। त्याचे अनुभवविश्व संकुचित व बेगडी होईल। आणि यामुळे तो कसदार कलाकृती निर्माण करू शकणार नाही। प्रत्यक्ष जीवन हे ज्या कलेचा आशय असते तिच्या बाबतीत राजाश्रय नसलेलाच बरा। या कलांचा प्रत्यक्ष जीवनाशी इतका जवळचा संबंध असतो की जीवनाच्या धकाधकीत भाग घेणाराच त्या निर्माण करू शकतो। आपला उदरनिर्वाह नीट व विनासायास चालणार आहे याची खात्री लेखकाला नसलेलीच बरी, असे टाॅल्स्टाॅयचे मत आहे। अशी शाश्वती वाटू लागली तर तिचा त्याच्या कलेवर आfनष्ट परिणाम होईल।24 आशयप्रधान कलाकृतींच्या संदर्भातच टाॅल्स्टाॅयचा हा आग्रह विचारार्ह ठरतो यात शंका नाही। ज्यात आशयाला पूर्णपणे फाटा दिलेला असतो अशा कलाकृतींच्या संदर्भात टाॅल्स्टाॅयचा विचार पूर्णपणे अप्रस्तुत ठरण्याची शवमयता आहे। जो गायक स्वरांची केवळ रचना निर्माण करतो त्याचे भावजीवन समृद्ध आहे की नाही,याचा नीतिविषयक दृष्टिकोण योग्य आहे की नाही, इत्यादी प्रया> आपण विचारीत नाही। कारण स्वरांची मनोहर गुंफण करण्याची कुवत असणे आणि भावजीवन समृद्ध असणे यांचा अर्थाअर्थी काहीच संबंध नाही। केवळ गाण्याच्या विश्वात जगणारा व इतर विश्वाशी फटकून वागणारा गायक चांगली स्वररचना निर्माण करू शकेल याबद्दल शंका नाही। रचनाप्रधान कलाकृतीबद्दल टाॅल्स्टाॅय बोलत नाही, त्यांचा त्याने विचारच केलेला नाही, असे यावरून वाटते। पण ही एकटया टाॅल्स्टाॅयची मर्यादा नसून सर्व नीतिवादी सौंदर्यशास्त्रज्ञांचीच ही मर्यादा आहे, हे विसरून चालणार नाही। रचनाप्रधान कलाकृतीला कोणत्या तरी आशयाचे प्रतीक बनवून तिच्यातून भावाविष्कार होतो असे मानल्याखेरीज तिच्या संदर्भात नीतीचे प्रया> उपस्थितच करता येत नाहीत। पण रचनाप्रधान कलाकृतीवर अशा रीतीने आशय लादणे योग्य आहे का, हा प्रया> उपस्थित करून या नीतिवादी प्रयत्नांना आळा घालणे रचनावाद्याला सहज शवमय होते। कलाकृती सुलभतेने आकलन होणे यावर टाॅल्स्टाॅय फार भर देतो। विशेषतः जी कलाकृती सामान्यांना कळत नाही तिला तो चांगली कलाकृती म्हणेल असे वाटत नाही। पुष्कळ टीकाकार असे म्हणतात की चांगली कलाकृती व्यवस्थित कळायला आस्वादकाची तेवढी पात्रता व तयारी हवी। त्यावर टाॅल्स्टाॅयचे म्हणणे असे की या तथाकथित उत्तम कलाकृती सामान्यांना कळत नसतील तर त्या त्यांना समजावून सांगितल्या पाहिजेत, त्या कळण्यासाठी जे कौशल्य व ज्ञान आवश्यक असते ते त्यांना उपलब्ध करून दिले पाहिजे। पण खरी गोष्ट ही आहे की असे काही खास ज्ञान आfस्तत्वातच नाही। या कलाकृती सामान्यांना कशा कळतील, यावर वर उल्लेखिलेल्या टीकाकारांचे उत्तर एकच ः या कलाकृती लोकांनी वारंवार बघितल्या तरच त्या त्यांना कळतील। पण असे करायला सांगणे म्हणजे या कलाकृती समजावून सांगणे नव्हे विंढवा त्यांचे रहस्य उलगडण्यासाठी लागणारे ज्ञान देणे नव्हे। वरील सल्ल्याचा अर्थ इतकाच की या कलाकृती वारंवार बघितल्या तर त्या बघण्याची आपल्याला सवय लागेल आणि सवयीने कोणतीही गोष्ट आवडू शकते-व्यसनासारख्या वाईट गोष्टीही सवयीमुळेच आवडू लागतात।25 टाॅल्स्टाॅयच्या म्हणण्यात काही प्रमाणात तथ्य आहे हे निश्चित। पण ते पूर्णपणे स्वीकार्य मानता येणार नाही। पुष्कळ वेळा आपल्यावर जसे संस्कार झाले असतील तशा आपल्या आवडीनिवडी बनतात। विविधभारतीवरचे पिढल्मी संगीत ऐकायचा संस्कार झाला तर ते आपल्याला आवडते, नाटयसंगीत संस्कार झाला तर ते आवडू लागते। पण विविध प्रकारचे संगीत आपण ऐकू लागलो तर नुसत्या संस्कारांवर आपण अवलंबून राहत नाही। आपण त्यात सरसनिरस ठरवितो। आणि ज्याचा संस्कार जास्त काळ झाला ते जास्त सरस असे मानीत नाही। उलट एखाद्या संगीतप्रकारचे आपल्यावर कमी संस्कार झाले असतील आणि तो संगीतप्रकार जास्त मूल्ययुक्त आहे असे आपल्यावर पटले असेल, तर त्याचे आfधक संस्कार घडविण्यासाठी आपण धडपड करतो। येथे मूल्याचे व्यवस्थित आकलन होण्यासाठी आfधक संस्काराची जरूरी आहे ही जाणीव नंतर येते। याचा अर्थ असा की मूल्याची जाणीव ही केवळ आवडीनिवडीप्रमाणे सवय व संस्कार यांच्यावर अवलंबून नसते। जे जास्त व्यापक, दमदार, व्यामिश्र असते ते जास्त समाधानकारक, जास्त मूल्ययुक्त आहे अशी आपली धारण असते। ज्यामुळे आपल्या व्यविमतत्वाच्या विविध पेलूंना जास्तीत जास्त आवाहन होईल आणि समाधान लाभेल ते जास्त मूल्ययुवमत असे आपण समजतो। अशा गोष्टी समजायला बहुधा कठिण असतात। पण हा कठिणपणा आपण एक आव्हान म्हणून स्वीकारतो। त्यामुळेच विशिष्ट प्रकारचे संस्कार आपल्यावर घडवून आणण्याची आपण धडपड करतो। पिढल्मी गाण्याची तीन मिनिटांची तबकडी कळायला फारशी तयारी लागत नाही; पण एक तासाचा ख्याल कळायला मात्र पुष्कळच तयारी लागते। आणि ही तयारी म्हणजे नुसती सवय नव्हे। नुसती सवय व डोळस संस्कार यांच्यातील भेद आपण विसरता कामा नये। पण आकलनीयता म्हणजे आशय व तंत्र यांचा सोपेपणा इतकाच अर्थ टाॅल्स्टाॅयला आfभप्रेत असेल असे वाटत नाही। खुशालचेंडू व श्रीमंत लोकांच्या कलेवर टीका करीत असताना तो आकलनीयतेचा मुद्दा उपस्थित करतो ही गोष्ट महत्त्वाची आहे। जीवनाच्या मध्यवर्ती स्त्रोतापासून वेगळे झालेले मूठभर श्रीमंत लोक आपल्या स्वतःच्या करमणुकीसाठी सामान्यांना आकलन होणार नाही अशी-बहुधा व्यविमतकेंद्रित विंढवा गटकेंद्रित-कला निर्माण करतात। ही कला विकृत आहे कारण ती समाजजीवनापासून वेगळी पडलेली आहे असे टाॅल्स्टाॅयचे मत आहे। आपण थोडा वेळ गरीब-श्रीमंत हा भेद विसरून या प्रया>ावर विचार केल्यास आपल्याला असे आढळेल की टाॅल्स्टाॅयच्या म्हणण्यात काही प्रमाणात निश्चित तथ्य आहे। समाज म्हणजे दगडाचा एकसंध चिरा नाही हे खरे। आणि देश व काल यांच्या पलीकडे असलेला वेिश्वक (ल्हग्नrेaत्) मानव म्हणून काही चीज आfस्तत्वात नसते हेही खरे। पण याचा अर्थ असा नाही की प्रत्येक माणूस स्वतंत्र बेट असून माणसामाणसांत आfजबात साम्य नसते। त्यांच्यात भेद असतात, त्याचप्रमाणे साम्यही असते। विशेषतः कोणत्याही कालखंडात दिसून येणारे मानवी समस्यांचे सारखेपण आपण या संदर्भात लक्षात ठेवले पाहिजे। प्रत्येक माणसासमोर त्याच्या व्यक्तिगत समस्या असतात, त्याचप्रमाणे तो ज्या समाजाचा घटक असेल त्या समाजातील सर्व घटकांना समान असलेल्या समस्याही त्याच्या समोर असतात। या समस्यांविषयीच्या सर्वांच्या प्रतित्रिढया सारख्या नसतील, त्या सोडविण्यासाठी त्यांनी सुचविलेले मार्ग वेगवेगळे असतील। पण त्या समस्या मात्र एकच असतात। समाजजीवनाचा मध्यवर्ती स्त्रोत म्हणजे या समस्या होत। उदाहरणार्थ, आपल्या देशात दिसणारे भयानक दारिऱ्द्य, वरपासून खालपर्यंत दिसणारा भ्रष्टाचार, सर्व ठिकाणी प्रत्यक्ष व्यवहारात दिसणारे बुद्धिमांद्य, आळस, स्वार्थ, सुखलोलुपता, फुटीरपणा या आपल्या समाजापुढच्या काही समान समस्या आहेत। श्रीमंत व गरीब, सुशिक्षित व आfशक्षित, पुढारलेले व मागासलेले अशा सर्वांपुढे त्या आ वासून उभ्या आहेत। जोपर्यंत मुंबईत गलिच्छ वस्त्या आहेत तोपर्यंत पेडर रोडवरील श्रीमंतांच्या आरोग्यालाही धोका आहे। कोणीतरी एंजिनीअर लाच खातो म्हणून नुकत्याच बांधलेल्या रस्त्यावरही खड्डे दिसू लागतात आणि त्यामुळे गरिबाची सायकल जशी मोडते तशी श्रीमंताची इंपालासुद्धा बिघडते। आपले सर्वांचे व्यक्तिजीवन या समान समस्यांशी निगडित झाले आहे आणि त्यांनी संस्कारित झाले आहे। त्यामुळे व्यक्तिजीवनाचे चित्रण करताना समाजजीवनाचे चित्रण त्यात अपरिहार्यपणे येते। दोन व्यक्तींना व गटांना जोडणारा बंध म्हणून समान समाजजीवनाला फार महत्त्व आहे। समाजजीवनाशी एकरूप होणे म्हणजे सामाजिक प्रया>ांवर कादंबरी लिहायला घेणे नव्हे। कलावंताने व्यक्तिजीवनावर जरूर लिहावे। पण असे करताना त्याला समाजजीवनाचा विसर पडून उपयोगी नाही। असा विसर पडला तर त्या व्यक्तिजीवनाचे चित्रणही बेगडी व तकलादू होते। कारण त्या व्यक्तिजीवनाला कोणत्याच समाजात मुळे नसतात आणि समाजजीवनात ज्याला मुळे नाहीत असे व्यक्तिजीवन खोटे व तकलादू असेच असते। असे तकलादू जीवन जगणारे लोक प्रत्येक समाजात असतात।26 त्यांनी निर्माण केलेली कलासुद्धा बेगडीच ठरते। ती सामान्यांना कळत नाही कारण समाजाच्या मध्यवर्ती जीवनस्त्रोताशी तिचा काहीही संबंध नसतो। अशा कलेविषयी टाॅल्स्टाॅय बोलतो आहे। आणि म्हणूनच त्याच्या मताला महत्त्व आहे।

9।4
यानंतर आपण प्लेटोच्या नीतिवादी सिद्धान्ताचा विचार करू। प्लेटो व टाॅल्स्टाॅय यांच्या सिद्धान्तांत जसे साम्य आहे तसे भेदही आहेत। ते भेद असे ः टाॅल्स्टाॅयच्या मते कलेचा कला म्हणून जरी विचार केला तरी नीतिगुणाचा परिपोष हाच तिच्या मूल्यमापनाचा अखेरचा निकष आहे। भावनासंक्रमणक्षमतेला तो कलेचा निकष मानतो हे खरे। पण पुढे चांगली कला व वाईट कला असा भेद करून टाॅल्स्टाॅय म्हणतो की बंधुभाव वाढविणारी कलाच चांगली असते। वाईट कला बंधुभावाच्या विरोधी भावना प्रसृत करते। पण त्यामुळेच तिच्या भावनासंक्रमणक्षमतेवर बंधने पडतात। एखाद्या विशिष्ट गटापलीकडे ती कळतच नाही। याचा अर्थ असा की भावनासंक्रमणक्षमता हा जरी कलेचा निकष असला तरी भावनांच्या जातीवर ही संक्रमणक्षमता अवलंबून असते; म्हणून खऱ्या अर्थाने सद्भावांचे सक्रमण हा नुसत्या चांगल्या कलेचाच नव्हे तर सर्व कलेचा निकष ठरतो। प्लेटो कलेला निकष लावतो हे खरे आहे; पण नेतिकता हाच कलेचा एकमेव निकष आहे असे तो मानीत नाही। प्लेटोचे कलेवर-विशेषतः काव्यावर-फार प्रेम होते। त्याच्या स्वतःच्या तात्तविक लिखाणात वाङ्मयीन गुण आढळतात असे टीकाकारांचे मत आहे।27 काव्याने आनंद मिळतो आणि जर आपल्या आदशर् राज्यात कवींना स्थान देता आले असते तर ते त्याला आवडले असते।28 पण काव्यामुळे मानवी व्यक्तित्वावर वाईट परिणाम घडतात आणि म्हणून तिला मोठया नाइलाजाने हद्दपार करावे लागत आहे, असे तो म्हणतो। जर प्लेटोच्या मनात सद्गुणांचा परिपोष हाच काव्याचा एकमेव निकष असता तर कवींच्या हद्दपारीबदल त्याला खंत वाटली नसती। काव्य सद्गुणांचा परिपोष करीत नाही हे सिद्ध झाल्यावरही कवींना हद्दपार करावे लागत असल्याबद्दल प्लेटोला दुःख होत असल्याचे दिसते। याचा अर्थ असा की काव्याविषयी विचार करताना प्लेटो सद्गुणपरिपोषाखेरीज आणखीही एखादा निकष वापरीत असावा। तो निकष सौंदर्य हा असणे शवमय आहे। प्लेटोचे सौंदर्याबद्दलचे विवेचन व कलांविषयीचे विवेचन यांत तफावत आहे। आपल्या पिढड्रस या संवादामध्ये प्लेटोने सौंदर्याचा गौरव केलेला आहे। जगातील सर्व गोष्टींच्या मुळाशी त्यांची सत्त्वे असतात। सुंदर गोष्टींच्या मुळाशीही सौंदर्याचे सत्त्व असते। पण सौंदर्याचे सत्त्व इतर सत्त्वांपेक्षा एका महत्त्वाच्या बाबतीत निराळे आहे। इतर सत्त्वे इंद्रियगोचर नसतात; ती केवळ मनश्चक्षूंनाच दिसतात। पण सौंदर्याच्या सत्त्वाची मात्र चर्मचक्षूंना जाण येते। असे असल्यामुळे सौंदर्य म्हणजे चर्मचक्षूंना दिसणारे जग व केवळ मनश्चक्षूंना दिसणारे सत्त्वांचे जग यांना जोडणारा दुवा आहे असे ठरते।29 असे असल्यामुळे सौंदर्य हे माणसाच्या आित्मक उन्नतीचे एक महत्त्वाचे साधन होऊ शकते असे म्हणता येईल। कलेत सौंदर्य असल्याने तिच्यामुळेही आित्मक उन्नती होईल ही अपेक्षा आपल्या मनात साहजिकच निर्माण होते। पण प्रत्यक्षात अनुभव अगदी उलट येतो। वाङ्मयादी कलांमुळे आत्मोन्नती होण्याऐवजी सद्गुणांचा ऱ्हास होतो, असे प्लेटोला आढळून आले। म्हणून त्याने कलांना हद्दपार करायचे ठरविले। पण त्या सुंदर असतात म्हणून त्यांना हद्दपार करताना त्याला दुःखही झाले। यावरून एक मुद्दा स्पष्ट होतो; तो हा की कलांबद्दल बोलताना प्लेटो टाॅल्स्टाॅयप्रमाणे केवळ एकेरी निकष वापरीत नव्हता। त्याचबरोबर हेही लक्षात ठेवले पाहिजे की सौंदर्य व नीती यांच्यात संघर्ष निर्माण झाल्यास प्लेटो नीतीची बाजू घेतो, सौंदर्याची नव्हे। रिपिब्लकमध्ये त्याने बरोबर हेच केले आहे। येथे कॅथरिन राॅने आपल्या आर्ट अँड सोसायटी-अ रीइंटरप्रिटेशन आॅफ प्लेटो या पुस्तकाच्या पहिल्या प्रकरणात उपस्थित केलेल्या एका मुद्दयाचा विचार करणे आवश्यक आहे। तिच्या मते रिपिब्लक मध्ये प्लेटोने सर्व कलाकृतींच्या धिवमकार केलेला नसून फक्त हलवमया प्रतीच्या, बाजारी कलाकृतींचा धिवमकार केलेला आहे। प्लेटोने सर्व कलाकृतींचा सरसकट धिवमकार केलेला नाही हे सत्य आहे। कारण देवादिकांची व उत्तम पुरूषांची स्तुती करणाऱ्या काव्याची त्याने तारीफ केलेली आहे। पण त्याने फक्त हलवमया कलाकृतींचाच धिवमकार केला आहे या विधानाच्या सत्यतेबद्दल शंका येते। टेलर तर असे स्वच्छ म्हणतो की प्लेटो फक्त हलवमया कलाकृतींचा धिवमकार करीत आहे असे समजणे म्हणजे स्वतःच्या डोळयांत धूळ फेकून घेणे होय। अथेन्सने जगाला दिलेल्या महान कलाकृतींचाच प्लेटोने धिवमकार केलेला आहे।