Resource Center For Indian Language Technology Solution

सौंदर्यविधानाचे स्वरूप ः एक । 2

2।1
गेल्या प्रकरणात आपण असे पाहिले की सौंदर्यशास्त्राची प्रमुख उद्िष्टे पुढील आहेत ः (1) समीक्षेत वापरण्यात येणाऱ्या संकल्पनांची व विधानांची तार्किक वेशिष्टये शोधून त्यांचा एक नकाशा तयार करणे, आणि (2) समीक्षेत अस्फुट विंढवा अर्धस्फुट स्वरूपांत असलेल्या सौंदर्यविषयक जाणिवांना तार्किक स्पष्टता प्राप्त करून देणे। सौंदर्यशास्त्राच्या उद्िष्टांबद्दलची ही जाणीव नवी नाही। उदाहरणार्थ, कांटने सौंदर्यविधानाच्या तार्किक वेशिष्टयांची फार मूलगामी चर्चा केली असल्याचे दिसते। दुसऱ्या उद्िष्टाची जाणीव पारंपरिक सौंदर्यशास्त्रज्ञांना होती यालाही पुष्कळ आधार मिळतो। त्यांनीही समीक्षेतील अर्धस्फुट जाणिवांना स्पष्टता देण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते। यासाठी आॅझ्बर्न व कॅरिट यांची उदाहरणे देता येतील।1 आॅझ्बर्नने आपल्या इस्थेटिवमस अँड क्रिटिसिझम या पुस्तकाच्या दुसऱ्या प्रकरणात आपले उद्िष्ट व पद्धती स्पष्ट केली आहे। तो असे मानतो की (1) सौंदर्यशास्त्र तत्त्वज्ञानाची शाखा आहे। जेव्हा आपण सौंदर्याविषयी बोलतो तेव्हा त्या बोलण्याचा अर्थ काय आहे याचा शोध घेणे हे सौंदर्यशास्त्राचे प्रमुख कार्य आहे। (2) कलाकृतींविषयी बोलताना वा लिहिताना सामान्य माणूस व विशेषतः कलासमीक्षक जी भाषा, ज्या संज्ञा, ज्या संकल्पना व जे निकष वापरतो त्यांच्याकडे सौंदर्यशास्त्राने लक्ष पुरविणे अगत्याचे आहे। (3) पण समीक्षकांना या संकल्पनांची व निकषांची स्पष्ट जाणीव नसल्याने समीक्षाव्यापारात गोंधळ उडतो। (4) या संकल्पनांना व निकषांना स्पष्टता प्राप्त करून देणे, त्यांतील कोणता निकष सर्वंकष आहे हे तपासणे, त्याचे स्वरूप स्पष्टपणे मांडणे हे सौंदर्यशास्त्राचे प्रमुख कार्य आहे। टीकाव्यवहाराला आपल्या स्वतःच्या रूपाची जाणीव करून देणे, त्याला नीटनेटकेपणा व नेमकेपणा प्राप्त करून देणे हे सौंदर्यशास्त्राचे ध्येय होय।2 कलाकृतींमध्ये विशिष्ट प्रकारचे रचनातत्त्व असते असे त्याने प्रतिपादन केले आहे। पण ज्या अर्थाने प्राकृतिक विज्ञानांतील (हaूल्raत् ेम्गहमे) शोध नवा असतो त्या अर्थाने आॅझ्बर्नचा हा शोध नवा नाही; खरे म्हणजे त्या अर्थाने हा शोधच नव्हे। कलावंतांच्या, टीकाकारांच्या व रसिकांच्या मनात रचनातत्त्वाची जाणीव होतीच; अगदी पुरातन कालापासून ही जाणीव होती। कांटनंतर या जाणिवेला स्पष्टता येत चालली; आणि बेल, फ्राय, आॅझ्बर्न यांनी तिला युयुत्सू वृत्तीने प्रस्थापित केले। ती अशी प्रस्थापित होऊ शकली, कारण कलावंतांमध्ये-विशेषतः दृश्य कलांच्या क्षेत्रातील कलावंतांमध्ये-ही जाणीव फार बलवान झालेली होती। जी कलाजाणीव लोकमानसात अस्पष्टपणे वास करीत होती तिलाच आॅझ्बर्नने स्पष्ट स्वरूपात मांडले आहे असे यावरून दिसते। दुसरे उदाहरण कॅरिटचे। त्याने तर आपल्या आविष्कारवादाची (Exज्rोग्दहग्ेस्) पाळेमुळे पुरातन काळापासून सौंदर्यविचारात होती असे स्पष्टपणे दाखविले आहे।3 संस्कृत काव्यशास्त्रात आनंदवर्धनाने ध्वनिसिद्धान्त मांडताना तो पूर्वापार चालत आलेल्या परंपरेतच होता असे प्रतिपादन केले आहे।4 असे लिहिताना परंपरेला चिकटून राहण्याची भारतीयांची आवड त्याच्या मनात होती इतकेच नव्हे; लोकमानसात ज्या तत्त्वाची अस्पष्ट जाणीव होती ते तत्त्व आपण स्पष्ट स्वरूपात मांडत आहोत असा असा त्याचा दावा होता। आणि सौंदर्यशास्त्राचे स्वरूप पाहता, त्याने असे म्हणणे योग्यच होते।
2।2
सौंदर्यशास्त्रात शोध लागत नाहीत असे नाही। हे शोध आशयविषयक असतात विंढवा आकारविषयक असतात। आकारविषयक शोध लागणे म्हणजे प्रस्तुत असलेल्या संकल्पनांचा नवा नकाशा मिळणे, त्यांच्यातील परस्परसंबंधांबद्दल, त्यांच्या तार्किक वेशिष्टयांबद्दल नवीन जाण येणे। आशयविषयक शोध लागणे म्हणजे नवीन सौंदर्यसिद्धान्त सापडणे। येथे आपल्याला आशयविषयक शोधच प्रस्तुत आहेत। या शोधांचे स्वरूप प्राकृतिक विज्ञानांतील शोधांपेक्षा निराळे आहे। हे शोध संकल्पनांची मर्यादा कोठे आखणे योग्य आहे याबद्दलचे असतात। रसिकमानसात व्यामिश्र संकल्पनाव्यूह असतो। त्यातील कोणत्या भागावर जोर द्यायचा ते या शोधांमुळे ठरते। निराळया शब्दांत हीच गोष्ट सांगायची तर असे म्हणता येईल ः सुंदर वस्तू व कलाकृती यांचे स्वरूप व्यामिश्र असते। विशिष्ट कालखंडात विशिष्ट बाजूंवर भर देऊन कलाकृतींची निर्मिती होते व आस्वाद घेतला जातो। त्या त्या कालखंडात कला म्हणजे ती ती विशिष्ट बाजू असे समीकरण प्रस्थापित होते। ज्या बाजूवर पूर्वी भर दिला गेला नव्हता तिचे महत्त्व जाणवणे व तिच्यावर जोर देणे म्हणजे एका अर्थाने शोध लावणे होय। पण जी गोष्ट पूर्वी आfजबात माहित नव्हती ती शोधली जाणे असे या शोधाचे स्वरूप नसते। जी गोष्ट अस्पष्टपणे जाणविली होती, जिला प्रमुख स्थान दिले गेले नव्हते, तिला स्पष्टता व नवे महत्त्व देणे हे या शोधाचे प्रमुख कार्य असते। कलाजाणिवेतील क्रांती म्हणजे सनातनाचेच पुनर्दशर्न होय। याचा अर्थ असा नव्हे की, कलेच्या इतिहासात काही नवे घडतच नाही। सनातन तत्त्वेच नव्या संदर्भात नवी दिसू लागतात। हे नावीन्य कमी महत्त्वाचे नव्हे।
2।3
सोयीसाठी संकल्पनांच्या दोन बाजू वेगळया काढता येतात हे आपण पाहिले आहे ः (1) संकल्पनांचे तार्किक विशेष, (2) संकल्पनांचा आशय। सौंदर्य ही संकल्पना उदाहरणादाखल घेऊ। ही संकल्पना कोणत्या जातीतली आहे, ती सावयव आहे की निरवयव, सौंदर्य नावाचा गुण आfस्तत्वात असतो काय, असल्यास तो इंद्रियगोचर आहे का,-इत्यादी प्रया> पहिल्या बाजूबद्दलचे प्रया> आहेत। सौंदर्याचा निकष कोणता, अनेक निकष असतील तर त्यांतला सर्वांत योग्य निकष कोणता, इत्यादि प्रया> दुसऱ्या बाजूविषयीचे प्रया> आहेत। संकल्पना विधानांमध्ये अवतरतात। विधानांच्या विचारातही वरच्याप्रमाणे दोन बाजू दाखविता येतात। सौदर्यविधानाची जात कोणती, ते वर्णनपर असते का, नसल्यास त्याचे कार्य काय, सौंदर्यविधानाचे खंडनमंडन करता येते का, त्यासाठी वापरलेल्या पुराव्याचा व सौंदर्यविधानाचा संबंध काय, - इत्यादी प्रया> पहिल्या बाजूविषयीचे प्रया> आहेत आणि सौंदर्यविधानांच्या समर्थनासाठी नवमकी कोणता पुरावा वापरला जातो, त्यात तारतम्य कसे करायचे, इत्यादी प्रया> दुसऱ्या बाजूविषयीचे प्रया> आहेत। या दोन बाजूंची केवळ सोयीसाठी आणि विशिष्ट मर्यादेपर्यंतच फारकत करता येते। त्यांच्यातील संबंध खरे म्हणजे अतूट आहे। त्यांच्यापेकी कोणत्याही एका बाजूचा समाधानकारक विचार करायचा असेल तर दुसऱ्या बाजूचे वियलेषण करणे आवश्यक ठरते।
