भाषांना बनवूया कॉम्प्युटर फ्रेंडली!
मुखपृष्ठ >> लेख >> भाषांना बनवूया कॉम्प्युटर फ्रेंडली!
 
ई-पेपर


बाजार भाव
V
 निफ्टी
५,७०१  (-४८) 
V सेन्सेक्स१८,९९८ (-१३८) 
  डॉलर४४.३७         
  युरो६५.८२  
V सोने२२,७२०(-३३५)
V चांदी६७,८०० (-३,७००)


स्पर्धेचे नियम व अटी
भाषांना बनवूया कॉम्प्युटर फ्रेंडली! Bookmark and Share Print E-mail
आनंद मापुस्कर,सोमवार, २ मे २०११
करियर फाऊंडेशन

anandmapuskar@gmail.com This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
संगणकाच्या सहाय्याने भाषा शिक्षणाचे साहित्य विकसित करता येते. विविध सॉफ्टवेअर्सच्या मदतीने प्राचीन तसेच नामशेष होऊ पाहणाऱ्या भाषा आणि त्यांच्या लिपीचे जतन करता येते. तसेच भाषाविषयक सल्ला व मदत उपलब्ध करून दिली जाते. यासंबंधी करिअरच्या विविध संधी उपलब्ध आहेत. त्याविषयी-
मानवी प्रगतीमध्ये भाषांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. बोलीभाषेतून भाषांच्या लिपी तयार झाल्या. भाषांचे लेखनाविषयक नियम बनवले गेले. ज्ञानार्जनासाठी भाषा या महत्त्वपूर्ण ठरू लागल्या. भाषांच्या विकासाचा प्रवास हा थक्क करणारा आहे. अगदी आता-आतापर्यंत मातृभाषा हीच ज्ञानभाषा म्हणून ओळखली जाई. परंतु हळूहळू समाजातील जवळपास सर्वच वर्ग ज्ञानभाषा म्हणून इंग्रजीला जवळ करू लागले. पाश्चात्त्य देशीचे विद्वान संस्कृत शिकू लागले. कारण प्राचीन काळातील ज्ञानाचे भांडार संस्कृतमध्ये उपलब्ध आहे. भारतीय भाषांचा विकास कालानुरूप होणे अत्यंत जरुरीचे वाटू लागले. त्याचप्रमाणे विनाश पावू लागलेल्या आदिम भाषांचे जतन करणेदेखील गरजेचे वाटू लागले. भारतीय भाषांच्या विकासासाठी एकत्रित येऊन शास्त्रशुद्ध अभ्यासाची, आंतरशाखीय संशोधनाची गरज ओळखून सेंट्रल इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियन लँग्वेजची स्थापना झाली. भारतीय भाषांच्या एकत्रित अभ्यासाने भारतीय भाषा समृद्ध व्हायला व विविध भाषिक लोकांमध्ये एकात्मतेची भावना निर्माण होण्यास नक्की मदत होते.
या संस्थेमार्फत केंद्र व राज्य सरकारांना भाषाविषयक सल्ला व मदत दिली जाते. भारतीय भाषांमधून साहित्यनिर्मिती केली जाते. आदिम जमाती व छोटय़ा समुदायाच्या भाषेचे संरक्षण व संकलन केले जाते. परदेशी वा अन्य भाषिक लोकांना भाषा शिक्षण देण्याचे साहित्य विकसित केले जाते.
या संस्थेच्या पुढाकारातून भाषांच्या विकासाचे अनेक उपक्रम सुरू झाले आहेत. संगणकाच्या युगात विविध सॉफ्टवेअर्स भारतीय भाषांमध्ये उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. तसेच संगणकावर भारतीय भाषांचा वापर करता येणे आवश्यक आहे. हे सर्व विकसित करण्यासाठी भाषातज्ज्ञांची आवश्यकता आहे. यामध्ये करियर संधीदेखील मोठय़ा प्रमाणावर उपलब्ध आहे. अशाच काही करियर्सची आणि संस्थांची माहिती घेऊया.
लँग्वेज इन्फोर्मेशन सव्‍‌र्हिस - इंडिया
भारतीय भाषांची खात्रीलायक माहिती देणारी ही एक वेबसाइट आहे. भारतीय भाषांची माहिती मिळवू इच्छिणाऱ्यांसाठी ही वेबसाइट महत्त्वपूर्ण आहे. या वेबसाइटवर भारतीय भाषेच्या तंत्रज्ञानाच्या सोयीबाबत माहिती दिली आहे. भारतीय भाषा संगणकावर वापरताना त्यासाठीच्या विविध प्रोग्राम्स व सॉफ्टवेअर्सची माहिती यामध्ये दिली आहे. यामध्ये भाषेतील शब्दसंग्रह, शब्दप्रयोग करण्याच्या पद्धती याबाबत मार्गदर्शन केले आहे. टेक्स्ट एडिटर, डिक्शनरी, स्पेल चेकर्स, व्याकरण, मशीन ट्रान्सलेशन, ऑप्टिकल कोड रेकगनिशन (OCR) इन्फोर्मेशन रिट्रिव्हस, सर्च इंजिन्स, स्वीच टेक्नॉलॉजी यासाठी उपलब्ध सॉफ्टवेअर्स व त्यासाठी कार्यरत संस्थांची माहिती यामध्ये दिली आहे. भाषेमध्ये आवड असणाऱ्यांनी ही साइट अवश्य पाहावी- (www.lisindia.net)
नॅशनल ट्रान्सलेशन मिशन
या संस्थेचा जन्म भारतीय पंतप्रधानांच्या पुढाकारातून झाला. राष्ट्रीय ज्ञान आयोगाच्या पहिल्या बैठकीत विविध भाषांतील साहित्य, ज्ञान सर्वच भारतीय भाषांमध्ये अनुवादित करण्याची गरज असल्याचे जाणवले. यामधून राष्ट्रीय ट्रान्सलेशन मिशनची स्थापना झाली.