30 प्लेटोन कलेविरूद्ध जे नेतिक आक्षेप घेतले आहेत त्यांचे स्वरूप लक्षात येण्यासाठी आपल्याला दोन गोष्टींची माहिती असणे आवश्यक आहे। त्यांतली पहिली गोष्ट रिपिब्लकमधील प्लेटोची भूमिका ही आहे। तेथे प्लेटोचा उद्देश आदशर् जीवनाची वेयक्तिक व सामाजिक घडण कशी असते हे स्पष्ट करण्याचा आहे। या आदशर् जीवनाला पोषक असतील त्याच गोष्टींना तो आपल्या आदशर् राज्यात स्थान देणार आहे। कलेचा केवळ कला म्हणून विचार करणे हा त्याचा उद्देश नाही। पण असे असले तरी कलेच्या स्वरूपाविषयी त्याने येथे व इतरत्र जे मुद्दे उपस्थित केले आहेत ते फार महत्त्वाचे आहेत। वर निर्देश केलेली दुसरी गोष्ट म्हणजे आदशर् जीवन कोणत्या सद्गुणांमुळे प्रस्थापित होते याचे प्लेटोने केलेले विवेचन ही होय। रिपिब्लकच्या चौथ्या पुस्तकात तो असे दाखवतो की आदशर् राज्यात व राज्यातील नागरिकांत चार सद्गुण असणे आवश्यक आहे। हे सद्गुण म्हणजे विवेक विंढवा ज्ञान (ेग्े्दस्), शौय (म्दल्raुा), संयम (ूास्जraहम) व न्याय (रल्ेूग्म) हे होत। ज्ञान, शौर्य व संयम यांच्यात सुसंगती प्रस्थापित झाली की न्याय निर्माण होतो।31 ज्या प्रमाणात कला या सद्गुणांचा परिपोष करते त्या प्रमाणात ती चांगली ठरते; जी कला त्यांना कमजोर करते ती वाईट असून तिला आदशर् राज्यातून हद्दपार केले पाहिजे असे प्लेटोचे म्हणणे आहे। प्लेटोन कलेविषयी विचारलेले प्रया> असे मांडता येतील ः (1) कलेमुळे ज्ञान वाढते का? माणसे विवेकी होतात का? (2) तिच्यामुळे शौर्याचा परिपोष होतो का? (3) कलेमुळे माणसे संयमी होतात का? या तीन प्रया>ांना होकारार्थी उत्तरे मिळाली तरच कलेमुळे माणसात न्यायाचे पोषण होते असे म्हणता येईल, आणि तरच आदशर् राज्यातील आदशर् नागरिक घडविण्याच्या कामी कला महत्त्वाचे कार्य करते असे सिद्ध होईल। पण वरील प्रया>ांना जर नकारार्थी उत्तरे मिळाली तर कलेचे उच्चाटन करणे योग्य ठरेल। वर दिलेल्या प्रया>ांपेकी दुसऱ्या व तिसऱ्या प्रया>ांचीच चर्चा आपल्याला या प्रकरणात प्रस्तुत आहे। रिपिब्लकच्या दुसऱ्या पुस्तकाच्या शेवटी प्लेटो म्हणतो की आपण लहान मुलांना भांडणांपासून परावृत्त केले पाहिजे। पण आपला उद्देश जर हा असेल तर त्यांच्या हातांत कवींनी लिहिलेल्या देवादिकांच्या गोष्टी पडणार नाहीत याची आपण खबरदारी घेतली पाहिजे। स्वर्गामध्ये देव एकमेकांशी लढतात, एकमेकांविरूद्ध कारस्थाने करतात, आदरणीय असे महाजनही आपल्या नातेवाइकांशी भांडतात असे कवी सांगतात। अशा गोष्टी ऐकल्या की मुलांना कोणतेही दुष्कृत्य करण्यात काही वाईट आहे असे वाटणार नाही।32 कवींनी देवांची जी चित्रे काढली आहेत ती आणखी एका कारणासाठी अनर्थकारक ठरतात। जगात चांगल्या व वाईट अशा दोन्ही प्रकारच्या गोष्टी दिसतात। त्यांतील फक्त चांगल्या गोष्टी देवांनी निर्माण केल्या आहेत असे कवींनी दाखवायला हवे। कारण देव जर चांगले असतील तर ते वाईट गोष्टी कशा निर्माण करतील? खरोखर हे कोणालाही पटायला हवे। पण कवींनी मात्र देवांना चांगल्या गोष्टींबरोबर वाईट गोष्टींचेही निर्माते बनविलेले आहे। त्यामुळे देव स्वभावतः फक्त चांगले असतात या श्रद्धेला धवमका पोचतो। त्याचप्रमाणे कवी असेही सांगतात की वेळप्रसंगी देव खोटे बोलतात, निरनिराळी रूप घेतात, इतरांना फसवितात। हेसुद्धा अनर्थकारकच आहे। रिपिब्लकच्या तिसऱ्या पुस्तकात प्लेटो असे सांगतो की कवी शौर्याचा परिपोष करीत नाहीत; उलट ते वाचकाच्या मनात भीती मात्र निर्माण करतात। उदाहरणार्थ, मृत्युलोकाची त्यांनी केलेली वर्णने इतकी भयप्रद असतात की मूल्यांच्या रक्षणासाठी सुद्धा लोक रणांगणावर मरायला तयार होणार नाहीत। ते अपमान, गुलामगिरी पत्करतील, पण सेनिकांना उचित असलेली वीरगती त्यांना नकोशी वाटेल। कवींनी मृत्युलोकाची जी वर्णने केली आहेत ती कितीही काव्यात्म असली तरी त्यांचे उच्चाटन केले पाहिजे। ती जितकी जास्त काव्यात्म असतील तितकी ती जास्त अपायकारक ठरतील।33 जर मृत्यू भयप्रद नसेल तर मृतांविषयी शोक करण्याचे कारण नाही। विवेकी माणसाने शोकाच्या आधीन होता कामा नये, त्याने आपल्या भावनांना बांध घातला पाहिजे, असे आपण म्हणतो। पण कवी मात्र देवांच्या विलापाचे रसभरित वर्णन करतात। प्रत्यक्ष देव शोकविव्हल झाल्याचे ऐकले की कोणीही माणूस संयमी होण्याचा प्रयत्नसुद्धा करणार नाही। साध्या साध्या प्रसंगातही शोकविव्हल होण्याची त्याला सवय लागेल।34 काव्यात वर्णिलेल्या देवांच्या हसण्याखिदळण्याचाही असाच वाईट परिणाम घडेल। देवांना शारीरिक सुखाची मोठी लालसा असल्याचेही कवींनी दाखविले आहे। देव दारूने धुंद व कामविव्हल झाल्याचे आणि विशिष्ट कामे करण्यासाठी त्यांनी देणग्या स्वीकारल्याचे वर्णन कवींनी केले आहे।35 स्वतः देवांनीच सर्व प्रकारची दुष्कृत्ये केल्याचे जर आपण वाचले तर अशी दुष्कृत्ये करण्यात काही गेर आहे असे आपल्यालाही वाटणार नाही। कवी सर्व वेळ देवादिकांच्याच गोष्टी सांगतात असे नाही। ते साध्यासुध्या माणसांच्या कथाही सांगतात। पण यातही ते अनर्थकारक प्रकार करतात। उदाहरणार्थ, ते असे दाखवितात की वाईट माणसांची पुष्कळदा भरभराट होते आणि सत्प्रवृत्त माणसांच्या पदरी हालअपेष्टा येतात; अन्यायाचे कृत्य उघडकीस आले नाही तर त्यामुळे फायदा होऊ शकतो असेही ते सांगतात।36 प्लेटोचे म्हणणे असे की सत्प्रवृत्त माणसांची भरभराट झाल्याचे व दुष्प्रवृत्त लोकांचा नायनाट झाल्याचे दाखविले नाही, तर लोकांना सत्प्रवृत्त व्हायची बुद्धी कशी होणार? प्लेटोने ज्याप्रमाणे काव्यातील आशयाविषयी आक्षेप घेतले आहेत त्याप्रमाणे काव्यातील काही आविष्कारपद्धतींवरही आक्षेप घेतले आहेत। काही वेळा कवी आपली गोष्ट सरळ सांगतो; इतर वेळा तो स्वतः काहीही न सांगता आपल्या कथेतील पात्रांना बोलायला लावतो। ही दुसरी पद्धती प्रामुख्याने नाटयात वापरली जाते। या पद्धतीत एक प्रकारचे अनुकरण आfभप्रेत आहे। कारण कवी जेव्हा आपल्या पात्रांना बोलायला लावतो तेव्हा तो त्या पात्रांचे अनुकरण करीत असतो असे म्हणता येईल। या अनुकरणाविषयी प्लेटोने आक्षेप घेतले आहेत। तो म्हणतो की आदशर् राज्यातील नागरिकांनी आपली स्वतःची कामे व्यवस्थित करण्यातच त्यांचे हित आहे; त्यांनी इतरांची कामे करणे चूक आहे, तसेच इतरांचे अनुकरण करणेही चूक आहे। अनुकरण करायचे झाल्यास फक्त आपल्या पेशाला साजेशा गोष्टींचे अनुकरण करावे। शूर, संयमी लोकांचे अनुकरण करणे चांगले; दुष्प्रवृत्त लोकांचे अनुकरण करणे वाईट। कारण दुष्प्रवृत्त लोकांचे अनुकरण करता करता आपण स्वतः दुष्प्रवृत्त होण्याची भीती असते।37 खलपुरूषाचे काम करता करता नट (विंढवा कवी) स्वतः खलपुरूष होण्याची भीती आहे हे प्लेटोचे मत आज कोणालाही पटणार नाही। पण थोडा विचार केल्यास त्याच्या म्हणण्यात थोडे तथ्य आहे असे लक्षात येईल। आपण नटाऐवजी वाचकाच्या दृष्टिकोणातून या प्रया>ाचा विचार करू। जर वाङ्मयकृतीत वाचकाचा आत्मानुप्रवेश होत असेल तर तो विशिष्ट पात्रांच्या, विंढवा लेखकाच्या भावना अनुभवतील। या भावना मुळात त्याच्या नसून कल्पनेने परकायाप्रवेश केल्यामुळे त्याला त्यांचा अनुभव येऊ शकतो। म्हणजे या भावना पात्रांच्या विंढवा कवीच्या अनुकरणामधून मिळालेल्या असतात। आपण जर दुसऱ्यांच्या भावना व त्यांचे भावनात्मक दृृष्टिकोण वारंवार आपलेसे केले तर आपल्या स्वतःच्या व्यक्तित्वावर त्याचा परिणाम घडणे सहज शवमय आहे। प्लेटोचा आfभप्राय हाच असावा। यानंतर प्लेटोने संगीताचा विचार केला आहे। गाण्यांना ज्या चाली दिलेल्या असतात त्या अर्थानुकारी असतात असे मानून त्याने आपली मते मांडली आहेत। दुःखाची आfभव्यक्ती करणारे लिडियन संगीत आणि दारूची धुंदी, आळस, मृदुता यांचा आविष्कार करणारे आयोनियन व लिडियन संगीत यांना आदशर् राज्यात स्थान असणार नाही। उलट, डोरियन व फ्रिजियन संगीत वीरश्रीपूर्ण व संयमी असल्यामुळे त्याला मात्र मानाचे स्थान असेल।37 प्लेटोने विवेचन केवळ काव्य व संगीत यांच्यापुरते मर्यादित नाही। चित्रकला, विणकाम, भरतकाम, स्थापत्यकला, हस्तव्यवसाय यांना तर ते लागू पडतेच; पण माणसाच्या भोवताली असलेल्या निसर्गातील गोष्टींनाही ते लागू पडते असा प्लेटोचा आग्रह आहे। आणि काव्यावर जसे राज्यकत्र्यांचे नियंत्रण असायला हवे तसे ते या इतर गोष्टींवरही असायला हवे असे तो बजावतो।39 आपण ज्या वातावरणात राहतो त्यातील सर्व गोष्टींचा आपल्या व्यक्तित्वावर कळत नकळत परिणाम घडत असतो आणि म्हणून या सर्व गोष्टींचा आपण नीट विचार केला पाहिजे असेच तो सांगतो आहे। काव्यामुळे आपल्या व्यक्तित्वार कसा वाईट परिणाम घडतो याचे प्लेटोने रिपिब्लकच्या दहाव्या पुस्तकातही पुन्हा थोडवमयात विवेचन केले आहे। येथे प्लेटोने दोन नवे मुद्दे मांडले आहेत। कवी संयमी लोकांचे चित्रण न करता भावविवश माणसांचेच चित्रण का करतात? याचे कारण असे की संयमी लोकांचे चित्रण करणे कठीण असते, आणि ते प्रेक्षकांना आवडतही नाही। असंयमी माणसांचे जीवन जास्त वेविध्यपूर्ण असते, आणि त्याचे चित्रण लोकांना आवडतेही।40 दुसरा मुद्दा वाङ्मयाच्या परिणामाविषयीचा आहे। एरव्ही संयमी असलेले लोकही वाङ्म वाचताना असंयमी कसे होतात हे प्लेटोने दाखविले आहे। स्वतःवर आपत्ती आली तर आपण संयम सोडत नाही पण दुसऱ्यावर आपत्ती आपली असता त्याच्याविषयी सहानुभूती वाटली तर त्यात काहीच गेर नाही असे आपल्याला वाटते। प्लेटोचे म्हणणे असे की एकदा इतरांच्या बाबतीत सहानुभूती व दुःख निर्माण झाले की ते आपल्या मनात घर करून राहते आणि आपल्यावर आपत्ती आली असता आपण संयमाने वागू शकत नाही।41 प्लेटोने सर्व कला व काव्य यांच्यावर बंदी घातलेली नाही; विशिष्ट प्रकारच्याच कलाकृतींवर व काव्यांवर त्याचा रोख आहे हे उघड आहे। माणसातील संयम, शौर्य इत्यादी सद्गुणांचा परिपोष करणाऱ्या कलांचा त्याने पुरस्कार केलेला आहे, याचे पुरावे रिपिब्लकमध्ये दिसतात।42 पण कलावंत इष्ट प्रकारचे काव्य निर्माण करायला फारसे राजी नसतात हेही त्याने सूचित केले आहे हे आपण वर पाहिले। काव्य लोकप्रिय व्हायचे असेल तर असंयमी माणसांचेच चित्रण करावे लागते हे कवींनी ओळखलेले असते आणि म्हणून प्लेटो ज्याला चांगले म्हणतो असे काव्य रचायला ते आपखुषीने तयार होतील असे त्याला वाटत नाही। ज्यांचा समूळ नायनाट करायला हवा अशा दुःख, अनुकंपा, राग, लालसा, इत्यादी भावनांना कवी खतपाणी देतो,43 म्हणून कवींची आपल्या आदशर् राज्यातून हकालपट्टी करण्याचा निर्णय प्लेटोला घ्यावा लागला। हा निर्णय त्याने मोठया आfनच्छेने घेतला, कारण प्लेटोला काव्यात पुष्कळ रस होता। परंतु काव्य सुंदर व सुखद आहे म्हणून त्याला आदशर् राज्यात स्थान दिलेच पाहिजे असे नाही। काव्य हितकारक असेल तरच त्याला आदशर् राज्यात स्थान मिळेल, एरव्ही नाही, अशी त्याची भूमिका होती। होमरच्या चाहत्यांना प्लेटोने असे आव्हान दिले आहे की काव्य हे खरोखर हितकारक असते असे त्यांनी सप्रमाण सिद्ध करावे। जर तसे सिद्ध करता आले नाही, विंढवा काव्य आfहतकारक असते असे सिद्ध झाले, तर होमरसारख्यांची हकालपट्टी करावी लागेल असे तो बजावतो। कवींना केवळ ते कवी आहेत म्हणून त्याच्या आदशर् राज्यात मज्जाव आहे असा याचा अर्थ नव्हे। त्यांनी देवांच्या व थोर पुरूषांच्या सद्गुणांचे आपल्या काव्यात स्तवन केले तर आदशर् राज्यात त्यांचे स्वागत करायला प्लेटो नेहमीच तयार आहे। पण त्याचबरोबर हेही खरे की त्यांनी समाजविघातक असे काही केले तर ते कधी आहेत म्हणून त्यांची गय केली जाणार नाही।44 प्लेटोने नेतिक निकष वापरून अनेक चांगल्या कलाकृतींना व त्यांच्या निर्मात्यांना हद्दपार केले ही गोष्ट कलाप्रेमी लोकांना आवडली नाही। त्याने जणू सर्वच कलांना बंदी केली आहे अशा समजुतीने कलाप्रेमी लोकांनी कलेवरच्या त्याच्या आक्षेपांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला। त्यांपेकी काहींनी असे दाखविण्याचा प्रयत्न केला की कला सद्गुणांचा प्रत्यक्ष परिपोष करतात। या संदर्भात रनेसन्सच्या काळातील प्रसिद्ध इंग्रजी टीकाकार सर पिढलिप सिड्नीने काव्याचा जो बचाव केला त्याचा निर्देश करणे आवश्यक आहे। सिड्नीच्या मते आत्मोन्नती हे सर्व ज्ञानाचे ध्येय आहे। काव्याचेही ध्येय तेच आहे। हे ध्येय गाठण्यासाठी जे मार्ग उपलब्ध आहेत त्यांपेकी काव्याचा मार्ग सर्वश्रेष्ठ आहे। इतिहासकार व तत्त्वज्ञ यांच्याशी कवीची तुलना केल्यास हा मुद्दा स्पष्ट होईल। तत्त्वज्ञ अमूर्त शब्दांत नीतिपाठ होतो; इतिहासकार विविध ऐतिहासिक घटनांची व व्यक्तींची उदाहरणे देतो। पण अमूर्त नीतिपाठ व उदाहरणे यांना एकत्र आणणे दोघांनाही जमत नाही। आणि त्यामुळे नेतिक शिक्षणाच्या कार्यात दोघेही कमी पडतात। तत्त्वज्ञानाचा नीतिपाठ इतका अमूर्त असतो की तो ज्याला समजला व आपल्या जीवनात आचरता आला तो माणूस धन्य म्हणायला हवा। इतिहासकार जी उदाहरणे देतो त्यावरून जग कसे आहे हे कळते, पण ते कसे असावे हे मात्र कळू शकत नाही। कवी या दोघांपेक्षा श्रेष्ठ आहे, कारण तो अमूर्त संकल्पना व विशिष्ट उदाहरणे यांची सांगड घालतो। तत्त्वज्ञ जे शिकवितो ते लोकांना कळत नाही, पण तेच नितितत्त्व कवीने सांगितले तर ते सर्वांना कळते। इतिहासकाराने दिलेल्या उदाहरणांपेक्षा कवीने दिलेली उदाहरणे जास्त परिणामकारक ठरतात। कारण एक तर त्याच्याजवळ खऱ्या व त्याबरोबरच काल्पनिक उदाहरणांचा मोठा साठा असतो। आणि दुसरे असे की सद्गुणांचा विजय झाल्याचे व दुर्गुणांचा पराजय झाल्याचे तो दाखवू शकतो।