2।4
पहिल्या गटातील एका प्रया>ाच्या विचाराने मी विवेचनाला सुरूवात करणार आहे। हा प्रया> प्रथम निवडण्याचे कारण असे की तो जर आपण सोडवू शकलो नाही तर सौंदर्यशास्त्राची इमारतच उभी राहू शकणार नाही नुसते सौंदर्यशास्त्रच नव्हे तर एकूण टीकाव्यापारच अशवमय होईल। विधानाविषयी विचार करताना आपण त्याची जात ठरवतो। ते विधान एखाद्या वर्गातील सर्व गोष्टींविषयी आहे की त्यातील काहींविषयी, की केवळ एखाद्या गोष्टीविषयी आहे, हे आपण विचारतो। सर्व माणसे मत्र्य असतात। हे विधान मानव या वर्गातील सर्व व्यक्तींबाबतचे विधान आहे। उलट, साॅव्रेढटिस मत्र्य आहे। हे विधान विशिष्ट व्यक्तीविषयीचे विधान आहे। विज्ञानातील विधाने प्रायः वर्गाविषयीची असतात, विशिष्ट व्यक्तींबद्दलची नसतात। ( उदाहरणार्थ, सर्व आम्ले लिटमस पेपरचा रंग बदलवतात। ) नीतिविधानेही प्रामुख्याने वर्गाविषयी असतात। ( उदाहरणार्थ, खून करणे पाप आहे। ) वेज्ञानिक विधाने व नीतिविधाने व्यक्तींविषयी नसतातच असा याचा अर्थ नव्हे। ती विधाने विशिष्ट गोष्टींबद्दलचीही असू शकतात हे निश्चित। ( उदाहरणार्थ, या बाटलीतल्या आम्लामुळे या लिटमस पेपरचा रंग बदलला।; मॅवमबेथने डंकनचा खून केला हे पापी दुष्कृत्य झाले। ) लक्षात ठेवायचा मुद्दा इतकाच की वेज्ञानिक विधाने व नीतिविधाने वर्गाविषयी असू शकतात, आणि ती अशी असू शकतात व बव्हंशी अशी असतात याला विज्ञानात व नीतिव्यवहारात फार महत्त्व आहे। वेज्ञानिक हा घटनांचा अर्थ लावीत असतो; म्हणजेच पर्यायाने त्या घटनांचा सार्वत्रिक सृष्टिनियमांशी असलेला संबंध तो स्पष्ट करीत असतो। विशिष्ट घटनांचा अर्थ लावणारे वेज्ञानिक विधान सृष्टिनियमांबद्दलच्या सामान्य विधानांवर अवलंबून असते हे यावरून स्पष्ट होईल। नीतिविधानांच्या बाबतीतही हीच गोष्ट खरी आहे। व्यक्तिविषयक नीतिविधानांचे समर्थन आपण कसे करतो हे पाहिले तर हे स्पष्ट होईल। उदाहरणार्थ, मॅवमबेथने केलेला डंकनचा खून हे पापी दुष्कृत्य आहे। कशावरून? तर सर्वच खून पापी दुष्कृत्ये असतात म्हणून। व्यक्तिविषयक नीतिविधानांचे समर्थन सर्वंकष अशा नीतिविधानांमुळेच शवमय होते। आपल्याला यापुढे जाऊन असेही म्हणता येईल की, विज्ञानाचा व नीतिविचाराचा रोख त्या त्या क्षेत्रातील सामान्य, सर्वंकष नियम शोधण्याकडेच असतो। वरील विवेचनाचा सारांश असा की, विज्ञानात व नीतिव्यवहारात सर्वंकष, सार्वत्रिक विधाने शवमय असतात। इतकेच नव्हे तर तशी विधाने असणे अगत्याचे असते। परंतु सौंदर्यविधानाचे एक वेशिष्टय म्हणून असे सांगण्यात येते की ते व्यविमतविषयकच असते; एखाद्या वर्गातील सर्व गोष्टींना लागू पडेल असे सामान्य सौंदर्यविधान संभवतच नाही। आfजंठयातील सर्व चित्रे सुंदर आहेत। असे आपण म्हणतो हे खरे। परंतु या विधानात सर्व हा शब्द जरी आलेला असला तरी विज्ञानातील सामान्य विधानासारखे हे विधान नव्हे। सर्व आम्ले लिटमस पेपरचा रंग बदलवतात। हे विधान आम्ले हा वर्ग व लिटमस पेपरचा रंग बदलविण्याची शक्ती यांमधील नित्यसंबंध दाखविते। सर्व आम्लांत अ, आ, इ, हे गुणविशेष आहेत असे समजू। अ, आ, इ या गुणसमुच्चयात व लिटमस पेपरचा रंग बदलविण्याच्या गुणविशेषात जो नित्यसंबंध असतो तोच संबंध वरील विधानाद्वारे व्यक्त होतो। पण आfजंठयात असणे व सुंदर असणे यांच्यात नित्यसंबंध नाही। म्हणून आfजंठयातील सर्व चित्रे सुंदर आहेत। असे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ती चित्रे आfजंठयात आहेत म्हणून सुंदर आहेत। असे आपल्याला म्हणायचे नसते। घर नंबर 12 मधील सर्व माणसे नोकरी करतात। हे विधान व आfजंठयातील सर्व चित्रे सुंदर आहेत। हे विधान ही एकांच प्रकारची विधाने आहेत। एखाद्या वर्गाविषयीचे सौंदर्यविधान केव्हा शवमय होईल? त्या वर्गातील सर्व गोष्टींत अ, आ, इ हे गुणविशेष आहेत असे समजू। जर अ, आ, इ या गुणांमध्ये व सौंदर्यात नित्यसंबंध आहे असे सिद्ध करता आले तर अ, आ, इ या गुणांनी युक्त असलेल्या गोष्टींच्या संपूर्ण वर्गाविषयी सौंदर्यविधान करता येईल आणि एखादी गोष्ट ती या वर्गात मोडते म्हणून सुंदर आहे असेही म्हणता येईल। परंतु असे सार्वत्रिक सौंदर्यविधान असते ही गोष्ट कित्येक नामवंत सौंदर्यशास्त्रज्ञांनी नाकारली आहे। त्यांच्यातील सर्वांत महत्त्वाचा सौंदर्यशास्त्रज्ञ म्हणजे कांट। कांटने या मुद्दयाची चर्चा क्रिटिक आॅफ जजमेंट या ग्रंथामधील Aहaत्ब्ूग्म् दf ूप ँाaल्ूग्fल्त्, श्दसहू 2 या अंगामध्ये केली आहे। त्याचे म्हणणे थोडवमयात असे मांडता येईल। तो म्हणतो, ऊप ंाaल्ूग्fल्त् ग्े ूप्aू ेप्ग्म्प् aज्arू frदस् conमज्ूे, ग्े rाज्rोाहूा् aे ूप दंराम्ू दf a ल्हग्नrेaत् ्ात्ग्ुप्ू।