या संस्थेद्वारा कोणत्या साहित्याचे/ग्रंथाचे अनुवाद करण्याची गरज आहे, हे तपासले जाते. यानंतर साधारणत: २२ भारतीय भाषांमध्ये याचे भाषांतर केले जाते. साहित्याची प्रिंट व ई-बुक आवृत्ती प्रकाशित केली जाते.
संस्थेद्वारा अनुवादकाच्या प्रशिक्षणाची व्यवस्था केली जाते. यामध्ये दुभाषासाठी, सबटायटल्ससाठी, कायद्याचे अनुवाद, विज्ञान, तंत्रज्ञान, समाजशास्त्र आदी विविध विषयांसाठी अल्पमुदतीचे प्रशिक्षण संस्थेकडून दिले जाते. अनुवादकांच्या प्रशिक्षणासाठी अभ्यासक्रम व साहित्यनिर्मिती केली जाते. तसेच अनुवादकांसाठी खास प्रशिक्षणदेखील आयोजित केले जाते.
संस्थेतर्फे अनुवादकांची नोंदणी केली जाते व त्यांना अनुवादनाचे काम दिले जाते. अधिक माहितीसाठी www.ntm.org.in ही वेबसाइट पाहावी.
लिग्विस्टिक डेटा कान्सॉर्टियम (conscrtium) फॉर इंडियन लँग्वेज
लँग्वेज टेक्नॉलॉजी (भाषा तंत्रज्ञान) यामध्ये भाषेचा डेटा (माहिती) हा संशोधनासाठी व विकासासाठी महत्त्वपूर्ण असतो. संगणकावर भारतीय भाषांचा वापर सुकर व्हावा यासाठी शब्दसंग्रह करणे आवश्यक आहे. ‘स्पेल चेकिंग’साठी या प्रमाणित शब्दांचा उपयोग होतो. इंग्रजीप्रमाणेच भारतीय भाषांचे कॅरेक्टर (अक्षर), रेकग्निशन (ओळख) अत्यंत महत्त्वाचे आहे. यामुळे मुद्रित (प्रिंट) मजकूर स्कॅन करून तो वर्ड डॉक्युमेंटमध्ये बदल करण्याजोगा (editable) करता येतो. नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग हेदेखील अनुवादाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. वाक्यरचना, शब्दांचे अर्थ, व्याकरण यासाठी वरील बाबींचा विचार करणे आवश्यक ठरते. आवाज ओळखणे व आवाजाचे पृथक्करण (Speech Reconition व (Speech Synthesis) या बाबींवरही संशोधनाची गरज आहे.
वर उल्लेख केलेल्या भाषिक डेटासंदर्भातील प्रशिक्षण, परिसंवादाचे आयोजन ही संस्था करते. अधिक माहितीसाठी www.ldcil.org ही वेबसाइट पाहावी.
सेंटर फॉर टेस्टिंग अ‍ॅण्ड इव्हॅल्यूएशन नॅशनल टेस्टिंग सव्‍‌र्हिस - इंडिया
विविध ज्ञानशाखा, भाषा व साहित्य यांच्या अभ्यासासाठी आवश्यक साधने व साध्य यांचा विचार करणे, प्राथमिक ते संशोधन स्तरापर्यंत या अनुषंगाने अभ्यासक्रमाची निश्चिती करणे, त्यासाठी माध्यमाची निश्चिती करणे. भाषांच्या संदर्भात स्थानिक, प्रादेशिक व राष्ट्रीय मानके (standards) तयार करणे. वरील उद्दिष्टय़े या संस्थेची आहेत. याबरोबरीने मूल्यमापनासाठीचे पाठय़क्रम तयार केले जातात.ही संस्था सेंट्रल इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियन लँग्वेजचा उपक्रम आहे. www.ciil-ntsindia.net
सेंटर फॉर इंडियन लँग्वेज टेक्नॉलॉजी
(आय.आय.टी. मुंबईचा उपक्रम)
तंत्रज्ञानाच्या प्रशिक्षणासाठी जगभरात नावाजलेल्या आय.आय.टी. भारतीय भाषांच्या संदर्भातील कामही चालते. संगणकाच्या युगात भाषेला कॉम्प्युटरफ्रेंडली बनवण्याचे काम या सेंटरमधून चालते.
विविध भाषांतील शब्दबंध (word net) म्हणजेच शब्दगत संकल्पनांचा व त्यातील परस्पर संबंधांचे वेध घेणे. वाक्यरचनेतील दोष शोधणे व दुरुस्त करणे. व्याकरणदृष्टय़ा वाक्यरचना तपासणे. मराठी भाषेचे अन्य भाषेत संगणकाच्या प्रोग्राम्सच्या साहाय्याने अनुवाद करणे. (machine translation) मजकुराचे भावनात्मक (सकारात्मक, नकारात्मक, तटस्थ) विश्लेषण करून त्याचे स्वरूप ओळखणे आदीवर या संस्थेत संशोधन चालते. (www.cfilt.iitb.ac.in)
सीडॅक
सीडॅकमध्येही भाषांवरील विविध संशोधनात्मक काम चालते. भाषांमधील गणन (computing),  अक्षर ओळख (OCR), युनिकोड प्रणाली यावर काम केले जाते. (www.cdac.in) वर उल्लेख केलेल्या व यासारख्या असंख्य संस्थांमध्ये भाषातज्ज्ञांची गरज आहे. संगणकावर संपूर्णत: भारतीय भाषांवर काम करता यावे या दृष्टीने असंख्य उपक्रम राबवले जात आहेत. भारतीय भाषांचे शब्दसंग्रह, स्पेल चेकर्स, वाक्यरचना तपासणे, मशीन ट्रान्सलेशन आदीचा समावेश होतो. आधुनिक तंत्रज्ञान, माहिती व ज्ञान याने भारतीय भाषा समृद्ध करण्याचे आव्हान भाषातज्ज्ञांसमोर आहे. अर्थातच या क्षेत्रात भाषातज्ज्ञांना भरपूर संधी आहेत.
प्रतिक्रिया येथे नोंदवा
तुमची संपर्क माहिती:
प्रतिक्रिया:

(Press Ctrl+g to toggle between English and Marathi, While using Virtual Keyboard Press Shift to get more Alphabets)
Click to get the Keyboard
         

!joomlacomment 4.0 Copyright (C) 2009 Compojoom.com . All rights reserved."

 

ताज्या बातम्या

लोकरंग

 समतोल, शाश्वत, सर्वसमावेशक विकास
 हवे विकासनिष्ठ आणि कल्पक नेतृत्व!
 सर्वस्पर्शी विकासाचा रोडमॅप हवा!
 भविष्यकाळ आमचाच!
 शिवसेनेच्या डरकाळीतच महाराष्ट्राचे भविष्य!
 व्यापक जनाधारासाठी भविष्यात झटणार!
 ‘थिंक टॅंक’द्वारे उद्योगविकासाचे नियोजन व्हावे
 शिक्षणात दुर्लक्षित घटकांना स्थान हवे
 विज्ञान क्षेत्रात दोन पावले मागेच!
 फुकुशिमा दुर्घटना आणि आपले ऊर्जा भवितव्य
 पर्यावरणाची जोपासना करा!
 जलव्यवस्थापनात काठावर उत्तीर्ण!
 गरज खऱ्या मराठी रिनॅसन्सची!
 तंत्र-मंत्रयुक्त नवी पिढीच चित्रपटांना तारेल!
 शेतक-यांच्या बाजार सन्मुखपणाची पुरेशी दखल घेतली जात नाही
 जालीम उपायांची निकड!
 ...अवघे धरू सुपंथ!
 फ्लॅशबॅक

दिनदर्शिका

मंगळवार, ३ मे २०११. भारतीय सौर १३, वैशाख १९३३. मिती चैत्र वद्य अमावस्या  १२ क. २१ मि., भरणी नक्षत्रे २८ क. २७ मि., मेषचंद्र., सूर्योदय- ६/११, सूर्यास्त- ७/०.
मेष- मन:स्थिती चांगली बनावी. वृषभ- वायफळ खर्च टाळा. मिथुन- महत्त्वाची कामे मार्गी लावाल. कर्क- उलाढालींना चालना मिळेल. सिंह- युक्ती उपयुक्त ठरेल. कन्या- नमते घ्यावे लागू शकते. तूळ- सल्लामसलत करा. वृश्चिक- दुसऱ्यावर विसंबू नका.धनू- भेटीगाठी उपयुक्त. मकर- तटस्थ राहा. कुंभ- अनुकूल घटना घडतील. मीन- संभ्रम कमी व्हावा.    
शुभराशी : मिथुन, कर्क, सिंह.