45 जेव्हा विशिष्ट नेतिक, धार्मिक व राजकीय तत्त्वांचा प्रचार करायचा असतो तेव्हा लेखक सिड्नीने सांगितलेल्या मार्गाचाच अवलंब करतात यात काहीच संशय नाही। कवींनी जे करायला पाहिजे असे प्लेटो म्हणतो ते जर त्यांनी केले तर काय होईल हेच जणू सिड्नी आपल्याला सांगत आहे। पण सिड्नीचा सिद्धान्त केवळ प्रचारकी वाङ्मय व बोधकथा यांनाच लागू पडतो। इतर वाङ्मयामुळे जे परिणाम होतात त्याबद्दल तो सिद्धान्त काहीच सांगत नाही। आणि बहुतेक चांगले वाङ्मय प्रचारकी नसल्यामुळे त्याचा बचाव सिड्नीच्या ढालीने होऊ शकेल असे वाटत नाही। या प्रकरणाच्या सुरूवातीला आपण प्लेटो व टाॅल्स्टाॅय यांच्यात एक महत्त्वाचा फरक केला होता। टाॅल्स्टाॅयच्या मते कला ही कला म्हणून चांगली ठरायची असेल तर तिच्यात भावनासंक्रमणक्षमता असायला हवी आणि तिच्या द्वारे संक्रमित होणाऱ्या भावना नीतिपोषक असायला हव्यात। म्हणजे टाॅल्स्टाॅय नीति-संकल्पनेला कलेच्या चांगलेपणाचा निकष बनवितो। याउलट, प्लेटो कलेला कला म्हणून ओळखण्यासाठी नीतीचा निकष वापरीत नाही। पण समग्र जीवनाचा विचार करताना कलामूल्य व नीतिमूल्य यांच्यात संघर्ष आला तर कलामूल्यापेक्षा नीतिमूल्य जास्त महत्त्वाचे आहे असे तो म्हणतो। सिड्नीच्या मते कलामूल्य व नीतिमूल्य यांच्यात संघर्ष येण्याचे कारण नाही। कारण कलेकडून आपल्याला ज्या नेतिक अपेक्षा असतात त्या ती पुऱ्या करते। प्लेटो, टाॅल्स्टाॅय व सिड्नी यांच्या भूमिकांमध्ये वर दाखविलेला भेद आहे हे खरे। पण यापेक्षा जास्त महत्त्वाची गोष्ट अशी की त्यांच्यात एका बाबतीत विलक्षण साम्य आहे। ते तिघेही उघडउघड नीतिवादी आहेत। आणि त्यांचा नीतिवाद सर्वसामान्य माणसालाही कळेल असा आहे। कला व नीती यांच्या संबंधाबद्दल ज्या कल्पना सामान्यांच्याही मनात असतात त्याच कल्पनांबद्दल ते बोलतात। नीतीवर कलेचा जो प्रत्यक्ष परिणाम होतो तोच त्यांना आfभप्रेत आहे। त्यांच्या मते कलेने नीतिमूल्यांचा प्रत्यक्षपणे पुरस्कार करावा, मानवी सद्गुणांचे संवर्धन करावे, निदान नीतीचा ऱ्हास होईल असे काहीही करू नये। प्रत्यक्ष नीतिवादाचा इतवमया स्पष्टपणे व समर्थपणे पुरस्कार करणारे टीकाकार आज फार कमी आहेत। पण कलासिद्धान्ताला नीतिवादाची किनार असणे ही जणू गेल्या दोन हजार वषाआतील पाश्चात्त्य कलाविचारात एक अटळ बाब झालेली आहे। शिक्षण व आनंद ही कलाप्रयespानांची जोडी अनेक नव्याजुन्या ग्रंथांत दिसते। वाचकाच्या मनात नीतिमूल्ये कशी बिंबवायची याबद्दल मतभेद असतील। काही लोकांच्या मते कलेने नीतिमूल्यांचा प्रत्यक्ष प्रचार केला पाहिजे, त्यांची प्रत्यक्ष जोपासना केली पाहिजे। पण हा झाला साधनांच्या तपशिलाचा प्रया>। सौंदर्यमूल्य स्वायत्त असते हा सिद्धान्त कांटने मांडला त्याला पावणेदोनशे वर्षें होऊन गेली; पण नीतिवादाचा जोर आजही कमी झालेला नाही। शिवाय नीतिवादाचा उच्चार न करणारे, विंढबहुना तात्तविक पातळीवर त्याला विरोध करणारे, पुष्कळ टीकाकार कलेच्या आशयाविषयी जे बोलतात ते पाहिले तर त्यांच्या रक्तातच नीतिवाद भिनलेला आहे असे दिसेल। आपण सुरूवातीलाच नेतिक या शब्दाची अर्थकक्षा पुष्कळ विस्तृत केली होती। या व्यापक केलेल्या अर्थाने नेतिक हा शब्द वापरायचा आहे हे लक्षात आल्याबरोबर वरील विधानाची सत्यता पटेल। कलाकृतीच्या आशयाविषयी बोलताना आपण किती सहजपणे जीवनमूल्ये, जीवनदृष्टी, श्रद्धा, निष्ठा इत्यादी संकल्पनांचा वापर करतो हे या संदर्भात ध्यानात ठेवले पाहिजे।

9।5
नीतिवादी दृष्टिकोणाचा पुरस्कार करणाऱ्यांपेकी एका गटाचा आपण विचार केला। आता आपल्याला दुसऱ्या एका गटाचा विचार करायचा आहे। या गटातील लोकांचे वेशिष्टय असे की कला प्रत्यक्षपणे नीतीचा पुरस्कार करते, विंढवा तिने तसा पुरस्कार करावा, असे ते म्हणत नाहीत। कलेने आपले स्वतःचे वेशिष्टयपूर्ण कार्य जरूर करीत राहावे। हे कार्य करीत असताना कला आस्वादकावर जे परिणाम घडविते ते अप्रत्यक्षपणे नीतीला पोषक असेच असतात, असे या लोकांचे म्हणणे आहे। या गटातही दोन वेगवेगळया भूमिका बघायला मिळतात। पहिली भूमिका अशी की कलामूल्य व नीतिमूल्य ही वेगळी असली तरी कला नीतीला पोषकच असते। दूसरी भूमिका अशी की नीतीच्या दृष्टीने सर्वांत श्रेयस्कर असा जो अनुभव असतो त्यात व कलानुभवात तत्त्वतः फरकच नाही। नीतिमान, उत्तम, पुरूषार्थनिष्ठ असे जीवन जगायचे असेल तर कलानुभवाच्या मार्गानेच गेले पाहिजे। एका अर्थाने ही भूमिका टाॅल्स्टाॅयच्या भूमिकेच्या अगदी विरूद्ध आहे। टाॅल्स्टाॅयच्या मते कला ही कला म्हणून चांगली ठरायची असेल तर ती नीतिपोषक असायला हवी। आपण ज्या दृष्टिकोणाची र्चा करणार आहोत त्यानुसार जीवन श्रेयस्कर व्हायचे असेल तर ते कलामय झाले पाहिजे। पण असे असले तरी दुसऱ्या एका अर्थाने या दोन भूमिकांमध्ये काही महत्त्वाच्या बाबतींत साम्य आहे आणि त्या एकमेकींना पूरक आहेत। या भूमिकांनुसार कला व माणसाचे एकूण जीवन यांच्यात फार जवळचा संबंध आहे। कलाव्यवहाराची पातळी अलौकिक असते या सिद्धान्ताला दोन्हींचा विरोध आहे। कलामूल्य व नीतिमूल्य ही वेगळी असली तरी कला नीतीला पोषकच असते या दृष्टिकोणाचा पुरस्कर्ता म्हणून अॅरिस्टाॅटलचे स्थान महत्त्वाचे आहे। त्याच्या कॅथार्सिसच्या सिद्धान्ताची चर्चा आपण आता करणार आहोत। पण तत्पूर्वी एका गोष्टीचा उल्लेख करणे जरूर आहे। प्लेटो व अॅरिस्टाॅटल यांनी कलेविषयी विचारलेले प्रया> बव्हंशी सारखे आहेत। आणि या प्रया>ांना त्यांनी दिलेली उत्तरे सारखी नसली तरी एका जातीची आहेत। प्लेटोने विचारलेले प्रया> असे ः कला आस्वादकाला ज्ञान देते का? ती शौर्य, संयम, इत्यादी सद्गुणांचा परिपोष करते का? कलेमुळे माणसाच्या व्यक्तिमत्त्वावर वाईट परिणाम होतो का? या प्रया>ांना अॅरिस्टाॅटने दिलेली उत्तरे प्लेटोच्या उत्तरांपेक्षा भिन्न आहेत हे खरे। पहिल्या दोन प्रया>ांना प्लेटोने दिलेली उत्तरे बव्हंशी नकारार्थी आहेत आणि तिसऱ्या प्रया>ाला दिलेले उत्तर बव्हंशी होकारार्थी आहे। अॅरिस्टाॅटल पहिल्या प्रया>ाला निश्चित होकारार्थी उत्तर देतो। दुसऱ्या प्रया>ाचेही त्याचे उत्तर होकारार्थी आहे असे समजण्यास आधार आहे। तिसऱ्या प्रया>ाला त्याने दिलेले उत्तर मात्र नकारार्थी आहे असे म्हणता येईल। यावरून प्लेटो व अॅरिस्टाॅटल यांच्या उत्तरांतील भिन्नता लक्षात येईल। हेच प्रया> कांट विंढवा विश्वचेतन्यवादी यांना विचारले तर हे प्रया> पूर्णपणे अप्रस्तुत आहेत। असे ते म्हणतील। अॅरिस्टाॅटल मात्र ही भूमिका घेत नाही। तो प्लेटोचे प्रया> प्रस्तुत आहेत असे मानूनच त्यांची उत्तरे देतो (कलेच्या संदर्भात तिच्या प्रत्यक्ष नेतिक परिणामांची चर्चा अप्रस्तुत आहे असे अॅरिस्टाॅटलचेही मत असल्याचे बुचर सांगतो। हे जर खरे असेल तर कांट-हेगेल यांच्या मताचा पूर्वाच्चार अॅरिस्टाॅटलमध्ये सापडतो असे म्हणावे लागेल। बुचरच्या या मताची चर्चा नंतर येणार आहे।) पुष्कळ वेळा नवे प्रया> विचारल्याने कलाजाणिवेच्या इतिहासाला नवे वळण लागते। ते प्रया> किती फलदायी आहेत यावर सर्व अवलंबून असते। प्लेटोने विचारलेले प्रया> प्रस्तुत ठरतात असे अनेक आस्वादकांचे व विचारवंतांचे मत आहे। या दृष्टीने बघता टीकापरंपरेतील पहिला युगकर्ता सौंदर्यशास्त्रज्ञ अॅरिस्टाॅटल नसून प्लेटो होता असे म्हणावे लागते। प्लेटोने कलांना नेतिकतेचा निकष लावला आणि त्या निकषाला न उतरणाऱ्या अनेक मोठया कलाकृतींवर जोराचा हल्ला चढविला, तर त्याच्या शिष्याने कलांना जीवनात महत्त्वाचे स्थान दिले। हे करीत असताना त्याला कलेच्या परिणामांची पूर्ण जाणीव होती हे निश्चित। कलेच्या परिणामांविषयी त्याच्यात व प्लेटोत एकवावमयता असती तर त्यानेही कलेवर हल्ला चढविला असता। प्लेटोच्या विरूद्ध जाऊन कलेचे- विशेषतः काव्याचे-समर्थन करताना प्लेटोने घेतलेल्या आक्षेपांचे खंडण करणे त्याला जरूर वाटले असणार। अनुकृती या संज्ञेला नवा अर्थ देऊन प्लेटोच्या ज्ञानशास्त्रीय आक्षेपांना त्याने उत्तर दिले। नीतिशास्त्रीय आक्षेपांना उत्तर देण्यासाठीच त्याने कॅथार्सिसचा सिद्धान्त मांडला असावा। कॅथार्सिसच्या सिद्धान्ताला नीतिशास्त्रीय पाश्वर्भूमी आहे हे निश्चित। पण शोकात्म नाटय इच्छाशवमतीला प्रत्यक्षपणे आवाहन करते, त्यामुळे विशिष्ट सद्गुण बलवान होतात आणि विशिष्ट दुर्गुणांचे निमूर्लन होते असा प्रत्यक्ष नीतिवादी सिद्धान्त काही त्याने स्पष्टपणे मांडलेला दिसत नाही। कॅथार्सिस या संज्ञेचा नवमकी अर्थ काय? भावनांचे विरेचन की विशुद्धीकरण? अॅरिस्टाॅटलला नवमकी कोणती प्रक्रिया आfभप्रेत होती?-याविषयी बराच वाद झालेला आहे आणि बरीच वेगवेगळी मते मांडली गेली आहेत। त्यांपेकी दोन प्रमुख मतांचा आपण थोडवमयात विचार करू। ही मते काही वेळा एकमेकांत अशी काही गुंतलेली सापडतात की त्यांचा अलगपणे विचार करणे कठीण आहे। (अ) प्रत्यक्ष नेतिकतावादी मत विंढवा विशुद्धीकरणवादी मत ः या मताचा पाठपुरवठा करणारे विचारवंत कॅथार्सिसचा संबंध बहुधा विशुद्धीकरणाच्या प्रक्रियेशी जोडतात। लेसिंग या प्रसिद्ध टीकाकाराच्या मते कॅथार्सिसमुळे भीती व अनुकंपा या भावनांचे रूपांतर सद्गुणी स्थिरप्रवृत्तींमध्ये होते। सद्गुण हे आfतरेक व उणीव यांना टाळून गाठलेल्या सुवर्णमध्यासारखे असतात। शोकाित्मकेमुळे आपल्या उपरिनिर्दिष्ट भावनांमधील आfतरेक व उणीव हे दोन्ही दोष काढले जाऊन सुवर्णमध्य साधला जातो।46 याबद्दल प्रा0 गो0 वि0 करंदीकर लिहितात ः राज्यशास्त्राच्या पांचव्या प्रकरणावरूनच हा अर्थ स्पष्ट होऊं शकतो। त्यांतील एक उतारा संगीताच्या एका विशिष्ट प्रकाराची सामाजिक उपयुक्तता स्पष्ट करणारा आहे। धार्मिक उन्मादानें पछाडलेल्या माणसावर भावनाप्रक्षोभक संगीताचा प्रयोग केल्यानें त्याच्या प्रक्षुब्ध भाववृत्तीला वाट फुटून त्याला पुन्हां आनंदमय अशा शांत मनःस्थितीचा लाभ होतो, असें प्रतिपादन अॅरिस्टाॅटलनें त्या उताऱ्यांत केलेलें आहे आणि या प्रतिक्रियेचा उल्लेख त्यानें कॅथार्सिस या शब्दानेंच केलेला आहे।।।भावनाप्रक्षोभक संगीतामुळें घडणारें कॅथार्सिस व शोकािन्तकेमुळें घडणारें कॅथार्सिस ही दोन्हीं एकाच जातीचीं आहेत हें यावरून सहज स्पष्ट होतें।।।कॅथार्सिसनें सूचित होणारा भावनात्मक परिणाम हा जीवनामध्ये करूणा व भीती यांनी भावनाविवश होणाऱ्या प्रेक्षकांपुरताच मर्यादित असला पाहिजे। ज्या प्रमाणांत धार्मिक प्रक्षोभापेक्षां करूणा व भीती या भावनांचे प्रक्षोभ आfधक सामान्य आहेत त्या प्रमाणांत शोकांतिकेनें घडणारे कॅथार्सिस हें आfधक सार्वत्रिक असतें। शिवाय राज्यशास्त्रांतील शिवकल्पनेचें विवेचन सुसंवादी आहे। निकाॅमेकिअन नीतिशास्त्राच्या दुसऱ्या विभागांतील सहावें प्रकरण त्या दृष्टीनें फार उद्बोधक ठरतें। त्या ठिकाणीं व्यक्त झालेली अॅरिस्टाॅटलप्रणीत सद्गुणीपणाची (virूल) कल्पना ही सुवर्णमध्याच्या सिद्धान्तावर आधारलेली आहे। कांहीं गोष्टींच्या तीन अवस्था किल्पतां येतात ः आfतरेक, सुवर्णमध्य आणि उणीव। सद्गुणी मनुष्य हा भीती, करूणा, क्रोध, आत्मविश्वास, वगेरे भावनांचा विंढवा सुखदुःखांचा आfतरेक आणि उणीव टाळीत असतो। सुवर्णमध्य साधणें याचा अर्थ योग्य वेळीं, योग्य वस्तूंच्या संदर्भांत, योग्य व्यक्तींकरतां, योग्य हेतूनें आणि योग्य पद्धतीनुसार या भावनांचा प्रत्यय घेणें।।।भीती आणि करूणा या दोन्ही भावनांचे आfतरेक टाळण्याच्या प्रत्रिढयेला शोकािन्तकेच्या संदर्भांत, कॅथार्सिस म्हटलेलें असावें। कॅथार्सिस म्हणजे भावनांचें सुवर्णमध्यीकरण। राज्यशास्त्रांतील उताऱ्यावरून निष्पन्न होणारा उपशमात्मक (rात्गf) अर्थ व नीतिशास्त्रांतील उताऱ्यावरून सूचित होणारा सूवर्णमध्यात्मक (सaह) अर्थ हे दोन्ही परस्परपोषक असून शोकािन्तकेच्या नेतिक फलश्रुतीकडे बोट दाखवणारे आहेत।।।भावनातिरेकाच्या उपशमानें विंढवा सुवर्णमध्य साधण्यानें आfस्तत्वांत येणारें नेतिक जीवन हीच शोकािन्तकेची सामाजिक उपयुक्तता होय।।।मुख्यतः शोकािन्तकेचें सामाजिक स्थान सिद्ध करण्यासाठींच कॅथार्सिसची नेतिक उपपत्ति मांडलेली असावी। प्लेटोच्या शोकािन्तकेवरील हल्ल्याला कॅथार्सिस हे अॅरिस्टाॅटलनें दिलेलें उत्तर आहे। प्रा0 करंदीकरांनी वेगवेगळया सिद्धान्तांचा समन्वय साधून अॅरिस्टाॅटलची उपपत्ती नेतिक आहे हे दाखविले आहे। नेतिकतेवर त्यांनी दिलेला भर लेसिंगची आठवण करून देतो उपशमाचा (rात्गf) सिद्धान्त बर्नेस, बोझंकिट प्रभृतींनी मांडलेला आहे।48 त्याचप्रमाणे प्रा0 करंदीकरांनी उद्धृत केलेले योग्य वेळीं, योग्य वस्तूंच्या संदर्भात, योग्य व्यक्तींकरितां इत्यादी शब्द हंफ्री हाउसची आठवण करून देतात। हंफ्री हाउसने अॅरिस्टाॅटलच्या या शब्दांना विशेष महत्त्व दिले आहे आणि त्यांना वळण लावते।49 अशा रीतीने प्रा0 करंदीकरांनी वेगवेगळया सिद्धान्तांचे संयलेषण करून अॅरिस्टाॅटलची भूमिका नेतिक आहे असा निर्वाळा दिला आहे। (आ) अप्रत्यक्ष नेतिकवादी मत विंढवा विरेचनवादी मत ः बुचरने असे मत मांडले आहे की पोएटिवमस मध्ये अॅरिस्टाॅटलची भूमिका प्रत्यक्षपणे नेतिकतावादी नाही। काव्याचा, व इतर सर्व कलांचा, उद्देश एक विशुद्ध व उच्च दर्जाचे सुख मिळवून देणे हा असतो इतकेच तो सांगतो। पोएटिवमस लिहिताना अॅरिस्टाॅटलचा दृष्टिकोण केवळ वाङ्मयीन समीक्षकाचा होता। काव्याचे शिक्षणक्रमात स्थान कोणते याविषयीचा विचार त्याला येथे प्रस्तुत नव्हता। म्हणूनच वेगवेगळया काव्यप्रकारांचे प्रेक्षकांवर विंढवा वाचकांवर कोणते प्रत्यक्ष नेतिक परिणाम घडतात याबद्दल अॅरिस्टाॅटल काहीही सांगत नाही। शोकाित्मकेची व्याख्या करताना विंढवा नंतर विवेचनात अॅरिस्टाॅटलने असे कोठेही म्हटलेले नाही की प्रेक्षकाच्या जीवनाला नेतिक वळण लावणे हे शोकाित्मकेचे उद्िष्ट असते। नाटयगृह व विद्यालय या वेगळया गोष्टी आहेत असेच तो मानतो।