5 ( सौंदर्य हे संकल्पनांच्या मदतीशिवाय सार्वत्रिक आनंदाचा विषय होते। ) एखाद्या वस्तूविषयी केलेले सौंदर्यविधान ती वस्तू एक विशिष्ट प्रकारचे समाधान देते असे सांगते; या समाधानाचे वेशिष्टय असे की ते सार्वत्रिक असते। इतर प्रकारच्या समाधानाबद्दल असे म्हणता येतेच असे नाही। उदाहरणार्थ, गोड पदार्थाने एकास समाधान मिळेल, पण दुसऱ्यास मिळेलच असे नाही। जेव्हा आपण एखाद्या वस्तूस सुंदर म्हणतो तेव्हा आपला असा दावा असतो की, ती वस्तू सार्वत्रिक समाधानाचा विषय आहे। एकास खरे ते इतर सर्वांस खरे असलेच पाहिजे असा दावा आपण केवळ सौंदर्यविधानाबद्दलच करतो असे नाही। ज्ञानविधान व नीतिविधान यांनासुद्धा सर्वमान्यता असते। पण या दोहोंत व सौंदर्यविधानात एक महत्त्वाचा भेद असा आहे की त्यांच्यात संकल्पनांचा उपयोग केलेला असतो, पण सौदर्यविधानात मात्र संकल्पना नसतात। उदाहरणार्थ, अ हे ब चे कारण (म्aल्ेा) आहे। या विधानास ( ते खरे असल्यास ) सर्वमान्यता असते। यातील कारण ही संकल्पना सर्व मानव वापरत असल्यामुळे वरील विधानास सर्वमान्यता मिळाली हे उघड आहे। प्रत्येक घटनेस कारण असलेच पाहिजे या विधानास सर्वमान्यता असते। अशी सर्वमान्य सार्वत्रिक विधाने गृहीत धरल्याशिवाय आपल्याभोवतीचे जग व त्याचे ज्ञान शवमयच होणार नाही। हे जग म्हणजे काल, अवकाश व कार्यकारणभाव इत्यादी संकल्पनांच्या योगे बांधलेली समष्टीच आहे। सृष्टीचा पाया असलेल्या या संकल्पनांमुळे ज्ञानात्मक विधानांची सर्वमान्यता शवमय होते। नीतिविधानांची सर्वमान्यताही त्या क्षेत्रातील पायाभूत संकल्पनांमुळे शवमय होते। पण सौंदर्यविधानाची सर्वमान्यता मात्र कोणतीही संकल्पना वापरल्याशिवाय शवमय असते। हे गुलाबाचे फूल सुंदर आहे। हे विधान सौंदर्यविधान आहे; पण सर्व गुलाबाची फुले सुंदर असतात। हे विधान मात्र सौंदर्यविधान नव्हे असे कांटचे म्हणणे आहे।6 याचे कारण असे की, दुसऱ्या विधानात गुलाब या वर्गाचा सौंदर्याशी नित्य-संबंध आहे असे म्हटले आहे। म्हणजे सर्व गुलाबांच्या ठिकाणी जे गुणविशेष आहेत ( व ज्यांच्या योगाने गुलाब या वर्गाच्या मर्यादा आखल्या जातात ) त्यांच्यात व सौंदर्यात नित्य-संबंध आहे असे सांगितले आहे। आणि असा संबंध प्रस्थापित करता येत नाही असे कांट मानतो। परंतु असा संबंध गुलाब हा वर्ग व गुलाबी रंग असणे यांच्यात असतो। समोरचे फूल गुलाब आहे, म्हणून ते गुलाबी आहे। असे आपण म्हणू शकतो। परंतु समोरचे फूल गुलाब आहे, म्हणून ते सुंदर आहे। असे आपण म्हणू शकत नाही। कारण गुलाब ही संकल्पना व गुलाबीपणा यांच्यात नित्य-संबंध आहे असे ज्याप्रमाणे प्रस्थापित करता येते त्याप्रमाणे गुलाब व सौंदर्य यांच्यात काही नाते आहे असे प्रस्थापित करता येत नाही। समोरचा गुलाब हा गुलाब आहे म्हणून सुंदर ठरत नाही। जेव्हा कोणत्याही वस्तूला आपण सुंदर म्हणतो तेव्हा ती कोणत्या वर्गात मोडते याचा विचार प्रस्तुत नसतो। ती वस्तू एक विशिष्ट वस्तू (ज्arूग्म्ल्त्ar) आहे असे मानूनच सौंदर्यविधान करायचे असते। ( मग आपण गुलाबाचे फूल ही संकल्पनानिर्देशक संज्ञा वापरलीच का? तर केवळ सोयीसाठी! त्याऐवजी ते काहीतरी सुंदर आहे। असेही आपण म्हणू शकलो असतो। ) या विवेचनातून एक निष्कर्ष असा निघतो की सौंदर्याला निश्चित निकष नसतात। समजा एखादी गोष्ट एका विशिष्ट वर्गात मोडते म्हणून ती सुंदर आहे असे असते, तर मग त्या वर्गाचे जे व्यवच्छेदक गुणविशेष आहेत ते सौंदर्याचा निकष म्हणून वापरता आले असते। पण कांटच्या मते कोणतीच संकल्पना विंढवा कोणतेच वर्गीकरण सौदर्यविधानात आfभप्रेत नसते। म्हणून सौंदर्याचा निकष संभवत नाही। या संदर्भात कांट ज्ञानशक्तींचा कोणत्याही नियमाशिवाय झालेला संगम7 ही संकल्पना वापरतो हे खरे; पण ज्या अर्थाने कार्यकारणभाव ही एक निश्चित संकल्पना आहे त्या अर्थाने ज्ञानशक्तींचा कोणत्याही नियमाशिवाय झालेला संगम ही निश्चित संकल्पना नाही। ज्ञानाच्या क्षेत्रात अनेकतेतून एकता कशी निर्माण करायची याबद्दल निश्चित नियम असतात। पण अशा निश्चित नियमांच्या अभावी अनेकतेत एकता ही निश्चित संकल्पना होऊ शकत नाही। कारण अनेकतेतून एकता निर्माण करण्याचे अनंत मार्ग असू शकतात। सौंदर्याच्या क्षेत्रात अनेकतेतून एकता निर्माण करण्यासाठी विशिष्ट नियम असते तर ते नियम सुंदर वस्तूंच्या जडणघडणीचे निमय ठरले असते। (असे निश्चित नियम असतात असा मर्ढेकरांचा दावा आहे।) परंतु कांटच्या मते सौंदर्याच्या क्षेत्रात असे नियम संभवत नाहीत। असे निश्चित नियम नसणे हे सौंदर्यानुभवाचे एक व्यवच्छेदक लक्षणच आहे। सुंदर वस्तू विशिष्ट नियमानुसार घडलेली नसते, सौंदर्याला निकष नसतात, हे कांटचे मत व्यक्तिवेशिष्टयाला आत्यंतिक महत्त्व देणाऱ्या टीकाकारांना फार पसंत पडेल यात शंका नाही। अशा टीकाकारांच्या मते एकास जे सुंदर वाटेल ते दुसऱ्यासही सुंदर वाटेल असे नाही; कोणाला काय आवडावे याला काही नियम नसतात। कांट मात्र ही भूमिका मान्य करीत नाही। सौंदर्यानुभवात नियम नसतात हे खरे; पण त्यामुळे त्याच्या सार्वत्रिकतेला ( ृ सर्वमान्यतेला ) बाध येत नाही असे तो मानतो। तो म्हणतो की काही गोष्टी अशा असतात की त्यांचे आfस्तत्व विशिष्ट तत्त्वांच्या वा नियमांच्या आधारे सिद्ध करता येते। पण एखादी गोष्ट सुंदर आहे हे काही या मार्गाने सिद्ध करता येत नाही। जर आपल्याला कोणी सांगितले की क्ष ही गोष्ट सुंदर आहे, कारण तिच्यात अमुक अमुक गुण आहेत। तर आपण त्याला म्हणू की मला स्वतःला क्ष बघितली पाहिजे; त्याशिवाय मी तुमचे म्हणणे मान्य करणार नाही। आपण सामान्यतः अशी भूमिका संवेदनासुखाविषयी घेतो; तेथेही आपल्याला तत्त्वे नियम वगेरेंचा आधार घेणे अप्रस्तुत वाटते। एव्हढयापुरते संवेदनासुखाविषयीचे विधान व सौंदर्यविधान यांच्यात साम्य आहे, पण त्यांच्यात एक मोठा फरकही आहे। संवेदनासुखाविषयीच्या विधानाला सर्वमान्यता आहे असा आपण दावा करीत नाही। पण एखादी गोष्ट प्रत्यक्ष बघितली व ती सुंदर आहे असे आपल्याला जाणवले, तर मात्र आपण असा दावा करतो की आपल्या सौंदर्यविधानाला सर्वमान्यता असलीच पाहिजे।8
2।5
कांटचे मत मान्य केले तर मोठया आपत्तींना तोंड द्यावे लागेल। त्यांपेकी सर्वांत मोठी आपत्ती अशी की सौंदर्यशास्त्राचा खटाटोप व्यर्थ आहे असे ठरेल। सौंदर्याचे सर्वंकष नियम आणि निकष शोधणे हे सौंदर्यशास्त्राचे कार्य आहे असे सौंदर्यशास्त्रज्ञ आतापर्यंत मानत आलेले आहेत। पण असे नियम व निकष नसतील तर सौंदर्यशास्त्राला कामच उरायचे नाही। पण इतके म्हणून संपत नाही। ज्या कारणासाठी सौंदर्यशास्त्र व्यर्थ आहे असे ठरते त्याच कारणासाठी समीक्षाव्यवहार व काव्यशास्त्र इत्यादी गोष्टीही व्यर्थ ठरतात। कारण या दोन्हींत संकल्पना व निकष यांचा सतत वापर होत असतो। सार्वत्रिक अशा संकल्पना व निकष आहेत या समजुतीवरच समीक्षाव्यापार व काव्यशास्त्र आधारलेले आहेत। आपल्या प्रत्येक सौंदर्यविधानाचे समर्थन करण्यासाठी आपल्याला सर्वंकष निकषांचा सतत आधार घ्यावा लागतो। संकल्पना वापरायच्या नाहीत असे ठरविले तर कलाकृतीचे वर्णनदेखील करता येणार नाही। प्रत्येक सुंदर वस्तू म्हणजे जिचे वर्गीकरण करता येत नाही अशी विशिष्ट वस्तू आहे अशी ज्यांची धारण असते त्यांना कांटचे मत मान्य होईल आणि सौंदर्यशास्त्र व काव्यशास्त्र इत्यादिकांचा अनन्यसाधारणत्वाच्या वेदीवर बळी द्यायला ते तयार होतील हे निश्चित। सौंदर्यशास्त्र व काव्यशास्त्र इत्यादिकांच्या उपयुक्ततेबद्दल स्टुअर्ट हँप्शायर व पासमोर9 यांनी जे मुद्दे उपस्थित केले आहेत त्यावरून कांटप्रणीत मत काही आधुनिक विचारवंतांसही मान्य आहे असे दिसते। सुंदर वस्तूचा आस्वाद घ्यायचा असेल तर संकल्पना व निकष यांचा त्याग करून त्या वस्तूचे वर्गीकरण करता येत नाही असे मानायला हवे। याचा अर्थ असा होतो की प्रत्येक सुंदर वस्तू अनन्यसाधारण (ल्हग्qल) आहे। आणि कांट वगेरे लोकांच्या म्हणण्याचा रोख बरोबर हाच आहे। सुंदर वस्तूंचे अनन्यसाधारणत्व ( या अर्थाने ) मान्य केल्यास सौंदर्यशास्त्र, काव्यशास्त्र इत्यादिकांचा आपल्याला त्याग करावा लागेल हे आपण पाहिले। आता प्रया> असा की इतकी मोठी विंढमत देणे जरूर आहे का? संकल्पना व निकष यांचे आणि सौंदर्यास्वादाचे इतके शत्रुत्व खरोखरच आहे का? यावर असे म्हणता येईल की जी शंका सौंदर्यशास्त्राच्या मुळावर आघात करते बरोबर तीच शंका नीतिव्यवहार व ज्ञानव्यवहार यांच्याही मुळावर आघात करते। जर या तीनही क्षेत्रांत ही शंका उपस्थित होत असेल, तर केवळ सौंदर्यशास्त्रात या शंकेचे स्तोम माजविणे योग्य नाही। शिवाय, या शंकेचे मर्म कशात आहे हे शोधून तिचे निराकरण करणेही शवमय आहे असे दाखवता येईल।
2।6
कांटला नीतिनियमांची सार्वत्रिकता मान्य आहे। नेतिक वर्तन म्हणजे विशिष्ट सर्वंकष नियमांनुसार केलेले वर्तन होय। जर नेतिक नियमांनुसार वेयक्तिक वर्तनाची आखणी करायची असेल तर ते नियम आपल्याला, आपल्या विशिष्ट परिस्थितीत, आपल्या समस्यांना लावता यायला हवेत। पण असे सर्वंकष नीतिनियम असतात का? काही विचारवंतांच्या मते प्रत्येक माणसाची नेतिक समस्या वेगळी असते; सर्व माणसांना समान अशा नेतिक समस्या नसल्यामुळे त्यांची उकल करण्याचे सार्वत्रिक मार्गही नसतात। सार्वत्रिक नीतिनियमांचा आपल्याला आपल्या स्वतःच्या समस्या सोडविण्याच्या कामी काहीही उपयोग होत नाही। कोणाच्याही जीवनाचे नेतिक मूल्यमापन करतानाही सार्वत्रिक नीतिनियमांचा उपयोग होत नाही। कारण प्रत्येक नेतिक प्रया> व त्याची उकल अनन्यसाधारण असते। आfस्तत्ववाद्यांनी अशी भूमिका घेतली आहे। या भूमिकेचा विचार होणे अगत्याचे आहे। म्हणून सात्रर्च्या एविमझस्टेन्शलिझम अँड हयमनिझिम या पुस्तकाच्या आधारे आfस्तत्ववादातील आपल्याला प्रस्तुत असलेल्या मूद्दयांची आपण थोडवमयात ओळख करून घेऊ। सर्व आfस्तत्ववाद्यांत एका गोष्टीविषयी एकवावमयता आढळते, ती म्हणजे मानवी आfस्तत्व (ाxग्ेूाहम) हे सत्त्वाच्या (ोाहम) आधी असते। याचा अर्थ असा की मानवी आfस्तत्व सत्त्वावर अवलंबून नसते; उलटपक्षी सत्त्वच आfस्तत्वाच्या आधारे निर्माण होते। याचे स्पष्टीकरण करताना सात्रर्ने मानवनिर्मित वस्तू व मानव यांची तुलना केली आहे। समजा, आपल्याला चाकू तयार करायचा आहे। तो करीत असताना आपल्या मनात चाकूचे स्वरूप, त्याचे विशिष्ट कार्य यांची संकल्पना असते। अशी संकल्पना नसती तर आपण चाकू तयार करीत आहो या म्हणण्याला काहीच अर्थ उरला नसता। म्हणजे चाकूबद्दल असे म्हणता येईल की चाकूची संकल्पना आधी व विशिष्ट चाकूची निर्मिती नंतर असा क्रम आहे। म्हणजे विशिष्ट चाकूचे आfस्तत्व चाकूच्या संकल्पनेवर आधारलेले असते। मानवाबद्दल विचार करतानासुद्धा पुष्कळ वेळा आपण याच विचारपद्धतीचा अवलंब करतो। आपण असे मानतो की ईश्वर हा एक कारागीर आहे आणि त्याने विशिष्ट संकल्पनांनुसार विश्वाची, व विशेषतः मानवाची, निर्मिती केलेली आहे। पण जर आपण निरीश्वरवादी असलो तर या विचारसरणीचा आपल्याला त्याग करावा लागतो। ज्याच्या मनात मानवाची संकल्पना निर्माण होणार तो ईश्वरच जर नसेल तर ती संकल्पनाच नसणार आणि त्या संकल्पनेचा आधार मानवी आfस्तत्वाला उरणार नाही। जर मानवाची संकल्पना नसेल तर विशिष्ट मानवांचे जीवन त्या सर्वंकष संकल्पनेचे प्रकटीकरण आहे असे म्हणता येणार नाही। आपले जीवन कसे घडवायचे हे ठरवायला प्रत्येक माणूस स्वतंत्र आहे; त्याच्यावर कोणत्याही संकल्पनेचे बंधन नाही, आणि त्याला कोठल्याही तत्त्वांचे मार्गदशर्न नाही। प्रत्येक माणूस स्वतंत्रपणे आपले जीवन घडवत असतो व त्या जीवनाची त्याने केलेल्या निवडीची संपूर्ण जबाबदारी त्याच्यावर असते। ईश्वर नाही त्या अर्थी त्याने निर्माण केलेली चिरंतन मूल्येही नाहीत। म्हणजे माणसाला कसलेच मार्गदशर्न नाही। तो सर्वस्वी एकाकी व पोरका आहे। हा मुद्दा मांडीत असताना सात्रर्ने कलावंताचा दाखला दिला आहे। ज्याप्रमाणे चित्र कसे असावे, कसे नसावे याबद्दल आधी ठरवलेले व सार्वत्रिक असे नियम नसतात, तसेच जीवन कसे घडवावे याबद्दलही नियम नसतात। कलेच्या व नीतीच्या संदर्भात आपण आपल्या मुक्त सर्जनशीलतेवरच अवलंबून असतो।10 सात्रर्चे म्हणणे खरे असेल तर त्यातून असा निष्कर्ष निघतो की, सौंदर्याप्रमाणे नीतीलाही सर्वंकष नियम नसतात।
2।7