50 याचा अर्थ असा नव्हे की कलेविषयी विचार करताना तो नेतिकतेबद्दल पूर्णपणे उदासीन आहे। कला आनंद देते असे तो म्हणतो हे खरे। परंतु या आनंदाविषयी त्याच्या मनात विशिष्ट नेतिक अपेक्षा आहेत। हा आनंद निकोप असायला हवा असे तो मानतो। ज्या नाटयकृतींत कनिष्ठ दर्जाच्या आदशाआचे चित्रण केलेले असते त्यांच्यापासून त्याला आfभप्रेत असलेला निकोप आनंद प्राप्त होणे शवमय नाही।51 शोकाित्मकेतील पात्रांविषयी लिहिताना नेतिकतेबद्दलचे विचार त्याच्या मनात निश्चित असले पाहिजेत।52 पण तरीही कलास्वरूपाबद्दलच्या विचाराचा व नीतिविचाराचा प्रत्यक्ष संबंध तोडणारा अॅरिस्टाॅटल हा पहिला विचारवंत आहे असे बुचरचे मत आहे।53 बुचर आपल्या विवेचनाची सुरूवात बर्नेसच्या उपपत्तीपासून करतो। बर्नेसच्या मते शोकाित्मकेमुळे भीती व अनुकंपा यांची जागृती होते आणि त्यामुळे आपल्या मनात नित्य वास करणाऱ्या या भावनांचा उपशम होतो, त्यांचे विरेचन होऊन एक सुखरूप अनुभव प्राप्त होतो। या भावनांचे विरेचन होते याचा अर्थ असा नव्हे की आपली हृदये रिती होतात। बुचरच्या मते या भावनांमधील दुःखद घटक तेवढा बाहेर फेकला जातो।54 अॅरिस्टाॅटलने आपल्या रेटरिक या ग्रंथामध्ये भीती व अनुकंपा या दोन्ही भावनांना दुःखरूप मानले आहे। या दोन भावनांमध्ये भीती ही जास्त मूलभूत भावना आहे। आत्मलक्ष्यी प्रेरणेवर आधारलेली ती एक भावना आहे; हीच गोष्ट अप्रत्यक्षपणे अनुकंपेविषयीही खरी आहे।55 यावरून असे दिसते की अॅरिस्टाॅटलला आfभप्रेत असलेली अनुकंपा म्हणजे निःस्वार्थ दयाबुद्धी नव्हे। नाटयगृहात जेव्हा आपल्यामध्ये भीती व अनुकंपा यांचा उदय होतो तेव्हा या भावनांत एक बदल झालेला जाणवतो। खरे म्हणजे हा फरक अनुकंपेच्या बाबतीत जाणवत नसून फक्त भीतीच्या बाबतीत जाणवतो। नाटयप्रयोग पाहताना जी भीती आपल्या अनुभवाला येते ती आपल्या स्वतःवर कोसळलेल्या खऱ्याखुऱ्या संकटामुळे निर्माण झालेली नसते; काल्पनिक पात्रांवर संकटे आल्यामुळे त्यांना जी भीती वाटते तीच सहानुभावाने आपल्यालाही वाटते। आपल्यात व या पात्रांत साम्य असल्यामुळेच सहानुभाव शवमय होतो।56 बुचरच्या मते शोकाित्मकेच्या नायकाच्या व्यक्तित्वात प्रेक्षकाचे व्यक्तित्व तात्पुरते विलीन होते; त्याच्या जीवनाशी तादात्म्य पावल्यामुळे, त्याच्यावर आलेली संकटे जणू आपल्यावरच आलेली संकटे जणू आपल्यावरच आलेली संकटे आहेत असे प्रेक्षकाला वाटते। सर्व मानवजातीचेच दुःख व भवितव्य आपण पाहत आहोत असे वाटू लागते। भावनेची व्यक्तिनिबद्धता गळून पडते। नाटयकृती म्हणजे सर्व मानवी जीवनाचे चित्र आहे असे प्रेक्षक समजतो। या पातळीवरून त्याला मानवापुढचे प्रचंड प्रया> दिसू लागतात; आणि शोकाित्मकेचा नायक दुःखी होण्यात एक प्रकारची नेतिक अपरिहार्यता आहे असेही जाणवते। या विराट दशर्नामुळे आदरयुक्त भीती (aेा) निर्माण होते। या अनुभवात भीती व अनुकंपा यांचे मिलन झालेले असते। त्यांच्यातली व्यक्तिनिबद्धता गळून गेल्यामुळे त्यांच्यात नेहमी असणारा दुःखद घटकही नाहीसा होतो।57 अशा रीतीने भावनांचे विरेचन होते। आपल्या नेहमीच्या जीवनातील भावना व्यक्तिनिबद्ध व आत्मलक्ष्यी असतात। आणि नेतिक आचरणात त्यांची ही व्यक्तिनिबद्धता अडथळा निर्माण करते। जिच्यातून व्यक्तिनिबद्धता गळून गेली आहे अशा भावनेचा अनुभव शोकात्म नाटयामुळे मिळतो। अशा रीतीने शोकात्म नाटय नेतिकतेच्या मार्गातील व्यक्तिनिबद्धतेचा अडथळा दूर करते। शोकात्म नाटयाचा नेतिकतेशी असलेला संबंध असा अप्रत्यक्ष आहे।58 बुचरचे विवेचन वाचले की आfभनवगुप्ताची आठवण होणे, अगदी स्वाभाविक आहे। दोघांनी साधारणीकरण व आत्मानुप्रवेश या संकल्पनांवर भर दिलेला आहे। व्यक्तिनिबद्धता गळून पडल्यावर आपल्याला येणारा साधारणीकृत अनुभव आनंद रूप असता असे दोघांनीही म्हटले आहे। हे साम्य विलक्षणच म्हणायला हवे। आपण वर कॅथार्सिसबद्दलच्या दोन मतांची चर्चा केली। त्यांतील महत्त्वाचा फरक हा की विशुद्धकरण वाद्यांच्या मते शोकाित्मकेचा आपल्यावर प्रत्यक्ष नेतिक परिणाम होतो; तर विरेचन वाद्यांच्या मते हा परिणाम अप्रत्यक्ष असतो। या दोन मतांपेकी कोणते जास्त बरोबर आहे याची चर्चा येथे करण्याची जरूरी नाही। पण अॅरिस्टाॅटल प्लेटोला उत्तर देता येतो हे लक्षात घेतले आणि त्या काळातला एकूण सौंदर्यशास्त्रीय विचार बघितला की अॅरिस्टाॅटलला विशुद्धीकरणवादी मत स्पष्टपणे (ाxज्त्ग्म्ग्ूत्ब्) मांडलेले नाही। एखादी भूमिका नीतिवादी ठरण्यासाठी तीत इच्छाशक्तीला प्रत्यक्ष आवाहन केलेले असले पाहिजे हे बुचरचे मत मान्य केल्यास, अॅरिस्टाॅटलची भूमिका अप्रत्यक्ष नीतिवादी ठरते। आता प्रया> असा की सर्व शोकात्म वाङ्मयाचा प्रत्यक्ष विंढवा अप्रत्यक्ष असा नेतिक परिणाम होतो का? असा परिणाम होत असलाच तर तो पुष्कळ सूक्ष्म असणार। विशिष्ट नीतितत्त्वे मनावर बिंबविण्यासाठी जे वाङ्मय निर्माण होते त्याच्या परिणामासारखा हा परिणाम ढोबळ नसणार। भीती व अनुकंपा यांची जागृती करणाऱ्या प्रत्येक शोकाित्मकेमुळे भावनांची सुवर्णमध्यावस्था निर्माण होते हे म्हणणे पटण्यासारखे नाही। कारण निदान काही शोकाित्मकांमुळे फक्त भावविव्हलताच निर्माण होते। याचा अर्थ असा की नुसत्या भावजागृतीला महत्त्व नसून ती कशामुळे होते याला फार महत्त्व असते। श्रेष्ठ शोकात्म नाटयात असे काहीतरी असले पाहिजे की ज्यामुळे सुवर्णमध्यावस्था निर्माण होते। बुचरच्या सिद्धान्ताबद्दलही असेच म्हणावे लागेल। गेल्या प्रकरणात आपण असे पाहिले की साधारणीकरणाची प्रत्रिढया सर्व मानवी व्यवहाराचाच पाया आहे। तेव्हा शोकाित्मकेचा विशिष्ट परिणाम कसा निर्माण होतो याचे उत्तर नुसत्या साधारणीकरणात मिळणार नाही। याची जाणीव असल्यामुळेच की काय बुचरने आणखी एका गोष्टीचा निर्देश केला आहे। शोकाित्मकेत दुःखाचे नुसते दशर्न घडत नाही, त्यामागील नेतिक अपरिहार्यतेची जाणीवही त्याचबरोबर होते, असे तो सुचवितो। या दुःखाची जात व कक्षा अशी असते की त्यामुळे विश्वाची रचना अशी का, ती अशी असण्यामागे ईश्वराचा हेतू काय, हे प्रया> आपल्यापुढे उभे राहतात। यातून एक नवीन जीवनदृष्टी मिळते।59 अशी जीवनदृष्टी आली की भावनांची नुसती जागृती होत नसून त्यांची सुव्यवस्थाही लागते। या दृष्टीलाच जीवनाचे तत्त्वज्ञान असेही म्हणता येईल। या तत्त्वज्ञानाचा आपल्या आचारविचारांवर परिणाम होतो। अर्थात प्रत्येक शोकाित्मकेमुळे अशी जीवनदृष्टी प्राप्त होईल असे नाही। पण प्रत्येक चांगल्या व श्रेष्ठ शोकाित्मकेमुळे ती प्राप्त होते असे म्हणता येईल। यावरून असा निष्कर्ष निघतो की श्रेष्ठ कलाकृतींकडून आपल्याला समृद्ध भावनानुभव मिळतो इतकेच नव्हे तर भावना व प्रेरणा यांच्या सुव्यवस्थापनेचा एक मार्गही मिळतो। आता प्रया> असा की, या व्यवस्थापनेचा व नीतिमूल्याचा संबंध काय? असे व्यवस्थापन निर्माण होणे आणि बरे सत्य बोला । यथातथ्य चाला अशा प्रकारचे नीतिवचन यांचा परस्परसंबंध काय? असे व्यवस्थापन होणे आणि आपली इच्छाशवमती उचित दिशेने कार्यािन्वत होणे या गोष्टी एकच आहेत काय? या प्रया>ांना दोन उत्तरे संभवतात। जर नीतिजीवन व नीतिसंकल्पना यांचा संकुचित अर्थ घेतला तर भावनाप्रेरणांचे व्यवस्थापन होणे व नीतिमान होणे या गोष्टी वेगळया ठरतात। मग आपल्याला इतकेच म्हणता येईल की भावना-प्रेरणांचे व्यवस्थापन झाल्यामुळे नीतिमान होण्यास अप्रत्यक्षपणे मदत होते। बेबंद सुटलेल्या भावना व प्रेरणा नीतिप्रवण झालेल्या इच्छाशवमतीच्या नेहमी आड येतात; म्हणून त्यांच्यात जर व्यवस्थापन झाले तर नीतीला मदतच होईल। दुसरे उत्तर असे की नीतीचा जास्त व्यापक अर्थ घेतल्यास भावनाप्रेरणांचे व्यवस्थापन हे एक नीतिमूल्यच ठरते; इतकेच नव्हे तर काहींच्या मते ते सर्वाच्च मूल्य ठरते। आपल्या नीतिवचनांचा उद्देश सुव्यवस्थापित जीवन निर्माण करणे हाच असतो। तेव्हा हा उद्देश साध्य करण्याचा कोणताही मार्ग हा नीतीचाच मार्ग म्हटला पाहिजे। या दृष्टीने पाहता जीवनातील सुव्यवस्थापित समृद्धी हे परमोच्च ऐहिक नीतिमूल्य ठरते आणि हे मूल्य गाठण्याचा कला हा एक मार्ग ठरतो। नीतिसंकल्पनेचा असा व्यापक अर्थ घेऊन नीती व कला यांचा संबंध दाखविणाऱ्या काही सिद्धान्तांचा आता आपल्याला विचार करायचा आहे।

9।6
या संदर्भात रिचर्ड्सचा सिद्धान्त फार महत्त्वाचा ठरतो। रिचर्ड्स हा पूर्णपणे जीवनवादी सौंदर्यशास्त्रज्ञ आहे। कलेसाठी कला या विश्वचेतन्यवादी मताचे जोरदार खंडन करूनच तो आपला मूल्यविचार मांडतो।60 कलानुभव हा अनुभवाच्या इतर जातींपेक्षा वेगळया जातीचा अनुभव आहे असा दावा करणारे सौंदर्यशास्त्रज्ञ हा जातिभेद नवमकी कशात आहे याचे समाधानकारक स्पष्टीकरण देऊ शकत नाहीत, असे तो म्हणतो।61 त्याच्या मते कलानुभव हा जीवनातील इतर अनुभवांसारखाच असतो। हे अनुभव एकाच प्रकारच्या सामग्रीतून तयार झालेले असतात। त्या सामग्रीचे संघटनही एकाच प्रकारच्या तत्त्वानुसार होते। कलानुभव व लौकिक अनुभव यांच्यातील भेद जातीचा नसून संख्यात्मक आहे। दोन्ही अनुभवांतील सामग्री जरी सारखी असली तरी एका ठिकाणी सामग्रीचे दारिऱ्द्य असते, तर दुसऱ्या ठिकाणी सामग्री विपुलता व विविधता आढळते। एका ठिकाणी सामग्रीचे संघटन फारशा कौशल्याने केलेले नसते, तर दुसरीकडे कौशल्याची परमावधी झालेली आढळते। कलानुभव लौकिक अनुभवाच्याच जातीचा असतो, पण त्यापेक्षा तो जास्त समृद्ध, वेविध्यपूर्ण व जास्त कौशल्याने रचलेला असतो।62 कलानुभव अलौकिक नाही असे मानले की केवळ कलानुभवालाच लागू पडेल असा मूल्यनिकष शोधण्याची गरज उरत नाही। म्हणनूच रिचर्ड्सला केवळ सौंदर्यमूल्याचा निकष नको होता; कारण त्याच्या मते समीक्षकाचा एकूण जीवनमूल्याशी फारच जवळचा संबंध असतो। वेद्याला शारीरिक सुस्थितीची जितकी काळजी असते तितकी मानसिक सुस्थितीविषयीची काळजी समीक्षकाला असते। समीक्षकाने फक्त सौंदर्याविषयी विचार करणे म्हणजे आपले स्वतःचे कार्यक्षेत्र अकारण संकुचित करणे होय। आपल्या नेतिक व सामाजिक जीवनावर कलेचे जे दूरगामी परिणाम होतात ते रिचर्ड्सला महत्त्वाचे वाटत होते, आणि म्हणूनच तो एकूण मूल्याच्या निकषाचा शोध घेत होता।63 त्याच्या मते ज्याला काही लोक सौंदर्यमूल्य असे नाव देतात ते व नीतिमूल्य ही दोन्ही या एकूण मूल्यातच समावलेली आहेत। वर उल्लेखिलेल्या एकूण मूल्यसंकल्पनेच्या निकषाबाबत त्याच्या काही अपेक्षा आहेत। जीवनाच्या व कलेच्या प्रत्यक्ष संदर्भांत वापरता येईल असा तो निकष असायला हवा। म्हणजे त्याच्या वापराने जीवनातील अनुभव विंढवा विविध कलाकृती यांच्यात डावेउजवे ठरविता यायला हवे। दुसरी अपेक्षा अशी की हा निकष संख्यात्मक असायला हवा। कारण तो वापरून असे ठामपणे सांगता यायला हवे की अमुक कविता तमुक कवितेपेक्षा जास्त मूल्यवान आहे। मूल्यनिकषाविषयी रिचर्ड्सची आणखी एक अपेक्षा आहे। सुंदर वस्तूंमध्ये इतके वेविध्य असते की त्यांच्यात समान असा काही गुणविशेष विंढवा गुणसमूह सापडेल असे रिचर्ड्सला वाटत नाही। सुंदर वस्तूंमुळे जे अनुभव निर्माण होतात त्यांतच आपल्याला पाहिजे असलेला समान गुणविशेष शोधायला हवा, असे तो मानतो। म्हणून मूल्याचा निकष मनोवेज्ञानिक संकल्पनांच्याच भाषेत दिला पाहिजे असा त्याचा आग्रह असल्यास नवल नाही।64 असा निकष त्याला प्रेरणा-समाधानाच्या संकल्पनेत मिळाला। तो थोडवमयात असा मांडता येईल ः जिने प्रेरणेचे (ग्स्ज्ल्त्ेा) समाधान होते ती गोष्ट मूल्यवान असते।64 पंरतु माणसाच्या मनात अनेक प्रेरणा असतात आणि ज्या गोष्टीने एका प्रेरणेचे समाधान होते तिने इतर प्रेरणांचे समाधान होईलच असे नाही। एका प्रेरणेच्या समाधानाबरोबर इतर प्रेरणांचे असमाधान निर्माण होणेही शवमय आहे। मानवी प्रेरणांची विविधता व अनेकता लक्षात घेऊन रिचर्ड्सने आपल्या सिद्धान्तात पुढीलप्रमाणे बदल केला ः ज्या गोष्टीमुळे आपल्या प्रेरणेचे समाधान होते, पण त्याचबरोबर तिच्याइतवमया विंढवा तिच्यापेक्षा जास्त महत्त्वाच्या प्रेरणेचे असमाधान निर्माण होत नाही, ती गोष्ट मूल्यवान असते।66 प्रेरणा महत्त्वाची आहे हे कसे ओळखायचे? जी प्रेरणा असंतुष्ट राहिल्यास एकूण जीवन फार विस्कळित होते ती प्रेरणा महत्त्वाची होय।67 महत्त्वाची प्रेरणा म्हणजे प्रभावी प्रेरणा असे म्हणता येईल। माणसाच्या मनात अनेक प्रेरणा असतात ही गोष्ट ध्यानात ठेवल्यास रिचर्ड्सच्या मूल्यसिद्धान्तात आणखी एक बदल करणे आवश्यक ठरते। मूल्याविषयी बोलताना एका प्रेरणेच्या समाधानाचा विचार करून चालणार नाही; अनेक प्रेरणांचे समाधान हे जास्त महत्त्वाचे ठरते। म्हणून मूल्यवान गोष्टीविषयी पुढील विधान करणे आवश्यक आहे ः ज्या गोष्टीने जास्तीत जास्त व महत्त्वाच्या प्रेरणांचे समाधान होईल ती गोष्ट मूल्यवान असते। येथे एक मुद्दा लक्षात ठेवायला हवा। रिचर्ड्सच्या मते अनुभव मूल्ययुक्त असतात; ते अनुभव ज्यांच्यामुळे निर्माण होतात त्यांच्यात मूल्य नसते। त्या गोष्टी मूल्ययुक्त आहेत असे म्हणायचे असेल, तर त्यांच्यात फक्त साधनमूल्यच आहे हे स्पष्ट करायला हवे। जेव्हा आपण असे म्हणतो की म्यूझिअममधील योद्धयाचा पुतळा मूल्ययुक्त आहे, तेव्हा आपण त्या पुतळयाबद्दल बोलत आहोत असे वाटते; पण जरा विचार केल्यास आपल्या असे लक्षात येईल की आपले विधान खरोखर त्या पुतळयामुळे निर्माण होणाऱ्या अनुभवाविषयी आहे। कारण हा अनुभव साध्य असून त्याचे मूल्य स्वयंभू आहे; म्यूझियममधील पुतळयात केवळ साधनमूल्यच आहे।