विज्ञानाच्या क्षेत्रातही असाच प्रयन निर्माण करता येईल। एका वस्तूसारख्या अनेक वस्तू असतात, एका घटनेसारख्या अनेक घटना असतात, असे विज्ञानात गृहीत धरण्यात येते। आणि म्हणूनच त्यांच्याविषयीचे सार्वत्रिक नियम शोधून काढणे शवमय होते। पण प्रत्येक वस्तू व घटना अनन्यसाधारण असते असे एखादा तत्त्वज्ञ सिद्ध करू शकेल। समजा, एका जातीची दोन आंब्याची झाडे आहेत। ती अगदी सारखी आहेत असे आपण धरून चालतो। पण त्या दोन झाडांना वेगळे इतिहास आहेत त्यांचे जगातील इतर वस्तूंशी जे संबंध आहेत तेही वेगळे आहेत। उदाहरणार्थ, माळी पहिल्या झाडाजवळ 8 वाजता व दुसऱ्याकडे 8 वाजून 10 मिनिटांनी जातो। तसेच पहिले झाड दुसऱ्याच्या डाव्या बाजूस आहे। जरी केवळ अवकाश व काल या परिमाणांतील वेगळेपण त्यांच्यात असेल तरी त्यांची सत्त्वे वेगळी आहेत असे म्हणता येईल। पण असे म्हणता यावे म्हणून आपल्याला असे मानावे लागेल की कोणत्याही वस्तूचे सत्त्व त्या वस्तूचा सबंध इतिहास व तिचे इतर सर्व वस्तूंशी असलेले सर्व संबंध, काल व अवकाश या परिमाणांत तिला असलेले स्थान यांच्यावर अवलंबून असते। जर वस्तूच्या सत्त्वाचे जाळे इतके विस्तृत पसरलेले तर प्रत्येक वस्तू अनन्यसाधारण आहे असे मानावे लागेल। निराळया शब्दांत हीच गोष्ट अशी मांडता येईल ः एखाद्या वस्तूच्या व्यवच्छेदक लक्षणात किती गुणविशेषांना आपण स्थान देतो यावर तिचे अनन्यसाधरणत्व अवलंबून असते। जर एखाद्या वस्तूचे सर्व गुण व इतर सर्व वस्तूंशी असलेले तिचे सर्व संबंध यांना आपण तिचे व्यवच्छेदक लक्षण मानले तर ती वस्तू अनन्यसाधारण ठरेल। जर प्रत्ये वस्तू व घटना अनन्यसाधारण असेल तर वस्तू व घटना यांच्याबद्दल सार्वत्रिक नियम कसे शवमय होणार याचा अर्थ असा की, विशिष्ट गोष्टीच्या अनन्यसाधारणत्वाच्या सिद्धान्तामुळे जसे सौंदर्यशास्त्र व नीतिशास्त्र ही अशवमय होतील तसे विज्ञानही अशवमय होईल। तेव्हा या अनन्यसाधारणत्वाच्या सिद्धान्ताची जास्त छाननी करणे जरूर आहे।
2।8
हा सिद्धान्त अनुभवाधिष्ठित नाही हे उघड आहे। अनुभवाधिष्ठित सिद्धान्ताचे प्रमुख वेशिष्टय असे की, तो सिद्ध करण्यासाठी, निदान त्याचे खंडण करण्यासाठी, अनुभवजन्य पुरावा लागतो, आणि तसा पुरावा मिळू शकतो। परंतु विशिष्ट गोष्टीच्या अनन्यसाधारणत्वाच्या बाजूने विंढवा विरूद्ध कोणताच अनुभवजन्य पुरावा आणता येत नाही। असा कोणताही पुरावा तेथे प्रस्तुतच ठरत नाही। कारण असा पुरावा जमेस धरला विंढवा बाद केला तरी मूळ सिद्धान्ताला धवमका पोचत नाही। वर आपण आंब्याच्या दोन झाडांचे उदाहरण घेतले होते। ही झाडे सारखी आहेत का, हा प्रया> त्या झाडांची तुलना करून सुटायचा नाही। कारण ती जरी दिसायला तंतोतंत सारखी असली तरी ती सारखी नाहीत असे आपण म्हणू शकतो। त्यांचे जगातील इतर सर्व वस्तूंशी असलेले संबंध जर त्यांच्या व्यवच्छेदक लक्षणात घातले तर त्यांच्यातली भिन्नता स्पष्ट होईल। पण इतकेही करण्याची गरज नाही। कारण अगदी तंतोतंत सारखी झाडे सापडत नाहीत; दोन झाडांत थोडा तरी फरक असणारच। समजा, एकाला बारा फांद्या आहेत तर दुसऱ्याला अकरा आहेत; एक पंधरा फूट उंच आहे तर दुसरे चौदा फूट आहे। जर त्या झाडांच्या सत्त्वाच्या व्यवच्छेदक लक्षणात फांद्यांची संख्या, उंची वगेरे घातले तर ती झाडे भिन्न ठरतील। म्हणजे प्रया> अवलोकनाचा नसून ज्याचे अवलोकन केले त्याला व्यवच्छेदक लक्षणात स्थान द्यायचे की नाही हा आहे। वस्तूंच्या सत्त्वाची मर्यादा कोठे आखायची हा खरा प्रया> आहे। ज्याअर्थी विशिष्ट गोष्टीच्या अनन्यसाधारणत्वाचा सिद्धान्त अनुभवाधिष्ठित नाही त्याअर्थी तो आfतभौतिकीय (सूaज्प्ब्ेग्म्aत्) आहे असे मानता येईल। आfतभौतिकीय सिद्धान्त दोन प्रकारचे असतात। एका प्रकारचे आfतभौतिकीय सिद्धान्त आपल्या व्यवहाराच्या भाषेला, त्यातील संकल्पनांना छेद देतात। जर हे सिद्धान्त आपण स्वीकारले तर व्यवहाराची भाषा अपुरी, गोंधळ निर्माण करणारी, व अंतिम अर्थाने असत्य आहे असे आपल्याला मानावे लागते। प्लेटोने इहलोकातील सर्व गोष्टींना दुय्यम सत्ताशास्त्रीय स्थान ( दहूदत्दुग्म्aत् ेूaूल्े) दिले ते याच भूमिकेवरून। एप्ढ0 एच्0 ब्रॅडलीने आपल्या अपीअरन्स अँड रिअॅलिटी या ग्रंथामध्ये असे दाखविले आहे की, आपण देनंदिन व्यवहारात व विज्ञानात कार्यकारणभावादी ज्या संकल्पना वापरतो त्यांच्यामुळे बुद्धीचा गोंधळ उडतो व सत्यज्ञानाला आपण दुरावतो म्हणून त्यांच्या द्वारे दिसणारे जग परमार्थाने सत्य नव्हे। ब्रॅडलीची भूमिका प्लेटोसारखीच आहे। आfतभौतिकीय सिद्धान्त नेहमीच व्यावहारिक भाषेच्या विरोधात उभे ठाकलेले असतात असे नाही। ज्या संकल्पना आपल्या व्यवहाराच्या भाषेत असतात व ज्यांच्यामुळे आपल्या जीवनाला विशिष्ट आकार येतो त्यांच्या तार्किक वियलेषणासही आfतभौतिकी (सूaज्प्ब्ेग्म्े) हे नाव पुष्कळदा देण्यात येते। या प्रकारच्या आfतभौतिकीस वर्णनात्मक आfतभौतिकी (्ोम्rग्ज्ूग्न सूaज्प्ब्ेग्म्े) असे म्हणतात। कांटचे क्रिटीक आॅफ प्युअर रीझन व स्ट्राॅसनचे इंडििव्हज्युअल्स ही पुस्तके या प्रकारच्या आfतभौतिकीत मोडतात। प्लेटो, ब्रॅडली यांच्या आfतभौतिकीस पुनरर्चनात्मक आfतभौतिकी (rाviेग्दहarब् सूaज्प्ब्ेग्म्े) म्हणतात। प्रस्तुत पुस्तकात वर्णनात्मक आfतभौतिकीची भूमिका स्वीकारलेली आहे। समीक्षक म्हणून आपले देनंदिन जीवन ज्या संकल्पनांवर आधारलेले आहे त्या संकल्पनांचे आपल्याला वियलेषण करायचे आहे। समीक्षेच्या संदर्भातच सौंदर्याचे दशर्न, कलांचा आस्वाद इत्यादींचा आपल्याला लाभ होत असल्याने समीक्षाव्यवहाराला पूर्ण छेद जाईल अशा सिद्धान्तांचा स्वीकार करणे म्हणजे आत्मघात करून घेणे ठरेल। आपल्या भूमिकेवरून विशिष्ट गोष्टींच्या अनन्यसाधारणत्वाच्या संकल्पनेची छाननी करण्यासाठी समीक्षेत प्रस्तुत संकल्पनेला काही आधार आहे का हे आपल्याला बघितले पाहिजे। ही संकल्पना आपण समीक्षेत वापरतो का? जर वापरत असलो तर कांटला आfभप्रेत असलेल्या अर्थाने वापरतो, की दुसऱ्या कोणत्या अर्थाने वापरतो? जर कांटला आfभप्रेत असलेल्या अर्थाने ती संकल्पना वापरली तर ज्याच्या पायावर समीक्षा व साहित्यशास्त्रादी शास्त्रे उभी आहेत त्या संकल्पनाव्यूहावर काय परिणाम होईल? या प्रया>ांची उकल होईपर्यंत अनन्यसाधारणत्वाच्या प्रया>ाचे उत्तर आपल्याला मिळणार नाही। अनन्यसाधारणत्वाची संकल्पना आपण समीक्षेत वापरतो हे खरे आहे। उदाहरणार्थ, आपण म्हणतो की कालिदासाचे शाकुंतल विंढवा शेक्िस्पअरचे हॅम्लेट ही अनन्यसाधारण नाटयकृती आहे। असे म्हणताना आपल्या मनात इतकेच असते की ज्या गुणांमुळे नाटयकृती चांगल्या, सरस विंढवा महान ठरतात ते गुण या नाटयकृतीमध्ये प्राचुर्याने आढळतात। अनन्यसाधारण या शब्दाला समानार्थक असलेले इतर संदर्भातील शब्द पाहिले तर त्यांवरूनही असाच निष्कर्ष निघतो। उदाहरणार्थ, नेपोलिअन हा आfद्वतीय वीरपुरूष होता।