68 रिचर्ड्सच्या सर्व विवेचनात प्रेरणेच्या संकल्पनेला फार महत्त्व आहे। प्रेरणा हा शब्द त्याने बहुतेक वेळा इच्छा या अर्थाने वापरला आहे। जिच्या स्वरूपाची आपल्याला स्पष्ट जाणीव असते अशी इच्छा त्याला आfभप्रेत आहेच, पण त्याचबरोबर नेणिवेतील इच्छादेखील त्याने प्रस्तुत मानल्या आहेत।69 वाङ्मय वाचीत असताना नेणिवेतील इच्छांनासुद्धा समाधान मिळते हा फ्राॅइडवाद्यांचा सिद्धान्त आपल्या परिचयाचा आहे। तेव्हा नेणिवेतील इच्छांना रिचर्ड्सने आपल्या उपपत्तीत स्थान दिले आहे हे योग्यच आहे। पण रिचर्ड्स आणखीही एका अर्थाने प्रेरणा या संकल्पनेचा उपयोग करतो। त्याच्या मते शरीर (विशेषतः मज्जासंस्था व तिच्या त्रिढया) आणि मन एकच असल्यामुळे मज्जासंस्थेतील घडामोडींचाही प्रेरणा या संकल्पनेत तो अंतर्भाव करतो।70 मूल्यवान अनुभवात या तीनही प्रकारच्या प्रेरणांना समाधान लाभते असा रिचर्ड्सचा दावा आहे। पण मज्जासंस्थेतील हालचालींना प्रेरणा म्हटल्यामुळे एक मोठी तार्किक अडचण निर्माण होते। मज्जासंस्थेत विद्युदूर्मी खेळत असतात। त्यांचे समाधान होते असे म्हणणे म्हणजे बटन दाबल्यावर दिवा लागून विजेचे समाधान होते असे म्हणण्यासारखे हास्यास्पद व निरर्थक आहे। मानसिक व्यापार व केवळ शारीरिक व्यापार एकाच संघटनेचे घटक आहेत असे म्हणणे म्हणजे कोटिसंभ्रमात फसणे होय। अर्थात शारीरिक घडामोडींबद्दलचा भाग जरी काढून टाकला तरी रिचर्ड्सच्या मूळ सिद्धान्ताला धवमका पोचत नाही। सामान्य जीवनातदेखील प्रेरणांचे समाधान होत असतेच। जास्तीत जास्त प्रेरणांचे समाधान मिळविणे हा प्राणिमात्राचा स्वभावधर्मच आहे। सर्वांगीण समाधान लाभण्यासाठी जरूर असलेले प्रेरणासंघटनही सामान्य जीवनात दिसते।71 पण तरीही सामान्य अनुभव फारसे मूल्यवान नसतात। कारण जीवन सुलभ होण्यासाठी आपण काही इच्छांना आfजबात फाटा देतो। समृद्ध अनुभव पेलता यावा लागतो। तो बहुतेकांना पेलवत नाही। म्हणून संख्येच्या दृष्टीने सामान्यांचा अनुभव दरिद्री असतो। माणूस एखाद्या व्यसनाच्या आहारी गेला विंढवा एखाद्या नेतिक नियमाची त्याच्यावर जबरदस्त पकड असली तरीही त्याचा अनुभव दरिद्री होतो। काही वेळा माणसाच्या मनातील अंतर्गत संघर्षामुळे जीवनात दारिऱ्द्य येते। काही माणसे वेगवेगळया प्रेरणांना वेगवेगळया वेळी सुटे-सुटे समाधान मिळवून देतात। उदाहरणार्थ, साडेअकरा महिने 8-20ची लोकल, दीडचा लंच।।।याप्रमाणे यांत्रिकतेने जीवन जगून केव्हा तरी पंधरा दिवस थंड हवेच्या ठिकाणी जाणारी माणसे या वर्गात मोडतात। पण अशाने त्यांचे एकूण जीवन समृद्ध होत नाही। त्याचप्रमाणे येईल तो क्षणच आपला आहे, पुढची शाश्वती नाही, अशा विचाराने जगणाऱ्यांच्या जीवनातही समृद्धी नसते। याचे कारण त्यांच्या प्रेरणांत कसलीही शिस्त नसते। मूल्यवान अनुभव समृद्ध असतो आणि सुघटित असतो। असे मूल्यवान जीवन जगणारे लोक फारच विरळा आहेत। बहुतेकांचे जीवन दरिद्री, नाही तर विस्कळित असते।72 समृद्ध व सुघटित, म्हणजेच मूल्ययुक्त, अनुभव मिळविण्याचा एक राजमार्ग म्हणजे कला होय। हे स्पष्ट होण्यासाठी रिचर्ड्सने केलेल्या काव्यानुभवाच्या वियलेषणाकडे वळले पाहिजे। समजा, आपण खालील ओळी वाचीत आहोत ः कंटकशल्यें बोंथटलीं, मखमालीची लव वठली; या अनुभवाची सुरूवात कागदावर छापलेल्या शब्दांच्या दृवमसंवेदनांपासून होते। पण काव्यवाचनाच्या अनुभवात या पायरीला फारशी विंढमत नाही। कारण कविता वाचीत असताना टाइप कसा आहे, छपाई कशी आहे, इकडे आपले फारसे लक्ष नसते। त्यापेक्षा पुढची पायरी जास्त महत्त्वाची असते। तिच्यामध्ये आपल्या मनात काही ध्वनिप्रतिमा निर्माण होतात आणि त्यांचा एक बंध तयार होतो। त्याचप्रमाणे शब्दांचे उच्चार करताना स्वरयंत्र, जीभ, ओठ, वगेरेंच्या ज्या हालचाली होतात त्यांच्याही प्रतिमा मनात निर्माण होतात। या दोन प्रकारच्या प्रतिमांना रिचर्ड्स संबद्ध प्रतिमा(ूग् ग्स्aुीब्) असे नाव देतो।73 काव्यवाचनाच्या एकूण अनुभवामध्ये या प्रतिमांचे व त्यांतून निर्माण होणाऱ्या बंधाचे स्थान फार महत्त्वाचे असते। या ध्वनिसंघटनेमुळे काव्यातील एकूण अनुभवाला एक चौकट मिळते।74 यानंतरची पायरी म्हणजे इतर प्रतिमांची उत्पत्ती होणे। वरील ओळीतील मखमल मनश्चक्षूंपुढे उभी राहणे, तिचा मऊ, सुखद स्पशर् मनाला जाणवणे, इत्यादी गोष्टींचा उल्लेख या पायरीवरील प्रतिमांची उदाहरणे म्हणून करता येईल। रिचर्ड्स या प्रतिमांना मुक्त प्रतिमा(इrाा ग्स्aुीब्) हे नाव देतो। काव्यशास्त्रातील चर्चेत मुक्त प्रतिमांना फार महत्त्व देण्यात येते। रिचर्ड्सच्या मते हे योग्य नाही। एक तर सर्वच वाचक या प्रतिमा मनासमोर उभ्या करू शकत नाहीत। पण प्रतिमानिर्मितिक्षमतेवर काव्याचा आस्वाद अवलंबून नसतो। कारण ज्यांच्यात ही क्षमता आfजबात नाही असे वाचकसुद्धा काव्याचा आस्वाद चांगल्या रीतीने घेऊ शकतात। दुसरे असे की प्रतिमा जितवमया जास्त स्पष्ट व रेखीव तितका काव्यानुभव सकस, असेही म्हणता येत नाही। काही वेळा तर प्रतिमांची स्पष्टता काव्यवाचनात अडथळे उत्पन्न करण्याची शवमयता आहे। तिसरे असे की दृवमसंवेदनेच्या बाबतीत चित्रात जो नेमकेपणा असतो तो काव्यातील प्रतिमेत असू शकत नाही। उदाहरणार्थ, गडद निळे, गडद निळे, जलद भरून आले ही ओळ वाचताना निळया ढगांची प्रतिमा मनासमोर उभी राहते, असे समजू। हे ढग किती आहेत? त्यांचा रंग गडद निळा आहे म्हणजे किती गडद आहे? एका वाचकाला पाच ढग दिसतील तर दुसऱ्याला अनेक थर असलेले दोनच ढग दिसतील। त्यांच्या गडदपणाविषयी देखील प्रतिमाभिन्नता संभवते। पण समजा, आपण गडद निळया ढगांचे चित्र पाहत आहोत। आता ढग किती व त्यांचा रंग कसा याविषयी वाद संभवतच नाही। चौथा मुद्दा असा की प्रत्येक कवितेत प्रतिमांचा उपयोग केलेला असतोच असे नाही। आणि ज्या कवितेत प्रतिमा नसतात ती कविता काव्यदृष्टया हिणकस असेलच असे नाही। मग या प्रतिमांचे काव्यातील नवमकी कार्य कोणते? काव्यातील प्रतिमावाचक शब्दांमुळे विचार व भावना निर्माण होतात; हेच त्यांचे कार्य होय। म्हणजे प्रतिमांना केवळ साधनमूल्य आहे। यापुढची पायरी म्हणजे विचारांची (rिीाहमे) विचारांनी एक प्रकारची साधारणता (ुाहीaत्ग्ूब्) असते। काव्यातील विचारांचा विषय कोणतीही एखादी विशिष्ट गोष्ट नसून अशा गोष्टींचा वर्ग असतो। विचारांना केवळ विचार म्हणून काव्यात स्थान नसते, असा रिचर्ड्सचा दावा आहे। प्रतिमांप्रमाणे विचारांनाही काव्याच्या संदर्भात साधनमूल्यच असते। विचारांमुळे भावना व प्रेरणा निर्माण होतात, म्हणूनच विचारांना काव्यात महत्त्व असते।75 रिचर्ड्सने विचारांच्या बाबतीत ही भूमिका का घेतली याची चर्चा आपण नंतर वेगळया संदर्भात करणार आहोत। याच्या पुढची पायरी म्हणजे भावना आणि प्रेरणा यांच्या जागृतीची। प्रेरणा जागृत होऊन तिचा आविष्कार अर्धस्फुट क्रियेत (ग्हम्ग्ज्गहू aम्ूग्दह) होतो । या अर्धस्फुट क्रियेला रिचर्ड्सने अॅटिटयूड हे नाव दिले अव्हे। काव्य-वाचनाच्या वेळी आपली भूमिका क्रियाशीलतेची (ज्raम्ूग्म्aत्) असते, कारण आपल्या हातून प्रत्यक्ष क्रिया घडली नाही तरी त्रिढयेच्या पूर्वतयारीची विंढवा अर्धस्फुट क्रियेची पायरी आपण गाठलेली असते।76 काव्यवाचनातील सर्वांत महत्त्वाची पायरी हीच असते। आपण गेल्या प्रकरणात भावना व प्रेरणा यांच्यातील संबंधांची चर्चा केलेली आहे। प्रत्येक भावनेत प्रेरणा अंतभूर्त असते हे आता आपल्याला माहीत आहे। त्यामुळे भावनाजागृतीचा अनुभव म्हणजे पर्यायाने प्रेरणाजागृतीचाच अनुभव कसा ठरतो हे समजते। कलास्वादाच्या वेळी जागृत होणाऱ्या प्रेरणा लौकिकच असतात। लौकिक जीवनात प्रेरणा जागृत झाल्या म्हणजे त्यांतून प्रत्यक्ष कृती निर्माण होतात। काव्यवाचनाच्या वेळी प्रेरणाजागृती झाली तरी प्रत्यक्ष कृती निर्माण होत नाहीत हे खरे। पण यावरून विश्वचेतन्यवाद्यांच्या अर्थाने आपण तटस्थ असतो आणि आपल्यात प्रेरणाजागृती होत नाही असा निष्कर्ष निघत नाही। प्रेरणा निश्चित जागृत होतात। पण त्यांचे असे व्यवस्थापन होते की प्रत्यक्ष कृती निर्माण होत नाही। आणि या व्यवस्थापनाचा परिणाम म्हणून आपल्याला तटस्थेचा अनुभव येतो। तटस्थतेने कलानुभवाची सुरूवात होत नसून त्याचा शेवट होतो। मात्र ही तटस्थता म्हणजे विश्वचेतन्यवाद्यांची तटस्थता नव्हे। देनंदिन जीवनात देखील प्रेरणांचे व्यवस्थापन होते हे आपण वर पाहिलेच आहे। पण बहुतेक वेळा या संघटनेत प्रेरणांचे दारिऱ्द्य तरी असते, नाही तर विस्कळितपणा तरी असतो। काव्यानुभवात मात्र हे दोष दूर केले जातात। त्यात प्रेरणांचे वेपुल्य व वेविध्य असते आणि त्या प्रेरणांचे संघटनही कौशल्यपूर्ण असते।77 त्यामुळेच एरव्ही एकमेकांना विरोधी असणाऱ्या प्रेरणा व भावना काव्यानुभवात शेजारी-शेजारी नांदू शकतात। वेगवेगळया भावना-प्रेरणांमध्ये समधातता (ाल्ग्त्ग्ंrग्ल्स्) निर्माण होते। या समधाततेचे उदाहरण म्हणून रिचर्ड्सने कॅथार्सिसचा निर्देश केला आहे। अनुकंपा म्हणजे जवळ जाण्याची प्रेरणा व भीती म्हणजे दूर जाण्याची प्रेरणा। शोकात्म नाटयामुळे त्यांच्यात समतोल निर्माण होतो, असे रिचर्ड्स म्हणतो। पण हे उदाहरण फारच ढोबळ आहे आणि ते फारसे पटण्यासारखेही नाही। रिचर्ड्सने काव्यातील उपरोधाचे (ग्rदहब्) उदाहरणही दिलेले आहे। उपरोधामुळे भिन्न व विरोधी प्रेरणा एकत्र येऊ शकतात। म्हणूनच बरेच वेळा चांगल्या काव्यात उपरोधाचे अंग असते। त्यामध्ये निर्माण होणारे प्रेरणासंतुलन इतके वेविध्यपूर्ण, संपन्न व स्थिर असते की ते उपरोधामुळे विचलित होत नाही। उलट, सामान्य दर्जाच्या काव्यातील अनुभवाला उपरोध झेपत नाही। आणखी एक उदाहरण द्यायचे तर आपल्याला शेक्िस्पअरच्या शोकाित्मकांतील विनोदी प्रसंगांचा उल्लेख करता येईल। प्रत्यक्ष आयुष्यात एखादी गंभीर घटना घडली तर त्या वेळी कोणी हसत नाही विंढवा हसू येईल असे काही करत नाही। पण मॅवमबेथ मध्ये डंकनचा खून झाल्यानंतर थोडयाच वेळात दारू प्यालेल्या द्वारपालाचे विनोदी भाषण ऐकताना आपल्याला काही खटकत नाही। याचे कारण असे की मॅवमबेथ बघत असताना आपली जी मनोवस्था होते ती इतकी व्यापक व समतोल असते की तिच्यात विविध, परस्परविरोधी भावना व प्रेरणा खपून जातात, इतकेच नव्हे तर शोभूनही दिसतात। प्रगल्भ माणूस कशानेही फारसा विचलित होत नाही याचे देखील कारण हेच की त्याच्या भावना-प्रेरणांमध्ये व्यापक व समतोल असलेली व्यवस्था स्थापन झालेली असते। त्यामुळे जीवनातील लहानमोठया धवमवमयांनी त्याचा समतोल सहसा ढळत नाही। प्रगल्भ माणसांमध्ये निर्मळ विनोदाचा झरा नेहमी खळाळत असतो याचेही कारण हेच असते। प्रगल्भ माणुस भावनाशून्य नसतो; त्याला भावनानुभव जरूर येतात। पण त्यांचे चांगले व्यवस्थापन होत असल्यामुळे त्याच्या भावना बांध फोडून इतस्ततः वाहत नाहीत। अर्थातच सर्व वाङ्मयकृती सारख्या नसतात। काहींमध्ये एकमेकींना समांतर असणाऱ्या प्रेरणांचे संघटन सापडते; इतरांमध्ये परस्परविरोधी प्रेरणांमधून सुघटित बंध निर्माण केल्याचे दिसते। य0गो0 जोशी विंढवा सानेगुरूजी यांचे वाङ्मय पहिल्या प्रकारात मोडते। त्यांच्या वाङ्मयात केवळ भावविव्हलता व तिला पोषक असलेल्या उपरोध-त्यात सापडत नाही। मर्ढेकर व गंगाधर गाडगीळ यांच्या वाङ्मयात दुसऱ्या प्रकारचे संघटन सापडते। त्यांच्या वाङ्मयात उत्कट भावनेबरोबरच उपरोध व विनोद यांना महत्त्वाचे स्थान मिळालेले आहे ही गोष्ट याच संदर्भात फार उद्बोधक ठरते। तसेच वाचका-वाचकांमधील भेदही येथे लक्षात ठेवला पाहिजे। बऱ्याच वाचकांच्या भावनात्मक प्रतिक्रिया ठराविक साच्यांच्या असतात। उदाहरणार्थ, आईबद्दल विंढवा देशाबद्दल विचार आला की त्यांचे हृदय भरून येते। या गोष्टीचा उपयोग काही व्यवहारी लेखक फार हुषारीने करून घेतात। त्यांना असल्या वाचकांचे लाड कसे पुरवायचे हे माहीत असते। म्हणून ते रूणझुणत्या पाखराला माझिया माहेरा पाठवितात, त्या तिथे पलिकडे असलेल्या प्रियेच्या झोपडयाकडे बोट दाखवितात। माहेर-सासराबद्दल बोलताना त्यांना गंगा नदी यमुनेला मिळाल्याचे दिसते। ते एखादा गरीब, साधा शिक्षक, एखादा नटश्रेष्ठ, शिवशाहीतला विंढवा पेशवाईतला एखादा वीरपुरूष यांच्याबद्दल लिहितात। पिठले, थालिपीठ, कांद्याची भजी ही जशी केव्हाही मिळाली तरी मराठी माणसाला आवडतात, तसे वरील विषयांवरील साचेबंद लिखाणही अनेक मराठी वाचकांना केव्हाही प्रिय वाटते। कारण त्यांच्या स्वतःच्या भावनात्मक प्रतिक्रिया साचेबंद असतात। प्रत्यक्ष जीवनात ते या साच्यांबाहेर पडू शकत नाहीत। कारण असे साचे म्हणजे त्यांच्या जीवनाचे आधारच असतात। ते नसले तर आपल्या प्रतित्रिढयांमध्ये विलक्षण विस्कळितपणा येईल अशी त्यांना भीती वाटते। चांगले वाङ्मय वाचताना या साच्यांच्या बाहेर पडण्याची संधी मिळते। पण अनेक करंटे वाचक या संधीचा फायदा घेऊ शकत नाहीत। त्यांतल्या काहींना मृत्यूसारखे जीवनातील तीव्र प्रसंग गदगदा हलवतात, त्यांचे साचे मोडून टाकतात आणि त्यांना नवीन दिशेने विचार करायला शिकवितात। पण सर्वांच्या बाबतीत हे घडतेच असे नाही। अनेक लोक विचार व भावना यांच्या दृष्टीने शेवटपर्यंत पंगू व खुजेच राहतात। काव्यवाचनाने आपल्याला जीवनाविषयी प्रगल्भ असा भावनात्मक दृष्टिकोण प्राप्त होतो। काव्यवाचनाच्या वेळी कोणता अनुभव येतो, अत्यानंद, िथ्रल इत्यादी जाणवतात की नाही, यापेक्षा काव्यवाचनानंतर आपल्या प्रेरणांची संघटना कशी होते, कोणत्या प्रकारची कृती करण्याची सज्जता आपल्यात निर्माण होते, जे जास्त महत्त्वाचे आहे, असे रिचर्ड्स बजावतो। काव्याचे दूरगामी परिणाम फार महत्त्वाचे असतात।78 या परिणामांमुळे जीवनातील कोणत्याही प्रसंगाला डोळसपणे तोंड देण्याची कुवत आपल्याला येते। असा दृष्टिकोण देण्याचे कार्य पूर्वी धर्म करीत असे। धर्म म्हणजे नुसती ईश्वरावरील श्रद्धा नव्हे। आपल्या एकूण आयुष्यात उपयोगी पडेल अशी जीवनदृष्टी देणे हेसुद्धा धर्माचेच कार्य आहे। खि्रस्ती धर्माची जीवनदृष्टी ईश्वराविषयीच्या एका श्रद्धेवर आधारलेली होती। या पायाभूत श्रद्धेला एकोणिसाव्या शतकात प्रचंड हादरे बसले आणि त्यामुळे तिच्यावर आधारलेली जीवनदृष्टीची इमारतही कोसळायला लागली। जेथे धर्म कुचकामी ठरला तेथे काव्य यशस्वी होईल असा रिचड्र्सचा विश्वास आहे।71 काव्य आपल्याला अशी जीवनदृष्टी देते की तिच्यामुळे आपण प्रगल्भ होऊन जास्तीत जास्त मूल्यवान अनुभव घेण्याची कुवत आपल्यात निर्माण होते। रिचर्ड्सने सौंदर्यमूल्य व नीतिमूल्य यांच्यात फरक केलेला नाही, हे आपण वर पाहिलेच आहे। त्यामुळे कलाकृती सुंदर आहे असे म्हणणे आणि ती चांगली विंढवा शिव आहे असे म्हणणे यांत तत्त्वतः काहीच फरक नाही। याचा अर्थ असा की कला नीतिपोषक असते। पण यावरून असे सिद्ध होत नाही की कला उपदेशपर असते विंढवा असावी। नीतितत्त्वांच्या पालनामुळे जे मूल्यवान अनुभवांनी संपन्न असे जीवन साध्य होते ते कलास्वादानेही प्राप्त होते। हे जीवन साध्य करून घेण्याचा कला हा एकमेव मार्ग नसला तरी तो अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे हे निश्चित। काव्यमूल्याच्या संदर्भात रिचर्ड्सचा सिद्धान्त फार महत्त्वाचा आहे यात शंका नाही। आपण काव्याकडून समृद्ध व सुघटित अनुभवाची अपेक्षा करतो हे खरे आहे। काव्य ज्या सामग्रीचे बनविलेले असते ती सामग्री लौकिक जीवनातीलच असल्यामुळे ज्याला या सामग्रीचे काव्याच्या संदर्भात कुशल संघटन करता येते त्याला तिचे तसेच संघटन प्रत्यक्ष आयुष्यातही करता येईल हा विचार पटण्यासारखा आहे। पण हे जरी काव्याच्या बाबतीत खरे असले तरी ते इतर सर्वच कलांच्या बाबतीतही खरे ठरेल असे वाटत असे वाटत नाही। असे म्हणता येईल की ज्यांत लौकिक आशय असतो अशा कलाकृतींच्या बाबतीत रिचर्ड्सचा सिद्धान्त खरा ठरण्याची शवमयता पुष्कळ आहे। परंतु आशयरहित कलाकृतींच्या संदर्भात तो खरा ठरेल असे वाटत नाही। उदाहरणार्थ, ख्याल गाण्याचा विंढवा ऐकण्याचा सराव झाल्यामुळे माणूस एकूण जीवनात प्रगल्भ होईल हे पटत नाही। खरे म्हणजे केवळ आशयप्रधान कलाकृतींवरून-विशेषतः वाङ्मयकृतींवरून-रिचड्र्सने आपला सिद्धान्त बनविलेला आहे असे स्पष्ट दिसते। सुरूवातीला तरी तो वाङ्मयपुरताच मर्यादित ठेवण्याची रिचर्ड्सची इच्छा असावी। आणि जरी संगीतादी इतर कलांना तो सिद्धान्त लावून दाखविण्याचा प्रयत्न त्याने आपल्या प्रििन्सपल्स आॅफ लिटररी त्रिढटिसिझम या ग्रंथामध्ये केला असला तरी हा नंतर सुचलेला विचार असावा असे वाटते। स्वरांची मांडणी करीत असताना लौकिक जीवनातील कोणत्या प्रेरणा जागृत होतात, त्यांची व्यवस्था कशी लागते, आणि ती नेतिकदृष्टया जीवनोपयोगी कशी ठरते-हे प्रया> रिचर्ड्सला अडचणीत टाकणारे आहेत। या अडचणीतून सुटण्याचा एक मार्ग म्हणजे संगीतातही आशय असतो असे म्हणणे। भावगीत, नाटयगीत इत्यादी काही प्रकारच्या संगीतात आशय असतो हे खरे। पण सर्व संगीतात आशय असतो हे विधान मात्र आfतरेकी झाले। अर्थात जीवनवादी सौंदर्यशास्त्रज्ञांना अशी आfतरेकी भूमिका घ्यावीच लागते। कारण नाहीतर कलेतील एका प्रांतापुरता तरी कलेच्या स्वायत्ततेचा सिद्धान्त त्यांना मान्य करावा लागतो। या उलट, स्वायत्ततावाद्यांचे खरे क्षेत्र आशयरहित संगीत, चित्रकला, निसर्गसौंदर्य हे होय। आशयसंपन्न वाङ्मयकला त्यांना नेहमीच अडचणीची वाटते। मर्ढेकरांनी आपल्या कलासोपानपरंपरेत वाङ्मयाला सर्वांत खालच्या पायरीवर ठेवले याचे कारण म्हणून वाङ्मयीन माध्यमाच्या भ्रष्टतेचा उल्लेख करण्यात येतो। पण खरे कारण हे आहे की कलाप्रांतात वाङ्मयाला महत्त्वाचे स्थान दिले तर स्वायत्ततावादाच्या मार्गात अनेक अडचणी निर्माण होतात। म्हणून वाङ्मयाला कलाप्रातांत निकृष्ट स्थान देणे सोयीचे, कारण तसे केल्याने वाङ्मयामुळे निर्माण होणाऱ्या अडचणींकडे काणाडोळा करता येतो। स्वायत्ततावाद्यांच्या मनात हे असे कारण असणेच जास्त संभवनीय वाटते।

9।7
संपूर्ण जीवनवादी असलेल्या आणखी एका सौंदर्यसिद्धान्ताचा आपल्याला आता थोडवमयात परिचय करून घ्यायचा आहे। हा सिद्धान्त जाॅन डयुईने मांडलेला आहे। रिचर्ड्सप्रमाणे डयुईसुद्धा असे मानतो की कलानुभव व जीवनानुभव यांच्यात तत्त्वतः काही फरक नाही। डोंगराचा सुळका व पायथ्याची जमीन यांच्यात जे नाते असते तेच कलानुभव व लौकिक अनुभव यांच्यात असते। हा अभेद दाखविणे हे सौंदर्यशास्त्रज्ञाचे पहिले काम आहे।80 कलानुभव व सामान्य अनुभव यांच्यातील घटक एकाच जातीचे असतात आणि त्यांच्यात व्यवस्था लावायचे तत्त्वही एकाच प्रकारचे असते। म्हणजे त्यांच्यातील फरक जातीचा नाही। फरक आहे तो मुख्यतः संख्यात्मक। सामान्य अनुभवापेक्षा कलानुभव जास्त समृद्ध व तीव्र असतो, जास्त व्यवस्थित बांधणीचा असतो। आपल्या नेहमीच्या जीवनात अशा अनेक घडामोडी घडतात की ज्या आपले लक्ष वेधून घेतात, आपली आस्था जागृत करतात आणि आपल्याला आनंद देतात। प्रचंड वेगात जाणारा आगीचा बंब विंढवा जमिनीत प्रचंड खड्डे खोदणारे यंत्र यांच्याकडे आपण किती एकाग्र होऊन पाहतो! या साध्यासाध्या अनुभवांत बीजरूपातील कलानुभव सापडतो। कलाव्यवहार हा जीवनव्यवहारापेक्षा आfजबात वेगळा असा प्रांत आहे हा समज चुकीचा आहे। पण हा गेरसमज आज इतका दृढमूल झालेला आहे की तो गेरसमज आहे अशी शंकासुद्धा कोणाला येत नाही। खरे म्हणजे कला ही जीवनापेक्षा आfजबात वेगळी, म्यूझिअम विंढवा आर्ट गॅलरी यांच्यातच दिसणारी गोष्ट आहे ही कल्पना (ूप स्ल्ेाल्स् conमज्ूग्दह दf arू) विशिष्ट ऐतिहासिक परिस्थितीमुळे निर्माण झाली आहे। या संदर्भाच्या बाहेर तिला काही विंढमत नाही। एके काळी लोक नित्य व्यवहारातली उपकरणे, धनुष्यबाण, भाले, इत्यादी गोष्टी फार निगुतीने बनवीत असत। निर्मितीची ही त्रिढया फार आल्हाददायक असणार यात शंका नाही। एके काळच्या नित्य व्यवहारातल्या गोष्टी आज आपण आपल्या आर्ट म्यूझिअममध्ये आणून ठेवतो। परंतु या गोष्टी मुळात म्यूझिअममध्ये ठेवण्यासाठी निर्माण झाल्या नव्हता; त्या देनंदिन जीवनाचा एक आfवभाज्य भाग होत्या। या गोष्टींमध्ये देनंदिन जीवनातील प्रक्रियांनीच जास्त तरल, सूक्ष्म, व तीव्र स्वरूप धारण केल्याचे दिसते। हीच गोष्ट नाटय, नृत्य, संगीत, इत्यादी कलांबद्दलही खरी आहे। मुळात या सर्व कला समाजाच्या नित्य जीवनाचाच भाग होत्या।81 राष्ट्रवाद व साम्राज्यवाद यांच्या उदयानंतर युरोपातील बहुतेक म्यूझिअम आfस्तत्वात आले। आपल्या राष्ट्राने कलेच्या क्षेत्रात जुन्या काळापासून जी कामगिरी केली होती तिचे दशर्न लोकांना घडावे म्हणून अनेक कलाकृती म्यूझिअममध्ये आणून ठेवण्यात आल्या। त्याचबरोबर पादाक्रांत केलेल्या देशांतील कलाकृती विजयचिन्हे म्हणून म्यूझिअममध्येच ठेवल्या गेल्या। अशा रीतीने या कलाकृतींना त्यांच्या मूळ जीवनसंदर्भापासून वेगळे करण्यात आले।82 म्यूझिअमच्या जन्माचा भांडवलशाहीच्या विकासाशीही महत्त्वाचा संबंध आहे। नव्याने श्रीमंत झालेल्या भांडवलदारांना आपल्याभोवती दुर्मिळ व महाग कलाकृती असाव्यात असे वाटत असल्यास नवल नाही। आपणही सुसंस्कृत आहोत हे दाखविण्याचा तो एक सुलभ मार्गच असतो। श्रीमंत राष्ट्रेसुद्धा बरोबर हीच गोष्ट करताना दिसतात। हा केवळ आत्मप्रौढीचाच भाग असतो। पण यामुळे कलाकृती त्यांच्या विशिष्ट जीवनसंदर्भापासून तोडल्या जातात।83 अशा संदर्भरहित कलाकृतींना केवळ कलाकृतींचे स्थान व महत्त्व प्राप्त होते। आजच्या यांत्रिकतेच्या युगात कलावंत हा समाजाशी एकरूप होऊ शकत नाही, कारण तो यांत्रिकपणे निर्मिती करू शकत नाही। यातून कलावंताचा आfतरेकी व्यक्तिवाद निर्माण होतो। आपण समाजाचे काही देणे लागत नाही, आपण केवळ आत्माविष्कारासाठी कलानिर्मिती करतो अशी भूमिका कलावंत घेतो। वर दिलेल्या विविध कारणांचा परिपाक म्हणजे कलेचा समाजजीवनाशी असलेला संबंध तुटणे हा होय। कला ही फक्त तटस्थ अवलोकनासाठी असते हा सौंदर्यसिद्धान्त कलेची जीवनापासून झालेली फारकत नेसर्गिकच आहे असे गृहीत धरतो। कला व देनंदिन जीवन यांच्यातले अंतर आपल्याला स्वाभाविक वाटावे यातच आपल्या जीवनावरचे एक कडू भाष्य अनुस्यूत आहे। आपले नेहमीचे जीवन किती खुजे व विकृत आहे याचीच जणू कबुली देण्यासाठी आपण जीवन व कला यांच्यात एक दरी आहे असे म्हणतो।84 डयुईच्या मते जीवन व कला यांच्यामध्ये फारकत करणारी ही विचारसरणी मुळातच चूक आहे। सामान्य जीवनातील मूल्यवान गोष्टींमध्येच तीव्रता, सूक्ष्मता, तरलता आली की कलाकृती निर्माण होते।85 सौंदर्यानुभवाचे स्वरूप कळायचे असेल तर देनंदिन जीवनातील साध्या अनुभवाचे वियलेषण करणे जरूर आहे, असे तो म्हणतो। प्राणी आणि त्याच्या सभोवतालची परिस्थिती यांच्यातील संबंधातून सर्व अनुभव निर्माण होतो। या दोघांत काही काळ टिकणारा, पण तेवढयापुरता स्थिर, असा एक संबंध असतो। पण परिस्थिती बदलत असते आणि हा संबंध सारखा तुटत असतो। बाहेरची परिस्थिती बदलली, परिस्थिती जुळलेला सांधा निखळला की प्राणी अस्वस्थ होतो। मग तो परिस्थितीत बदल घडवून आणतो। या बदललेल्या परिस्थितीचे प्राण्यावर नवे परिणाम घडतात। मग या परिणामांनी संस्कारित झालेला प्राणी परिस्थितीत पुन्हा बदल घडवितो। असा हा व्यापार अव्याहत चालू असतो। या व्यापाराचे वेशिष्टय असे की तो चालू झाला की परिस्थिती व प्राणी यांची मूळ स्वरूपे बदलतात। घडयाळाचा लंबक इकडून तिकडे व तिकडून इतके असा सारखा हलत असतो आणि म्हणून त्याच्या हालचालीत लय असतो, असे म्हणतात। पण हे लयाचे योग्य उदाहरण नव्हे। त्यासाठी आपल्याला सजीव प्राण्याच्या त्रिढया-प्रतिक्रियांकडेच जायला हवे। लंबकाच्या हालचालींप्रमाणे त्या निर्जीव व यांत्रिक नसतात। त्यांच्या एका त्रिढयेच्या दुसऱ्या त्रिढयेशी जिवंत संबंध असतो। प्राण्याची प्रत्येक दुसरी त्रिढया ही त्याच्या पहिल्या त्रिढयेने आणि तिच्या परिणामांनी संस्कारित झालेली असते, म्हणून या क्रिया-प्रतिक्रियांत जिवंत लय असतो। या अनुभवाला आकार (fदrस्) असतो तो सुघटित अनुभव असतो।86 माणसाचा अनुभवही याच प्रकारचा असतो पण त्याच्या व इतर प्राण्यांच्या अनुभवांत एक महत्त्वाचा भेद आहे। परिस्थितीबरोबर चाललेल्या त्रिढयाप्रतिक्रियांची माणसाला जाणीव होऊ शकते। परिस्थितीबरोबरचा सांधा निखळला की भावना निर्माण होते। त्यातून विचारप्रक्रिया सुरू होते। सुटलेला सांधा पुन्हा जोडला जावा ही इच्छाही निर्माण होते। या विचारादी गोष्टी परिस्थितीतील वस्तूंचे अर्थ बनतात।87 प्रत्येक अनुभव चेतन्यपूर्ण असतो। कारण परिस्थिती व प्राणी यांच्यातील सजीव संबंधामधून तो निर्माण होत असतो। हा संबंध जेव्हा परिपूर्ण अवस्थेला पोचतो तेव्हा परिस्थिती व प्राणी एका अर्थाने एकमेकांत पूर्णपणे गुंतलेले, एकमेकांशी एकरूप झालेले असतात। असा परिपूर्ण अनुभव म्हणजे बीजरूपातली कला होय।88 अनुभवाचे आणखी एक वेशिष्टय असे की त्यात एकात्मता असते। काही वेळा अनुभवाची एकात्मता व स्वयंपूर्णता ही आपल्याला स्पष्टपणे जाणवतात। हे अनुभव संस्मरणीय ठरतात। म्हणूनच उदाहरणार्थ, आपण त्यांचा निर्देश ते वादळ, ते जेवण असा करतो। साध्या अनुभवातले वर उल्ल्ेखिलेले सर्व घटक कलानुभवात असतात। फरक इतकात की कलानुभवात या सर्वांना विशेष तीव्रता व स्पष्टता आलेली असते। कलानुभव हा माणूस व बाहेरची परिस्थिती यांच्यात होणाऱ्या त्रिढयाप्रतित्रिढयांचे फल असतो। चरकाच्या दोन चाकांत उसाचे कांडे पिळले जाते आणि रस बाहेर पडतो; त्याचप्रमाणे माणसाचे मन व परिस्थिती यांच्या दाबामळे कलात्मक आविष्कार निर्माण होणार नाही। आविष्काराच्या प्रक्रियेला कालाचे परिमाण असते। आविष्कार ही एका क्षणात निर्माण होणारी गोष्ट नव्हे मन व परिस्थिती यांच्यात होणाऱ्या त्रिढयाप्रतिक्रियांच्या साखळीमधून आविष्कार निर्माण होत असल्यामुळे आविष्कारानिर्मिती ही काही काळ चालणारी गोष्ट असते। आविष्कार निर्माण होत असताना पूर्वानुभवांचे संस्कार जागृत होऊन ते आविष्काराशी एकरूप होतात।89 आविष्काराच्या प्रक्रियेमुळे परिस्थितीत बदल होतात हे सर्वांना माहीत आहे। उदाहरणार्थ, सुरूवातील चित्रकारापुढे रिकामा कॅन्व्हस असतो; आविष्कार-प्रक्रियेमुळे त्यावर रंग चढत जातात। पण परिस्थितीत जसे बदल होतात तसे चित्रकारातही बदल होत असतात हेही लक्षात ठेवले पाहिजे; तोही नव्याने घडत असतो।