, बापू नाडकर्णीचा खेळ अप्रतिम झाला।, गेल्या महायुद्धात ब्रिटिश जनतेने अतुलनीय धेर्य दाखविले।, झाले बहु, होतील बहु, आहेतही बहु, परंतु यासम हा।, गांधीजींनी जो त्याग केला त्याला इतिहासात तोड नाही। यावरून असे ध्यानात येईल की समीक्षेच्याच नव्हे तर इतर क्षेत्रांतील मूल्यमापनातही आपण अनन्यसाधारणत्वाची संकल्पना वापरतो। पण त्याबरोबर हेही खरे की कांट व सात्रर् यांना आfभप्रेत असलेल्या अर्थाने ही संकल्पना वापरली जात नाही। या दोघांना आfभप्रेत असलेल्या अर्थाने ही संकल्पना एखाद्या गोष्टीविषयी वापरायची झाल्यास असे मानावे लागते की कोणत्याही संकल्पनेच्या आधारे त्या गोष्टीचे वर्गीकरण होऊ शकत नाही, कोणतीही संकल्पना त्या गोष्टीला आपल्यात पूर्णपणे समाविष्ट करू शकत नाही, कोणत्याही सर्वंकष नियमाच्या आधारे त्या गोष्टीचा अर्थ लावता येत नाही, की तिचे मूल्यमापन करता येत नाही। उलटपक्षी, जेव्हा आपण आपल्या अर्थाने ही संकल्पना वापरतो तेव्हा आपल्याला यांपेकी एकही गोष्ट म्हणावयाची नसते। आपल्या मनात इतकेच असते की ज्या गुणांमुळे नाटयकृती, वीरपुरूष, खेळ, इत्यादी गोष्टी सरस विंढवा महान ठरतात त्या गुणांचे या विशिष्ट नाटयकृतीत, वीरपुरूषात,।।।फार मोठया प्रमाणात आfस्तत्व जाणवते। पण हा गुणसमुच्चय कमी प्रमाणात का होईना इतरत्र आढळणार नाही असे आपल्याला म्हणायचे नसते। भविष्यकाळात इतरत्र समान विंढवा जास्त गुणप्राचुर्य आढळेल ही शवमयताही आपण नाकारत नाही। आज जे अतुल्य आहे ते उद्या इतरांशी तुलना करता केवळ तुल्यबळ ठरेल, आणि कदाचित सामान्यही ठरेल। समान गुणांच्या आfस्तत्वामुळे दोन विंढवा आfधक कलाकृतींची तुलना करता येते व त्यांच्यात सरसनिरसही ठरविता येते। समीक्षेचे मुख्य कार्य म्हणजे कलाकृतींचे वियलेषण करणे, त्यांचे मूल्यमापन करणे, त्यांच्यात सरनिरस ठरविणे हे होय। हे सर्व करीत असताना समीक्षकाला अनेक कलाकृतींमध्ये समान असलेले गुण शोधावे लागतात आणि असे समान गुण सापडतातही। असे समान गुण सापडतात म्हणूनच समीक्षाव्यवहार शवमय होतो। याचा अर्थ असा नाही की हे गुण सर्व कलाकृतींत सारख्याच प्रमाणात आढळतात। सर्व कलाकृतींत एकच एक गुणसमुच्चय असतो असाही याचा अर्थ नव्हे। पण एक कलाकृती काही गुणांच्या बाबतीत इतर काही कलाकृतींसारखी असते हे मात्र निश्चित म्हणता येईल। आणि या सारखेपणाला समीक्षेत फार महत्त्व आहे। जेव्हा आपण म्हणतो की क्ष या कादंबरीतील पात्रे य या कादंबरीतील पात्रांपेक्षा सजीव आहेत, तेव्हा दोन्ही कादंबऱ्यांत सजीव पात्रनिर्मितीचा प्रयत्न लेखकांनी केलेला आहे हे साम्य आपल्या मनात असते; आणि या समान गुणांचा व कलाकृतीच्या मूल्याचा संबंध आहे हेही आपल्याला ठाऊक असते। आणि म्हणून क्ष ही य पेक्षा जास्त चांगली कादंबरी आहे असे आपण म्हणू शकतो। म्हणजे या समान गुणाचा आपण मूल्य-निकष (न्aत्ल म्rग्ूीग्दह) म्हणून वापर करतो हे उघड आहे। सजीव पात्रे असणे हा गुण प्रत्येक कादंबरीत असायला हवा असा आपला आग्रह नसतो। पण खूपशा कादंबऱ्यांत हा गुण कमीआfधक प्रमाणात असल्याने त्यांची तुलना होऊ शकते, त्यांच्यात तारतम्यही ठरविता येते। जेव्हा आपण एखाद्या कादंबरीला अनन्यसाधारण म्हणतो तेव्हा तिचे वर्गीकरण करता येत नाही, तिच्यात व इतर कलाकृतींत समान गुण नाहीत, असे आपल्याला म्हणायचे नसते। आपल्याला इतकेच म्हणायचे असते की हिच्यात व इतर कलाकृतींत समान गुण आहेत, आणि याच गुणांच्या बाबतीत ही इतरांपेक्षा कितीतरी वरचढ आहे। ती एका अर्थाने तुलनीय आहे म्हणूनच दुसऱ्या अर्थाने अतुलनीय आहे। आपण जेव्हा नेहमीच्या अर्थाने अनन्यसाधारण हा शब्द वापरतो तेव्हा तो काही थोडया कलाकृतीसाठी राखून ठेवतो। प्रत्येक कलाकृती अनन्यसाधारण आहे असे काही आपल्याला म्हणायचे नसते। तसे म्हटले तर अनन्यसाधारण हा शब्द निरर्थक होईल; समीक्षाव्यवहारात तो वापरताच येणार नाही। असे होईल हे दाखविण्यासाठी एक उदाहरण घेतो। माणसांबद्दल बोलताना स्वार्थी, निःस्वार्थी हे दोन शब्द आपण सार्थपणे वापरतो। पण समजा, कोणी म्हटले की प्रत्येक माणूस, केवळ तो माणूस आहे म्हणून स्वार्थी असतो। या सिद्धान्तामुळे स्वार्थी व निःस्वार्थी हा महत्त्वाचा फरक नाहीसा होईल आणि हे दोन्ही शब्द देनंदिन व्यवहारात निरूपयोगी ठरतील। तीच स्थिती अनन्यसाधारण या शब्दाची होईल। प्रत्येक कलाकृती अनन्यसाधारण आहे असे म्हटले की हॅम्लेट, ताजमहल इत्यादी थोडयाच कलाकृतींसाठी अनन्यसाधारण हा शब्द राखून ठेवता येणार नाही। खरे म्हणजे मूल्यमापनाच्या कार्यासाठी तो निरूपयोगीच होईल। पण तसे होता उपयोगी नाही। कारण समीक्षेत या शब्दाला निश्चित स्थान आहे। पण हा शब्द हवा असेल तर तो कांटला आfभप्रेत असलेल्या अर्थाने वापरता येणार नाही हे उघड आहे। समीक्षक ज्या अर्थाने अनन्यसाधारण हा शब्द वापरतो त्या अर्थाने तो शब्द वापरून ही कलाकृती अनन्यसाधारण आहे असे म्हटल्यास त्या कलाकृतीविषयी, तिच्या उच्च मूल्याविषयी निश्चित माहिती आपल्याला मिळते। पण कांट व सात्रर् यांच्या अर्थाने हा शब्द घेतला तर कलाकृतीविषयी काहीच निश्चित कळत नाही। अनन्यसाधारणत्व हा प्रत्येक कलाकृतीचाच गुणविशेष आहे असे मानल्यास ही आपत्ती येणे अपरिहार्यच आहे। जर प्रत्येक कलाकृती, केवळ ती कलाकृती आहे म्हणून, अनन्यसाधारण असेल तर कोणतीही कविता वाचल्याबरोबर इतर कोणतीही कविता न वाचताच, विंढवा इतर कवितांचे संस्कार लक्षात न घेताच, असे म्हणता यायला हवे की या कवितेसारखी दुसरी कविता आfस्तत्वातच नाही। परंतु असे आपण म्हणत नाही, म्हणू शकत नाही। समीक्षक प्रामुख्याने खालील दोन गोष्टी करताना दिसतो असे आपण पाहिले ः ( अ ) कलाकृतींचे