90 असे बदल घडले म्हणजे चित्रकाराचा त्याच्या नेहमीच्या भावजीवनाशी संबंध तुटतो असे नाही। त्याच्या भावना या नेहमीच्याच भावना असतात; पण आविष्कारामुळे त्यांना जास्त स्पष्टता येते। कलावंत व इतर माणसे यांच्यात आणि कलानिर्मिती व इतर वस्तूंचे उत्पादन यांच्यात जातीचा फरक नाही। त्यांच्यात जातीचा फरक आहे असे आज वाटते याचे कारण यांत्रिकतेवर उभारलेली आजची उत्पादनाची पद्धती हेच आहे। या पद्धतीमुळे आपण करीत असलेली प्रत्येक गोष्ट केवळ साधनरूप बनली आहे। परंतु प्रत्येक अनुभव साध्यरूप व्हावा, तो अनुभव स्वतःच समाधान देणारा असावा, ही इच्छा फक्त कलावंतांपुरती मर्यादित नाही। खरे म्हणजे प्रत्येक अनुभवाला व उत्पादनपद्धतीला कलास्वरूप प्राप्त होऊ शकेल। आपली समाजरचना विकृत असल्यामुळे आज हे शवमय होत नाही हे खरे; पण याचा अर्थ असा नव्हे की कलाव्यापार ही एक अलौकिक गोष्ट आहे। आज समाजात ज्या प्रकारची व्यवस्था दिसते, ती बाहेरून लादलेली व्यवस्था आहे। वाढत्या व जिवंत अनुभवातून उत्स्फूर्तपणे निघालेली ती व्यवस्था नव्हे। आपल्या जीवनातल्या कित्येक अंगांना ती स्पशर्ही करीत नाही। अनुभव साध्यरूप करणे, तो स्वतःच समाधान देणारा करणे, या गोष्टी प्रचलित समाजव्यवस्थेच्या आवावमयातल्या नाहीत। पण कला या गोष्टी घडवून आणू शकते। आणि म्हणनूच आपल्या जीवनाची घडण कशी असायला हवी याचा जणू वस्तुपाठच कला आपल्याला देत असते।91 डयूईचा आfभप्राय येथे अगदी स्पष्ट आहे। नेहमीच्या अनुभवांची परिणत अवस्था म्हणजे कलानुभव। आपल्या वेयक्तिक व सामाजिक जीवनाची घडण विकृत असल्यामुळे आपला देनंदिन अनुभव वर उल्लेखिलेल्या परिणत अवस्थेला पोचत नाही। पण आपल्या जीवनाची घडण बदलली तर साधा अनुभवसुद्धा या अवस्थेला पोचू शकेल। ही नवीन घडण कशी असावी याबद्दलचे मार्गदशर्न कला करते। आणि कला हे कार्य करू शकते, कारण कलानुभवाचे घटक व सामान्य अनुभवाचे घटक हे एकच आहे, आणि या घटकांची संघटना करण्याची तत्त्वेही एकच आहेत। सामान्य अनुभवात या घटकांची वाढ अपुरी झालेली असते आणि संघटनातत्त्वही आfवकसित रूपात असते। कलेमध्ये हेच घटक व हेच संघटनातत्त्व ही दोन्ही पूर्ण विकसित अवस्थेत सापडतात। सर्व अनुभवाचे साफल्य म्हणजे कलानुभव। कलांचा माणसाच्या समग्र जीवनावर फार मोठा परिणाम होतो। डिकन्ससारख्यांनी जीवनाचे भेदक चित्रण करून सामाजिक बदल घडवून आणले ही या परिणामाची एक बाजू झाली। पण याहीपेक्षा या परिणामाची दुसरी बाजू फार महत्त्वाची आहे। कोणत्याही काळातल्या एकूण कलाकृती म्हणजे त्या काळातले सांस्कृतिक वातावरण होय। या वातावरणाचा आपल्या कृतींवर, इच्छाआकांक्षांवर सतत परिणाम घडत असतो। प्रत्यक्ष नीतिपाठापेक्षा हा सूक्ष्म, सर्वांगीण परिणाम फार महत्त्वाचा आहे।92 शेलीने काव्य व नीती यांच्यामधील संबंधाबद्दल आपल्या डिफेन्स आॅफ पोएट्री या निबंधामध्ये जे विवेचन केले आहे त्याच्या येथे थोडवमयात परिचय करून घेणे उपयुक्त ठरेल। शेलीच्या मते समाजात नेतिकता दिसत नाही याचे कारण नीतितत्त्वांचा अभाव हे नाही। नीतितत्त्वे उपलब्ध आहेत आणि तरीही नेतिकता नाही ही वस्तुस्थिती आहे। नेतिकतेच्या या अभावाचे खरे कारण लोकांमध्ये विकसित झालेली कल्पनाशक्ती नाही हे आहे। माणसाजवळ जर विकसित कल्पनाशक्ती असेल तर जगात जे जे सुंदर आहे त्याच्याशी त्याचे तादात्म्य होऊ शकते। सर्व मानवजातीच्या सुखदुःखाशी त्याला एकरूप होता येते। इतरांवर प्रेम करण्याची त्याची शक्ती वाढते। असे झाले की तो केवळ आत्मकेंद्रित राहत नाही। सर्वांच्या दृष्टीने तो कोणत्याही प्रया>ाकडे पाहू शकतो। माणसाची आत्यंतिक आत्मकेंद्रितता जाणे, त्याला इतरांच्या दृष्टिकोणातून जगाकडे पाहता येणे, इतरांवर प्रेम करता येणे, म्हणजेच त्याच्या नेतिकतेचा विकास होणे। काव्य नेतिकतेला उपयुक्त ठरते; पण ते विशिष्ट नीतितत्त्वांचा प्रसार करते म्हणून त्याची ही उपयुक्तता सिद्ध होते असे नाही। ही उपयुक्तता अप्रत्यक्ष मदतीच्या स्वरूपाची आहे। काव्यामुळे कल्पनाशक्तीचे पोषण होते आणि विकसित कल्पनाशक्तीमुळे नेतिकतेचे पोषण होते। काव्य व नेतिकता यांच्यातील संबंध असा अप्रत्यक्ष आहे। अर्थात तो अप्रत्यक्ष असला ती त्याचे महत्त्व कमी नाही। रिचर्ड्स, डयुई व शेली हे जीवनवादी सौंदर्यशास्त्रज्ञ असले तरी त्यांच्यात आणि प्लेटो व टाॅल्स्टाॅय यांच्यात एक महत्त्वाचा फरक आहे। प्लेटो व टाॅलस्टाॅय यांचे मत असे की कलेने आस्वादकावर विशिष्ट जीवनमूल्यांचे संस्कार घडवावेत रिचर्ड्स, डयुई, शेली यांच्या मते कलावंताने विशिष्ट स्थलकालसापेक्ष संकुचित मूल्यांपुरते आपले क्षेत्र परिमित करून घेऊ नये आणि प्रत्यक्ष प्रचार करू नये।93 पण तरीही ते नेतिकतावादी आहेत। कलाकृतींच्या मूल्यमापनासाठी ते जो निकष वापरतात तो नेतिक आहे। उदाहरणार्थ, ज्या कलाकृतीत साचेबंद भावनात्मक दृष्टिकोणाचा उपयोग केलेला असेल, जिच्यात प्रेरणांचे दारिऱ्द्य असेल तिला रिचर्ड्स वाईट कलाकृती म्हणतो।94 अशी कलाकृती संकुचित अर्थाने अनेतिक ठरत नाही हे खरे। पण ती मूल्यहीन ठरते आणि तिच्यामुळे वाचकाला मूल्यहीन अनुभवांची सवय लागण्याची शवमयता असल्यामुळे तिला एका व्यापक अर्थाने अनेतिकही म्हणता येईल। रिचर्ड्स व डयुई हे नेतिकतावादी असले तरी विशिष्ट नीतिमूल्यांसाठी कलेला राबवावे असे ते म्हणत नसल्यामुळे प्लेटो आणि टाॅल्स्टाॅय यांच्यापेक्षा त्यांना कलावंताच्या स्वातंत्र्याची जास्त चाड आहे असे म्हणता येईल। आता आपल्याला आणखी एका दृष्टिकोणाचा थोडवमयात परिचय करून घ्यायचा आहे। तो सांतायानाने मांडला आहे। त्याच्या मते कलेने केवळ आनंदरूप राहण्यामुळेच तिची नेतिकता साध्य होते। सौंदर्याची आनंदरूपता नुसती मूल्ययुक्त आहे इतकेच नव्हे, तर तिचे मूल्य सर्वाच्च असते असा त्याचा दावा आहे। याची कारणे अशी ः नेतिक विधाने प्रायः नकारार्थी असतात, त्यांचा उद्देश जीवनातील दुःखे व धोके यांचे दिग्दशर्न करून त्यांच्यापासून स्वतःला कसे वाचविता येईल हे सांगण्याचा असतो। उलट, सौंदर्यविधान होकारार्थी असते। शिवमूल्याचे दिग्दशर्न करणे हे त्याचे कार्य असते। या दोन विधानांमधील दुसरा फरक असा की सौंदर्यविधानाचे विषय ज्यांचे मूल्य स्वयंभू विंढवा साध्यात्मक असे अशा गोष्टी असतात। उलट, नीतिविधानाचे विषय ज्यांना केवळ साधनमूल्य आहे अशा गोष्टी असतात। एखाद्या गोष्टीमुळे कोणते फायदे होतात हे नीतिविधानात सांगितलेले असते, तर सुंदर गोष्टींमुळे कोणते फायदे होणार याचा विचारही सौंदर्यविधान करताना आपल्या मनात नसतो।95 क्रीडेतल्याप्रमाणे कलाव्यापारातही स्वरसरंजनात्मक वृत्तीची अपेक्षा असते। क्रीडा व कलाव्यापार या उत्स्फूर्तपणे व स्वान्तःसुखाय केलेल्या गोष्टी आहेत। आपल्या शक्तींचा असा मुक्त आविष्कार करायला मिळण्यातच माणसाच्या जीवनाचे साफल्य आहे।96 यानंतर सांतायाना म्हणतो की जर या जगातून प्रया>, संकटे, हालअपेष्टा यांचे उच्चाटन झाले तर आपले जीवन केवळ आनंदाने भरलेले असे होईल। सर्वांत मूल्ययुक्त जीवन म्हणजे असे केवल आनंदाचे जीवन होय। परमोच्च अनुभव हा सत्यज्ञानाच्या स्वरूपाचा आहे असे धर्मशास्त्रज्ञ सांगतात। यावर सांतायानाचे म्हणणे असे की ज्या वेळी सत्यज्ञानापासून कसल्याही व्यावहारिक फायद्याची अपेक्षा नसते त्या वेळी सत्य व एखादा सुंदर देखावा यांच्यात काहीही भेद उरत नाही। सत्यान्वेषणाचे सौंदर्यानुभवात रूपांतर होते।97 सांतायानाच्या या विवेचनाबद्दल असे म्हणावेसे वाटते की ज्या जगात प्रया> नाहीत, संकटे व हालअपेष्टा नाहीत, त्या जगात केवळ स्वान्तःसुखाय केलेल्या गोष्टीच असतील यात शंका नाही। सुख हे अशा जगाचा एक आवश्यक घटक असेल याविषयीही संदेह नाही। सुख हे अशा जगाचा एक आवश्यक घटक असेल याविषयीही संदेह नाही। पण तेथे नुसते सुखच असेल, आणि तेही फक्त सौंदर्यसुखच असेल, हे सांतायानाचे मत पटण्यासारखे नाही। या आदशर् जगात सौंदर्यसुख व संवेदनासुख ही जशी असतील, त्याचप्रमाणे विगलितवेद्यांतरवृत्ती होऊन केलेली ज्ञानसाधना, तल्लीन होऊन खेळलेले विविध खेळ, मेत्री व प्रीती यांच्यासारखी मूल्ये, याही गोष्टी असतील। आणि या सर्व गोष्टींमुळे केवळ सौंदर्यसुखच मिळते हे म्हणणे चूक आहे।

9।8
कलेत नेतिकता असावी।, चांगल्या कलेत नेतिकता असतेच।, कला सुखरूप असल्यामुळेच तिच्यात सर्वाच्च नेतिक मूल्य साकारलेले असते। या तीन सिद्धान्तांचा आपण विचार केला। आता कलेत नेतिकता असणे अपरिहार्य आहे। या सिद्धान्ताचा आपल्याला विचार करायचा आहे। हा सिद्धान्त मावमर्सवाद व आfस्तत्ववाद या दोन आधुनिक तत्त्वप्रणालींमध्ये अनुस्यूत आहे। सहाव्या प्रकरणात आपण असे पाहिले की मावमर्सवाद्यांच्या मते कोणत्याही समाजातील एकूण जीवनाची घडण अखेरीस त्यातील उत्पादनसंबंधांवर अवलंबून असते। ज्या समाजात आर्थिक वर्गरचना असते त्यातील माणसांचे जीवन ती ज्या वर्गातली असतील त्या वर्गाच्या हितसंबंधांनी बद्ध झालेले असते। त्यांची धार्मिक, राजकीय, नेतिक, सांस्कृतिक, सामाजिक विषयांवरील मते हीसुद्धा, त्यांच्या प्रत्यक्ष कृतींप्रमाणेच, त्यांच्या वर्गहिताशी सुसंगत असतात। आपल्या वर्गाचा जाणीवपूर्वक त्याग करून क्रांतिकारी वर्गाला जाऊन मिळणारे लोक अपवादात्मक असतात। बहुसंख्य माणसे आपल्या वर्गाच्या चौकटीतच कृती व विचार करतात त्यामुळे त्यांच्या प्रत्येक गोष्टीत वर्गदृष्टीने केलेले मूल्यमापन आfभप्रेत असते; त्यांच्या प्रत्येक कृतीला राजकीय व नेतिक अर्थ असतो। मावमर्सवाद्यांच्या मते जोपर्यंत वर्गव्यवस्थेवर आधारलेला समाज आहे तोपर्यंत माणसाच्या मानवत्वालाच वर्गाच्या मर्यादा पडलेल्या असतात।98 त्यामुळे, कला व वाङ्मय यांत वर्गसापेक्षता असणे हे अपरिहार्य आहे।99 यासाठी एक उदाहरण घेऊ। कलावंत आपल्या स्वातंत्र्याविषयी फार जागरूक असतात; कोणत्याही परिस्थितीत कलास्वातंत्र्य अबाधित राहिले पाहिजे असे ते म्हणतात; आणि समाजवादी समाजरचनेत आपले स्वातंत्र्य हिरावून घेतले जाईल या भीतीने ते समाजवादाला विरोध करतात। यावर मावमर्सवाद्यांचे म्हणणे असे की व्यक्तित्ववादी लोक (indग्vi्ल्aत्ग्ेूे) समजतात तसे व्यक्तिस्वातंत्र्य भांडवलशाही देशात खरोखर असत नाही। ज्या समाजात मूठभर श्रीमंत लोकांच्या हातांत सर्व सत्ता असते आणि बहुसंख्य लोक दारिऱ्द्यात खितपत पडलेले असतात अशा समाजात खरे व्यक्तिस्वातंत्र्य असणे शवमय नाही। अशा समाजातला लेखक आपल्या भांडवलदार प्रकाशकांचा व श्रीमंत वाचकांचा दास असतो। त्याने काय लिहावे हे भांडवलदारच ठरवितात। तेव्हा अशा परिस्थितीत व्यक्तिस्वातंत्र्य व कलास्वातंत्र्य यांचा उद्घोष करणे म्हणजे भांडवलशाहीच्या पाठीराख्यांचे निव्वळ ढोंग आहे।100 यावर असा प्रया> विचारता येईल की कलावंताच्या सर्व कृतींमध्ये व उक्तींमध्ये एका विशिष्ट वर्गाच्या दृष्टिकोणातून केलेले मूल्यमापन अनुस्यूत असते का? तो जेव्हा राजकीय, आर्थिक, सामाजिक प्रया>ांविषयी बोलेल तेव्हा त्याची वर्गनिष्ठा प्रकट होईल असे म्हणता येईल। पण प्रेम, स्त्री, फुले, इत्यादींविषयी तो जेव्हा बोलतो तेव्हाही त्याची वर्गनिष्ठा दिसते असे म्हणणे आfतरेकी नव्हे का? आपण सहाव्या प्रकरणात पाहिल्याप्रमाणे मावमर्सवाद जरी मानवी जीवनातल्या काही वेशिष्टयांचे पटेल असे स्पष्टीकरण देऊ शकत असला तरी इतर काही अंगांना मावमर्सवादी उपपत्ती लावता येत नाही। म्हणून व्यक्तीच्या प्रत्येक कृतीत त्याची वर्गनिष्ठा दिसलीच पाहिजे हे म्हणणे आfतरेकीच ठरते। उदाहरणार्थ, बालकवींच्या फुलराणीत विंढवा गोविंदाग्रजांच्या राजहंसात कसली वर्गनिष्ठा दिसते? पण येथे एक लक्षात ठेवले पाहिजे। अनेक ठिकाणी वर्गनिष्ठा जरी दिसली तरी विशिष्ट मूल्यांबद्दलची निष्ठा दिसून येते। केवळ रंभोरू, नितंबिनी, इत्यादी शब्दांनी स्त्रीचे वर्णन करणारा संस्कृत कवी, पतीचे पाय म्हणजे स्वर्ग असे मानणाऱ्या सिंधूला निर्माण करणारे गडकरी, रमणीच्या दशर्नाने भयचकित व नतमस्तक झालेले तांबे, स्त्रीला पुरूषाइतके-विंढबहुना पुरूषापेक्षा जास्त-स्वातंत्र्य देणारे माधवराव पटवर्धन, आत्मप्रतिष्ठेसाठी घर सोडणाऱ्या नोराला जन्म देणारा इब्सेन आणि जवळजवळ अशाच परिस्थितीतल्या भानुमतीला दारातून परवतून कुलवधू ठरवणारे रांगणेकर यांच्यातील भेद हे जीवनमूल्यांमधीलच भेद आहेत। या मूल्यांची पाळेमुळे वर्गीय संस्कृतीत सापडण्याची शवमयता आहे। पण वर्गनिष्ठेविषयीचा मावमर्सवादी आग्रह जरी सोडला तरी मूल्यनिष्ठेविषयीचा आग्रह सोडण्याचे कारण नाही। जीवनवादी सौंदर्यशास्त्रज्ञांना कलेतील हीच मूल्यनिष्ठा आfभप्रेत असते। मानवी जीवनाविषयीच्या प्रत्येक गंभीर वाङ्मयीन चित्रणात विशिष्ट जीवननिष्ठा अनुस्यूत असणे अपरिहार्यच आहे। वाङ्मयात नेतिकता असणे अपरिहार्य आहे असे सात्रर्सारखे आfस्तत्ववादीदेखील मानतात। सात्रर्ने आपली जीवननिष्ठ भूमिका व्हाॅट ईज लिटरेचर? या आपल्या पुस्तकामध्ये फार स्पष्टपणे मांडली आहे। या पुस्तकाच्या अगदी सुरूवातीला सात्रर्ने वाङ्मय व चित्रकलेसारख्या इतर कला यांच्यातील भेद स्पष्ट केला आहे। त्याच्या मते चित्रकार विंढवा गायक आपल्या माध्यमाकडे भाषा म्हणून पाहत नाही। चित्रकाराचा अर्थ त्याच्या माध्यमात देहीभूत होतो; विशिष्ट रंगरेषांशी तो अर्थ पूर्णपणे एकरूप झालेला असतो; तो अर्थ त्या माध्यमातून व्यक्त होत नाही। चित्रकार अर्थाची प्रतीके निर्माण करीत नाही, अर्थयुक्त वस्तू निर्माण करतो।101 गद्य लेखकाप्रमाणे कवीदेखील एका अर्थाने भाषेच्याच माध्यमात कलाकृती निर्माण करीत असला तरी त्या दोघांमध्ये जमीनअस्मानाचा फरक आहे। कवी जे निर्माण करतो ते चित्र, पुतळा, गाणे इत्यादींच्या वर्गात मोडते।102 कवी भाषेत अर्थयुक्त वस्तू निर्माण करतो; गद्य लेखक अर्थ सांगण्यासाठी, काहीतरी घडवून आणण्यासाठी भाषा वापरतो। म्हणून तू का लिहितोस? असा प्रया> गद्य लेखकाला विचारणे योग्य ठरते। लेखन करणे विंढवा बोलणे म्हणजे काहीतरी कृती करणे।103 या कृतीचे स्वरूप कशावर तरी प्रकाश टाकणे, काहीतरी दाखविणे हे असते। लेखक मानवी जगावर प्रकाश टाकतो कारण त्याला ते बदलायचे असते। तो मानवाचे जे चित्र काढतो ते अर्थातच निःपक्षपाती नसते; मानवाचे निःपक्षपाती चित्र ईश्वरसुद्धा काढू शकणार नाही।104 सात्रर्चा आfभप्राय असा असावा की लेखक जर जग बदलण्याकरिता जगावर प्रकाश टाकीत असेल तर त्याने आपली नेतिक निवड केलेली आहे असे मानायला हवे। म्हणजे जीवनातील काही गोष्टी त्याने नाकारल्या आहेत आणि काही श्रेयस्कर म्हणून स्वीकारल्या आहेत; आणि या श्रेयस्कर गोष्टींच्या अनुरोधानेच तो जग बदलू पाहतो आहे। असे असल्यामुळे त्याचे चित्रण निःपक्षपाती असणेच शवमय नाही। लेखन करणे ही एक व्यवहारात्मक कृती (ज्raxग्े) असून लेखन करायचे ठरविण्यात एक नेतिक निवड अनुस्यूत असते। नेतिक निवड करताना माझ्यासारखी निवड सर्व मानवजातीने केली तर काय परिणाम होतील? हा प्रया> स्वतःला विचारायचा असतो। असाच एक प्रया> लेखकाने स्वतःला विचारायला हवा। तो प्रया> म्हणजे मी जे लिहितो आहे, ते सर्वांनी वाचले तर काय परिणाम होतील?105 लेखक इतरांना जगाचे दशर्न घडवितो आणि या जगाविषयी त्यांची जी जबाबदारी असते तिची त्यांना तो जाणीव करून देतो। माणसाने एकदा भाषेचा हा उपयोग करायला सुरूवात केली की त्यातून सुटका नाही। तो गप्प बसला तरीही ते भाषणच ठरते। व्यवहारात्मक पातळीवर कृती न करणे हीसुद्धा जशी कृती ठरते, तसे न बोलणे हेसुद्धा भाषण ठरते। त्यालाही नेतिक अर्थ असतो।106 वाङ्मय हे लेखक व वाचक यांच्या सहकार्यावर अवलंबून असते। हे सहकार्य नसेल तर वाङ्मयकृती म्हणजे कागदावर काढलेले फराटे असे होईल। लेखक लिहितो ते वाचकांसाठी, आपण जे लिहिले आहे ते वाचकांनी मनाने जिवंत करावे म्हणून। लेखकाला आfभप्रेत असलेला अर्थ भाषेच्या द्वारा दिला जातो, तो भाषेत देहीभूत झालेला नसतो। लेखकाने जे लिहिले आहे त्याच्या मदतीने वाचकाने तो अर्थ निर्माण करायचा असतो।107 अशी निर्मिती करणारा वाचक नसेल तर वाङ्मयकृती आfस्तत्वात येणार नाही। लेखक वाचकाला एक आवाहन करीत असतो। लेखकाने जे जीवनदशर्न निर्माण केले त्याला वाचकाच्या मदतीशिवाय वस्तुगतता येणार नसल्यामुळे, वाचकाने आपल्याला सहकार्य द्यावे, असे आवाहन लेखक करतो। खरे म्हणजे ते वाचकाच्या स्वातंत्र्यालाच केलेले आवाहन असते; कारण वाचकाने उत्स्फूतपणे लेखकाला सहकार्य द्यायचे असते।108 लेखकाने स्वतःच्या स्वातंत्र्याप्रमाणे वाचकाच्या स्वातंत्र्याचीही जपणूक केली पाहिजे। स्वातंत्र्य हा वाङ्मयाचा पाया असल्यामुळे वाङ्मयनिर्मिती ही एक स्वातंत्र्यावर आधारलेली नेतिक कृती ठरते। कादंबरीकार आपल्याला जगाचे दशर्न घडवितो आणि आपल्याच मदतीने या दशर्नाला वस्तुगतता येते। हे दशर्न केव्हा प्रत्ययकारी होईल? जग बदलविण्याच्या इच्छेने कृती करीत असताना आपण जेव्हा जग बघतो तेव्हाच जगाचे स्वरूप, आणि आपलेही स्वरूप, आपल्याला उमगते। जीवनदशर्न प्रत्ययकारी करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे कृतिप्रवण असणे।109 स्वातंत्र्य हा कादंबरीचा पाया आहे आणि या स्वातंत्र्याची कक्षा वाढवी हाच कादंबरीचा उद्देश असतो। कादंबरीकाराच्या जगात द्वेष असेल, पण तो स्वातंत्र्याच्या इच्छेचा आविष्कार म्हणून तेथे येईल। उदाहरणार्थ, एखाद्या निग्रोने गोऱ्या लोकांवर आग ओकणारी कादंबरी लिहिली तर ती निग्रो लोकांच्या स्वातंत्र्येच्छेचा आविष्कार ठरते। ही कादंबरी जो कोणी वाचतो तो जुलूम करणाऱ्या गोऱ्या लोकांच्या भूमिकेशी तादात्म्य पावू शकत नाही। तो वाचक स्वतः जरी गोरा असला तरी काळया लोकांच्या बाजूनेच उभा राहतो। म्हणून अन्यायाची तरफदारी करणारी चांगली कादंबरी लिहिली जाऊ शकत नाही। कोणाच्याही स्वातंत्र्याविरूद्ध असणे हे कादंबरीच्या, आणि एकूण वाङ्मयाच्या, स्वाभावाविरूद्ध आहे। एखादा लोहार फॅसिस्ट झाला, तर त्याच्या जीवनावर त्या स्वातंत्र्यविरोधी तत्त्वज्ञानाचा परिणाम होईल; पण त्यामुळे त्याच्या लोहारकामातील कौशल्यावर परिणाम घडायचे कारण नाही। पण जर एखादा कलावंत फॅसिस्ट झाला तर त्याचे वेयक्तिक जीवनच फक्त विकृत होईल असे नाही; त्याची कलाही विकृत होईल। तो लेखक म्हणून संपेल।110 स्वातंत्र्य ही प्रत्येक लेखकाची, लेखक म्हणून, सर्वाच्च जीवननिष्ठा असते। पण याचा अर्थ असा नव्हे की लेखकाने स्वातंत्र्याच्या अमूर्त संकल्पनेचा जयघोष करायचा असतो। लेखकासमोर अमूर्त मानवाचे अमूर्त स्वातंत्र्य नसते; लेखक लिहितो तो त्याच्या समकालीनांसाठी, त्याच्या परिस्थितीतल्या, समाजातल्या, वर्गातल्या लोकांसाठी लिहितो। तो विशिष्ट परिस्थितीतल्या विशिष्ट स्वातंत्र्याविषयी लिहितो।111 याआधी आपण ज्या मतांचा विचार केला त्यांच्यात व सात्रर्च्या मतांत पुष्कळ बाबतींत साम्य असले तरी एका बाबतीत महत्त्वाचा भेद आहे। चांगल्या वाङ्मयाला नेतिकतेचे अंग अपरिहार्यपणे असते या मुद्दयावर या विचारवंतांमध्ये एकवावमयता आहे। पण सात्रर् ही नेतिकता केवळ वाङ्मयापुरती मर्यादित ठेवतो; ती संगीतातही आहे असे प्लेटोप्रमाणे म्हणत नाही। सकृद्दशर्नी प्लेटोपेक्षा सात्रर्चे म्हणणे जास्त पटण्यासारखे वाटते। ख्याल काही नेतिकदृष्टया चांगला विंढवा वाईट असू शकत नाही; म्हणून ख्यालाचे नेतिक मूल्यमापन होऊ शकणार नाही। जिच्यात अर्थाला जवळजवळ मुळीच स्थान वा महत्त्व नाही अशी ध्वनिरचना न-नेतिकच (a स्दraत्) म्हणावी लागेल। पण ज्या संगीतात अर्थाला प्राधान्य आहे, ज्याचे भावनात्मक परिणाम घडू शकतात, अशा संगीताचे मात्र नेतिक मूल्यमापन होऊ शकेल। धीरगंभीर संगीत हे छचोर, भावविवश व लेंगिकतेला आवाहन करणाऱ्या संगीतापेक्षा नेतिकदृष्टया आfधक चांगले आहे असे जर कोणी म्हटले तर ते बरोबरच ठरेल। नेतिकतेच्या दृष्टीने संगीताचे आणखीही एका प्रकारे मूल्यमापन करता येते। तीन मिनिटांची तबकडी ऐकण्यापेक्षा एक तासाचा ख्याल ऐकणे चांगले, असे नेतिक कारणासाठी म्हणता येईल। ज्याला तीन मिनिटांच्या तबकडीपेक्षा जास्त काहीही नको असते, त्याच्या व्यक्तित्वातच काही उणिवा असतात ख्याल ऐकण्यासाठी श्रम, अभ्यास, चिकाटी, कठीण गोष्टी हाताळण्याची व त्यात आनंद मानण्याची कुवत, इत्यादी गुण लागतात। तीन मिनिटांच्या तबकडीवर खूष असलेल्या माणसाला ख्यालासारखी कोणतीच गोष्ट बहुधा आवडत नाही व हाताळताही येत नाही। वर उल्लेखिलेले गुण मूल्ययुक्त व भरगच्च जीवन जगण्यासाठी आवश्यक असतात। अर्थात हे खरे की वरील गुणांना व्यक्तित्वाच्या मूल्यमापनात जरी स्थान दिले जाते तरी त्यांना नेतिक गुण म्हणण्यात येतेच असे नाही। आतापर्यंत आपण अर्थरहित संगीताच्या संदर्भात नेतिक संकल्पना वापरणे कितपत उचित आहे ते पाहिले। अर्थयुक्त संगीताची गोष्ट निराळी आहे; त्याचे मूल्यमापन करताना ज्या गोष्टींचा उल्लेख आपण करतो त्यांना नेतिक म्हणायला लोक बहुधा तयार होतील असे वाटते। उदाहरणार्थ, लचोर संगीत वाईट असते। या मूल्यविधानाला नेतिक पाया आहे, हे सर्वांना पटेल। वाङ्मयात अर्थाला प्राधान्य मिळत असल्यामुळे त्यात नेतिकतेला पुष्कळ महत्त्व मिळणे स्वाभाविक आहे। सात्रर्ने गद्य वाङ्मय व काव्य यांच्यात जो भेद किल्पला आहे तो अनेक कवितांच्या संदर्भात लागू पडत नाही। उदाहरणार्थ, टिळकांचे वनवासी फूल, केशवसुतांची तुतारी, माधवराव पटवर्धनांचे सुधारक, आfनलांचे प्रेम आणि जीवन या सर्व कविता आहेत; पण त्यांच्यात नेतिकता आहे, इतकेच नव्हे, तर या नेतिकतेमुळेच त्या महत्त्वाच्या मानल्या जातात। तेव्हा काव्याबद्दलचा सात्रर्चा सिद्धान्त आहे तशा स्वरूपात स्वीकार्य ठरत नाही। गद्य वाङ्मयाप्रमाणेच नेतिकतेचे अंग असते, असे मानावे लागते। नेतिकतेची कक्षा पुष्कळ विस्तृत असली, आपण करीत असलेल्या बहुतेक गोष्टींना नेतिकतेचे अंग असले, तरी आपल्याला या नेतिकतेची नेहमीच स्पष्ट जाणीव असते, असे नाही। जीवनातील प्रया> नेतिक आहेत हे फक्त काही संदर्भांतच जाणवते। त्यांतला सर्वांना परिचित असलेला संदर्भ म्हणजे स्त्रीपुरूषसंबंधाचा। या विषयाबाबत प्रत्येक समाजाचे साचेबंद दृष्टिकोण असतात। त्यांना धवमका पोचेल अशी कोणतीही गोष्ट अनेतिक समजली जाते। कलेच्या क्षेत्रात कलाकृतींच्या अनेतिकतेबद्दल नेहमीच वाद होत असतात। तसेच वाद कलाकृतींतल्या अयलीलतेविषयीही होतात। एखाद्या नाटकाविषयी असा वाद झाला म्हणजे नाटककार व त्याचे चाहते या नाटकाकडे एक कलाकृती म्हणून पाहा; निकोप कलादृष्टीने पाहिल्यास या नाटकात काहीही वाईट नाही। अशी भूमिका घेतात। पण यामुळे असा गेरसमज होतो की कलाकृतीकडे एक न-नेतिक गोष्ट म्हणून पाहायचे असते। पण मानवी जीवनाचे चित्रण करताना, समाजाच्या साचेबंद नेतिक मूल्यांवर हल्ला करताना, समाजपुरूषाच्या डोळयांवरील झापडे काढून टाकताना,-थोडवमयात म्हणजे, समाजाच्या दृष्टिकोणात बदल घडवून आणतानादेखील-या नाटककारांना व त्यांच्या समर्थकांना अलौकितावादाची ढाल वापरावीशी वाटावी यात वाङ्मकलेच्या स्वरूपाविषयीचा एक मोठा गेरसमज दडलेला आहे। विश्वचेतन्यवादी सौंदर्यशास्त्राचा आपल्यावर इतका जबरदस्त पगडा आहे की जी गोष्ट उघड उघड नेतिक क्षेत्रात बसते तिच्याकडेसुद्धा न-नेतिक दृष्टिकोणातून पाहा, असे आपण सांगू लागतो। पण ही आत्मवंचना थांबवायला हवी। अयलील व बीभत्स समजले जाणारे वाङ्मय अनेकदा समाजाच्या रूढ नीतिकल्पनांना दिलेले एक आव्हान असते। हे आव्हान नेतिक असते; त्याला न-नेतिकतेची पुटे दिल्यामुळे त्याचा जोर कमी होईल आणि वाङ्मयाच्या चांगलेपणाविषयीचा आपली जाण विकृत होईल। ज्यात जीवनार्थाचा आशय नाही असे संगीत, चित्र, शिल्प हे न-नेतिक व म्हणून अलौकिक होऊ शकते। पण वाङ्मय मात्र न-नेतिक होऊ शकत नाही। नेतिकतेच्या व्यापक अर्थाने वाङ्मय नेतिकच असते। तसे म्हणणे हा त्याचा स्वभाव आहे। सर्व कलांमध्ये एकच समान सत्त्व असते या भोळया कल्पनेसाठी वाङ्मयाच्या या स्वभावाचा बळी देणे योग्य नव्हे। ही चर्चा संपविण्यापूर्वी एका गोष्टीचा खुलासा करणे आवश्यक आहे। वाङ्मयात नेतिकता अपरिहार्यपणे असते याचा अर्थ प्रत्येक वाङ्मयकृती कोणता तरी एखादा नेतिक प्रया> सोडविते असा नाही। काही वाङ्मयकृती विशिष्ट नेतिक प्रया> सोडवितात हे खरे (उदाहरणार्थ, इब्सेनचे डाॅल्स हाऊस हे नाटक); पण काही वाङ्मयकृती नेतिक प्रया> सोडवीत नाहीत; त्या आपल्यापुढे नेतिक प्रया> केवळ मांडतात। त्यामुळे जीवनातील काही प्रया>ांची आपल्याला प्रथमच जाण येते। पण काही वेळा आपल्याला आपल्या नेतिक प्रया>ांची जाण असते आणि ते आपण सोडविले आहेत असेही वाटत असते। अशा ठिकाणी वाङ्मयीन कलावंताचे काम आपली जाण जास्त सखोल करणे हे असते। वस्तुस्थितीचे जे अंग आपल्याला दिसले नव्हते त्याचे प्रत्ययकारी दशर्न तो घडवितो; प्रया>ांकडे नव्या दृष्टीने पाहायला लावतो। आपण आपले नेतिक प्रया> सोडविले आहेत असा जो आपला भोळा विश्वास असतो, त्याला लेखक धवमका देतो। वाङ्मय जीवनाचे दशर्न घडवते असे आपण म्हणतो। या जीवनदशर्नाला नेतिकतेचे अंग असते हेही आपण लक्षात ठेवले पाहिजे। आणखी एका मुद्दयाकडे वाचकाचे लक्ष वेधणे आवश्यक आहे। मावमर्सवादी व सात्रर्सारखे आfस्तत्ववादी असे मानतात की माणसाची प्रत्येक कृती नेतिक असते आणि तिच्या बाबतीत नेतिक इष्टानिष्टतेचे प्रया> उपस्थित करणे आवश्यक असते। ज्या वेळी समाज विंढवा व्यक्ती यांच्या जीवनात फार महत्त्वाचे प्रया> उपस्थित होतात तेव्हा प्रत्येक मानवी कृतीला नेतिक कृतीला नेतिक अर्थ अपरिहार्यपणे येतो। उदाहरणार्थ, भूमिगत होऊन नाझींचा पाडाव करणाऱ्या प्रेंढच गनिमी सेनिकांच्या जीवनातील प्रत्येक क्षण हा नेतिक परीक्षेचा क्षण झाला असल्यास नवल नाही। पण आपल्या सर्वांच्या जीवनातला प्रत्येक क्षण असा सत्त्वपरीक्षेचा क्षण नसतो। त्यामुळे निदान काही क्षण आपण न-नेतिक मनोरंजनासाठी घालवून शकतो। या विश्रांतीच्या काळासाठी लिहिलेले वाङ्मय-उदाहरणार्थ, वुडहाउसचे कथावाङ्मय-न नेतिक म्हणावे लागेल। क्रोचेने व्यवहारात्मक अंगाचे न-नेतिक व्यवहारात्मकता व नेतिकता यांच्यात जे विभाजन केले आहे ते येथे उपयुक्त ठरेल। वुडहाउसच्या कादंबऱ्या, लाॅरेल हार्डीचे चित्रपट, सर्कशीचे खेळ, इत्यादी मनोरंजनाचे प्रकार न-नेतिक व्यवहारात्मकतेत मोडतात। कारण बोलूनचालून विश्रांतीच्या वेळीच आस्वाद घेता यावा म्हणून या गोष्टी निर्माण झालेल्या असतात। त्यांना नेतिकतेची बाजू नसते। यावर मावमर्सवादी असे म्हणू शकतील की जीवनाच्या मुख्य प्रया>ांवरचे आपले चित्त विचलित करण्यासाठीच या गोष्टी निर्माण झालेल्या असतात। त्या न नेतिक नसून अनेतिक-कारण क्रांतिविरोधी-असतात। पण ही आfतरेकी विचारसरणी झाली। आपण इतके मात्र निश्चित म्हणू शकू की कलाकृती जीवनाला जितवमया जास्त गंभीरपणे सामोरी जाते तितकी तिच्यातली नेतिक बाजू महत्त्वाची होत जाते।