वियलेषण, व ( आ ) त्यांचे मूल्यमापन। मूल्यमापनासाठी निकष लागतात याविषयी दुमत होणार नाही। निकषांचे वेशिष्टय असे की ते अनेक कलाकृतींना लावता येतात। वेगवेगळया कलाकृतींमध्ये जर साम्य नसेल, त्या जर कांटच्या अर्थाने अनन्यसाधारण असतील, तर निकष निर्माण होणारच नाहीत। निकष निर्माण होतात, ते आपण अनेक कलाकृतींना लावून त्यांचे मूल्यमापन करतो, त्यांच्यात प्रतवारी लावतो ही वस्तुस्थिती आहे। आणि हे जर सत्य असेल तर कांटच्या सिद्धान्ताचा त्याग करावा लागेल। यावर कोणी असा आक्षेप घेईल की निकषांखेरीज मूल्यमापन अशवमय असेल। पण वियलेषणासाठी निकषांची जरूरी काय? याला उत्तर असे की कलाकृतीच्या वियलेषणाचे अनेक प्रकार असू शकतात। पण हे सर्व प्रकार समीक्षेसाठी प्रस्तुत ठरतातच असे नाही। ज्याचा मूल्यमापनाशी आfजबात संबंध नाही असे वियलेषण समीक्षेत बसत नाही। कलाकृतीचे वियलेषण करायचे म्हणजे तिच्यातील प्रत्येक बाजूचे व प्रत्येक बारकाव्याचे वियलेषण करणे नव्हे। ज्या गोष्टीवर त्या कलाकृतीचे मूल्य अवलंबून आहे अशाच गोष्टीचे वियलेषण कलासमीक्षेत आfभप्रेत असते। कलाकृतीची कलाकृती म्हणून होणारी जाणीव हीच एका मूल्यांकित गोष्टीची जाणीव असते। आणि मूल्यमापन निकषांखेरीज अशवमय असते हे आपण पाहिलेच आहे। म्हणजे पर्यायाने कलाकृतीची कलाकृती म्हणून होणारी जाणीव हीच मुळी निकषांच्या आfस्तत्वावर अवलंबून असते असे म्हणावे लागते। याचा अर्थ असा की निकषांच्या अभावी मूल्यमापनच नव्हे तर कलाकृतीचे वियलेषणही अशवमय असते। आणि म्हणून कांटचा अनन्यसाधारणत्वाचा सिद्धान्त स्वीकारणे चूक ठरते। सौंदर्याच्या क्षेत्रात संकल्पना आणि नियम नसतात हे कांटचे मतही याच कारणासाठी स्वीकारता येत नाही।
2।9
याचा अर्थ असा नव्हे की कांटच्या मतात काहीच तथ्य नाही। पुष्कळ आfतरेकी सिद्धान्त जरी पूर्णपणे स्वीकार्य नसले तरी ते नवी दृष्टी देतात म्हणून विचारणीय तरी नवमकी ठरतात। एखादा आfतरेकी सिद्धान्त लोकांना पटू लागला की त्या सिद्धान्ताला वस्तुस्थितीत, व्यावहारिक जीवनात, आपल्या वस्तुस्थितीच्या जाणिवेत काही तरी आधार आहे असे समजायला हरकत नाही। कांट व सात्रर् यांच्या आfतरेकी सिद्धान्ताला असाच आधार आहे। हा आधार नुसत्या कलाविश्वात व नीतिविश्वात आहे असे नसून एकूण मानवी जीवनातच या सिद्धान्ताला पाठबळ मिळेल अशी परिस्थिती आहे। कलाविश्वात बोलायचे तर असे दाखविता येईल की अनन्यसाधारणत्वाच्या जरी नाही तरी वेगळेपणाच्या, नावीन्याच्या संकल्पनेला या विश्वात विशेष महत्त्व आहे। नीतिदृष्टया चांगली अशी दोन कामे एकमेकांसारखी असली, व त्यांतील एक काम दुसऱ्याची अनुकृती असले, तरी त्यांचे नेतिक मूल्य सारखेच असू शकते। गांधीजींनी जे भारतात केले तेच मार्टिन ल्युथर विंढगने अमेरिकेत केले तर त्याच्या कार्याचे नेतिक महत्त्व कमी होत नाही; विंढगने गांधींचे अनुकरण केले म्हणून त्याला नेतिक दृष्टया दुय्यम स्थान मिळत नाही। पण असे अनुकरण कलेच्या क्षेत्रात झाले तर त्याला कलामूल्यदृष्टया दुय्यम स्थानच दिले जाते। म्हणूनच वाङ्मयचौर्य हा गर्हणीय प्रकार मानण्यात येतो; पण नीतितत्त्वचौर्य नावाची संकल्पना आfस्तत्वात नाही। पण नेतिक परिस्थिती तंतोतंत सारखी नसते आणि म्हणून नेतिक क्षेत्रातही सहीसही अनुकरण शवमय नसते। आणि तसे अनुकरण करण्याचा कोणी प्रयत्न केल्यास तो हास्यास्पद ठरतो। याचा अर्थ असा की वेगळेपणाच्या संकल्पनेला नीतिविश्वातही स्थान आहे। पण तरीही तिला दोन्ही विश्वांत सारखेच स्थान आहे असे म्हणता यायचे नाही। कारण कलाकृतीचा वेगळेपणा, तिचे नावीन्य यांच्यामुळे कलाकृतीच्या मूल्यात निश्चित भर पडते; तसे नीतीच्या क्षेत्रात घडत नाही। वेगळेपणा हा नीतिविश्वातील वस्तुस्थितीचा एक भाग आहे उलटपक्षी कलाविश्वातील वेगळेपणा हा काही प्रमाणात तरी मूल्याचा आधार आहे। वरील चर्चेचा सारांश असा की कलेच्या क्षेत्रात वेगळेपणाची, नावीन्याची संकल्पना फार महत्त्वाची आहे। ती सर्वगामी आहे, सर्व कलाकृतींच्या बाबतीत ती लावावी लागते। अनन्यसाधारणत्वाची संकल्पना मात्र काही थोडया कलाकृतींसाठी राखून ठेवायला हवी। या दोन्ही संकल्पना मात्र काही थोडया कलाकृतींसाठी राखून ठेवायला हवी। या दोन्ही संकल्पना कांटच्या अनन्यसाधारणत्वाच्या संकल्पनेपेक्षा वेगळया आहेत। एखादी कलाकृती वेगळी आहे असे म्हटले म्हणजे तिचे वर्गीकरण करता येत नाही, तिच्यात व इतर कलाकृतींत काहीच साम्य नाही, असा अर्थ ध्वनित होत नाही। ती काही प्रमाणांत इतरांसारखी आहे म्हणूनच तिचे वेगळेपण विशेष उठून दिसते। वेगवेगळया कलाकृतींत साम्य आहे म्हणून सर्वंकष निकष लावता येतात। पण साम्याबरोबर भेदही आहेत म्हणून ठोकळेबाज पद्धतीने कोणतेही निकष वापरणे चूक ठरते। कलाकृतीचे संपूर्ण मूल्य केवळ तिच्या वेगळेपणात शोधणे हे जितके चूक तितकेच तिचे संपूर्ण मूल्य तिच्यात व इतर कलाकृतींत असलेल्या साम्यात शोधणे हेही चूक। मानवेतर सृष्टीमधल्या गोष्टींमध्येही वेगळेपण असते। पण या वेगळेपणाची आपण बूज ठेवीत नाही। मानवाबद्दल, आणि त्याने निर्माण केलेल्या गोष्टींबद्दल विचार करताना मात्र व्यक्तित्वाला, वेगळेपणाला आपण महत्त्व देतो। मानवाच्या संकल्पनेतच व्यक्तित्वाची संकल्पना अनुस्यूत आहे। म्हणून मनुष्येतर प्राणी व चेतनाचेतन सृष्टी यांच्याविषयी ज्या सहजतेने आपण सर्वंकष नियम सांगू शकतो त्या सहजतेने मानवाविषयी नियम बसविता येत नाही। पण याचा अर्थ असा नव्हे की मानवाविषयी काही नियमच सांगता येत नाहीत। मानवी जीवन जर नियमरहित असते तर त्याचे आपल्याला ज्ञानच झाले नसते। प्रत्येक माणूस एक स्वतंत्र बेट झाला असता। परंतु असे होत नाही। माणसांचे व्यवहार आपल्याला कळतात; कारण त्यांत एक प्रकारची नियमबद्धता असते। माणसामाणसांत जशी भिन्नता असते तसे साम्यही असते। या साम्यामुळेच नियमबद्धता शवमय होते। पण भेद असल्यामुळे ही नियमितता यांत्रिक असून चालत नाही हे आपण वर पहिले। कलाकृतींबद्दल विचार करतानादेखील या साम्यभेदांची सतत जाणीव ठेवावी लागते। आस्वादप्रक्रियेचा विचार केला तर तिच्यातही व्यक्तिवेधम्र्य मोठया प्रमाणात आढळते। पण येथेही भेदांबरोबर साम्याचासुद्धा विचार करणे आवश्यक ठरते। आस्वादकांच्या वेयक्तिक प्रतिक्रिया भिन्न असल्या तरी त्या प्रतिक्रियांची जात व त्या प्रतिक्रियांमधील घटकांपेकी कशाला प्रस्तुत मानायचे याची जाण या गोष्टी सारख्या असू शकतील। एखादे नाटक बघताना काही प्रेक्षकांत सौम्य भावनाजागृती होईल तर काहींना आपले सर्व भावविश्वच ढवळून गेल्यासारखे वाटेल। या दोन प्रतिक्रिया भिन्न आहेत हे खरे। पण नाटयकृतींच्या मूल्यमापनाचा व आस्वादकात होणाऱ्या भावनाजागृतीचा संबंध आहे असे जर या प्रेक्षकांना वाटत असेल तर त्यांच्या प्रतिक्रियांची जात व मूल्याच्या संदर्भात काय प्रस्तुत आहे याची जाण, या गोष्टी समान आहेत असे लक्षात येईल। आणि ही जात व जाण एकच असल्याने त्यांना एकमेकांचे बोलणे कळेल। पण सर्व माणसांच्या प्रतिक्रियांची जात व त्यांत आfभप्रेत असलेली मूल्यदृष्टया काय प्रस्तुत आहे याची जाण, या एकच असतात का? येथेही विविधता असल्याचे लक्षात येईल। पण विविधता व्यक्तिव्यक्तीमधील नसून प्रतिक्रियांच्या जातींमधील व त्यांतील वेगवेगळया जाणिवांच्या प्रकारांमधील आहे। या पातळीवर विविधता असते याचे एक कारण असे की कलाकृती व तिचा आस्वाद या दोन्ही गोष्टी अनेकांगी व व्यामिश्र आहेत। त्यांपेकी कोणत्या अंगावर भर द्यायचा याबद्दल मतभिन्नता असणे स्वाभाविक आहे। सर्वच कलाकृतींना सारखीच व सर्वच अंगे असतील असे नाही। म्हणून भिन्नतेला आfधक वाव मिळतो। परंतु भिन्नतेबरोबर साम्यही असते हे विसरून चालणार नाही। याचा अर्थ असा की कलाविश्वातील संकल्पना साम्य व भेद यांना सामावून घेणाऱ्या असायला हव्यात। समीक्षा शवमय व्हायची असेल तर सार्वत्रिक नियम, निकष संकल्पना असायला हव्यात। पण कलाकृतींच्या वेगळेपणावर अन्याय होऊ नये असे वाटत असेल तर हे नियम व निकष लवचिक असणे जरूर आहे। समीक्षकाने एकाच वेळी अनेक नियम व निकष यांचा उपयोग केला तर तो वापरत असलेल्या मूल्यदंडात जरूर तो लवचिकपणा येईल असे वाटते। कोणत्याही एका नियमाच्या दृष्टीने विचार केल्यास असे लक्षात येईल की, कोणत्याच गोष्टीचे व्यक्तित्व त्यात पूर्णपणे सामावले जात नाही। त्याच व्यक्तित्वाला अनेक अंगे असल्याने ते इतर नियमांच्याही कक्षेत येते। या अनेकविध नियमांचा एकाच वेळी वापर केल्यास ते व्यक्तित्व आपण समग्रपणे आकलन करू शकतो। यासाठी देनंदिन व्यवहारातील एक उदाहरण घेऊ। डाॅवमटरला हे माहीत असते की समोरचा रोगी इतर रोग्यांपेक्षा काही बाबतींत व काही प्रमाणांत वेगळा आहे। त्यामुळे इतरांना जी औषधयespाना लागू पडली ती त्याला लागू पडेलच असे नाही। औषधयespाना ठरविताना रोग्याच्या शरीराची स्थिती, त्याच्यावर परिस्थितीचे झालेले परिणाम, विशिष्ट औषधांबद्दलच्या त्याच्या प्रतिक्रिया, त्याची मानसिक स्थिती इत्यादी अनेक अंगांचा विचार करावा लागतो। यांतील प्रत्येक अंगाला कोणता ना कोणता तरी नियम लागू पडतो। रोग्याचा आजार हा अनेक कार्यकारणनियमांनुसार घडलेल्या गोष्टींचा परिपाक असतो, व तो बरा होण्याची प्रक्रियादेखील अनेक नियमांनुसार होणाऱ्या गोष्टींचा परिपाक असते। प्रत्येक रोगी एका अर्थाने वेगळाच असतो। पण याचा अर्थ तो कोणत्याच नियमाखाली येत नाही असा नसून तो एकाच वेळी अनेक नियमांखाली येतो असा आहे। व्यक्तित्व म्हणजे नियम-निरपेक्षता नव्हे। व्यक्तित्व म्हणजे एकाच वेळी अनेक नियम प्रस्तुत ठरणे होय। कलाकृतींच्या विषयी हाच निष्कर्ष खरा ठरतो। कलाकृतींमध्ये साम्य असते म्हणून सर्वंकष निकष शवमय असतात। पण व्यक्तिवेशिष्टयाची बूज राखायची असल्यामुळे बहुविध निकषांचा वापर करावा लागतो। कलाकृती अनेकांगी असणे व समीक्षकाने बहुविध नियमांचा व निकषांचा उपयोग करणे या गोष्टी परस्परावलंबी व अन्योन्यपोषक आहेत। बहुविध नियमांचा एकाच वेळी उपयोग करण्याची सर्वांत चांगली पद्धती म्हणजे त्यांना अमूर्त रूपात शब्दांकित न करता ते ज्या कलाकृतींमध्ये आढळतात त्या कलाकृतींचाच मूल्यमापनासाठी दंड म्हणून उपयोग करणे। प्रत्येक कलाकृती अनेकांगी असल्याने तिच्यात अनेक नियमांचा आढळ होणे, अनेक निकषांच्या दृष्टीने ती मूल्यवान ठरणे क्रमप्राप्त आहे। तेव्हा कलाकृतीचा मूल्यमापनासाठी उपयोग करणे म्हणजे तिच्यात देहीभूत झालेल्या नियमांचाच उपयोग करणे होय। मूल्यमापनासाठी महान कलाकृतींचा उपयोग करावा असे जे आर्नल्डसारखे टीकाकार सांगतात त्याचे मर्म हेच असावे।11 निकषाचा मुद्दा आर्नल्डच्या शब्दांत मांडला तर कांटचाही त्याला विरोध असणार नाही असे त्याच्या कलाविषयक लिखाणावरून वाटते।12 वरील एकूण चर्चेचा निष्कर्ष असा निघतो की, सौंदर्यविधान ज्याप्रमाणे व्यक्तिविषयक असते त्याप्रमाणे ते सार्वत्रिकही असू शकते। सौंदर्याचे व कलाकृतीच्या चांगलेपणाचे निकष असतात हे आपण वर पाहिले। निकषांना सार्वत्रिकता असते आणि म्हणून निकष सांगणारी विधाने सार्वत्रिक आहेत असे ठरते। या सार्वत्रिक विधानांची व्याप्ती कमीजास्त असते। उदाहरणार्थ, सर्व कला जीवनाची प्रतिकृति असते। या विधानाची व्याप्ती सर्व शोकात्म नाटयकृती भावनांचे विरेचन करतात। या विधानाच्या व्याप्तीपेक्षा मोठी आहे। पण तरीही दोन्ही विधाने सार्वत्रिक आहेत याविषयी शंका नाही। दुसरे असे की जेव्हा आपण एखाद्या कलाकृतीचे मूल्यमापन करतो तेव्हा सार्वत्रिक विधानांचा आपल्याला फार उपयोग होतो। विंढबहुना असेही म्हणता येईल की अशा सार्वत्रिक विधानांच्या अभावी आपल्याला वियलेषण व मूल्यमापन करताच येणार नाही। प्रत्येक व्यक्तिविषयक विधानाच्या पुष्टयर्थ अशी सार्वत्रिक विधाने वापरावी लागतात। पण दर खेपेस व्यक्तिविषयक विधानांचे समर्थन (विंढवा खंडन) केले नाही तरी सार्वत्रिक विधाने गृहीतकृत्ये (aेल्स्ज्ूग्दह) म्हणून आपल्या मनात असतातच। कारण सार्वत्रिक विधाने व्यक्तिविषयक विधानांचा पाया असतात। व्यक्तिविषयक विधानात सार्वत्रिक विधाने अनुस्यूत असतात।